Dhananjay Munde Parli Assembly constituency : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे नेते व उमेदवार राज्यभर प्रचार करत आहेत. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आणि पर्यायाने महायुतीचे येथील अधिकृत उमेदवार आहेत. मुंडे यांनी आज (गुरुवार, १४ नोव्हेंबर) परळीतील मतदारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “मी मागील पाच वर्षांत मतदारसंघात भरपूर कामं केली आहेत. जनतेला दिलेली सर्व आश्वासनं पाळली आहेत. त्यामुळे, परळीतील जनता माझ्याबरोबर आहे. निवडणुकीत येथील मतदार मला भरभरून आशीर्वाद देतील याबाबत मला शंका वाटत नाही”.

धनंजय मुंडे म्हणाले, “मी खूप विश्वासाने परळीतील जनतेला आशीर्वाद मागू शकतो. कारण पाच वर्षांपूर्वी निवडणुकीला उभा होतो तेव्हा मी मतदारांना जे जे शब्द दिले ते सर्व प्रामाणिकपणे व इमानदारीने पाळले. जात, धर्म न मानता मनात कुठलीही गोष्ट न आणता मी लोकांची कामं केली. यंदाची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) शिवसेना (एकनाथ शिंदे) हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महायुती म्हणून ही निवडणूक लढणार असा निर्णय झाला. त्यावेळी स्वाभाविकपणे इथला विद्यमान आमदार असल्यामुळे आणि पंकजाताईंनी मन मोठं केल्यामुळे मला येथून उमेदवारी मिळाली आणि मी आता महायुतीचा उमेदवार म्हणून तुमच्यापुढे उभा आहे”.

Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Uddhav Thackeray on Pankaja Munde
Uddhav Thackeray: “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Bomb attack on Benjamin Netanyahu's house, Israeli Prime Minister's residence targeted.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, “शत्रूंनी….”
Salman Khan denies association with The Great Indian Kapil Show
“कुठे थांबायचं याचा विसर…”, भावना दुखावल्याने कपिल शर्माच्या शोमुळे सलमान खानला कायदेशीर नोटीस? अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण

हे ही वाचा >> Sharad Pawar : “राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं..” शरद पवारांची खोचक शब्दांत टीका

लोकसभेची पुनरावृत्ती होता कामा नये : धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते म्हणाले, “लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या या मतदारसंघात खूप राजकारण झालं जातीपातीचं, धर्माचं राजकारण केलं गेलं. मला त्यावर बोलायचं नाही. मात्र एक गोष्ट सांगायची आहे की हे काही सहज झालं नाही. या निवडणुकीतही अशाच पद्धतीने राजकारण व्हावं यासाठी कोणी प्रयत्न केले तर त्याला थांबवा. मागच्या निवडणुकीत कोणी काय केलं हे मी माझ्या भाषणातून सांगणार नाही. तुम्ही ज्या वेळेस झोपाल, त्यावेळी आपल्या ईश्वराला आठवून त्याला विचारा. मागच्या निवडणुकीत एक दोन नव्हे तर १२ जण यथून तुतारीची (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष) उमेदवारी मिळावी यासाठी शर्यतीत होते. एकाच घरातील आई, मुलगी, जावई असे सगळे जण प्रयत्न करत होते. मला काळजी होती की एकाच कुटुंबातील इतके जण उमेदवारीसाठी प्रयत्न करतायत, मात्र उमेदवारी कोणा एकट्यालाच मिळणार आहे. त्यामुळे मी त्यांच्यातीलच एकाला विचारलं की १२ पैकी एकाला उमेदवारी मिळाल्यानंतर बाकीचे तीन चार जण वेडे होतील आणि रस्त्याने कागद वेचत फिरतील.

हे ही वाचा >> Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!

दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी झालं तसं राजकारण, तशा प्रकारच्या घटना आता (विधानसभा निवडणुकीत) आपल्या मतदारसंघात होता कामा नयेत, याची सर्वांनी काळजी घ्या, असं आवाहन मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना व परळीतील जनतेला केलं आहे.