05 March 2021

News Flash

Dhule सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून स्थान मिळालेला एकमेव मतदारसंघ म्हणजे धुळे. स्थानिक खासदार डॉ. सुभाष भामरे हे संरक्षण राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळतात. गेल्या वेळी युतीच्या वाटाघाटीत ही जागा भाजपला मिळाली. या मतदारसंघात धुळे जिल्ह्य़ातील धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा तर नाशिक जिल्ह्य़ातील मालेगाव शहर, मालेगाव बाह्य़ आणि सटाणा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकदा जनसंघ, तीन वेळा भाजपला संधी मिळाली. अन्य कालावधीत मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले. २००९ मध्ये भाजपचे प्रतापराव सोनवणे, तर २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे डॉ. भामरे यांनी विजय मिळविला. गेल्या वेळी चर्चेतही नसलेले शिवसेनेचे डॉ. सुभाष भामरे यांचे नाव अचानक लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवार म्हणून पुढे आले. पक्षात निष्ठावान विरुद्ध नवखे प्रवेशकर्ते असे दोन गट पडले. पक्ष नेतृत्वाला समजूत काढून अंतर्गत कलह शमवावा लागला. मागील निवडणुकीत मोदी लाटेचा भाजपच्या बहुतांश उमेदवारांना फायदा झाला. डॉ. भामरे यांनी काँग्रेसचे अमरीश पटेल यांना जवळपास सव्वालाख मतांनी पराभूत केले. डॉ. भामरे यांच्यासमोर पटेल हे पराभूत होण्यामागे वेगवेगळी कारणे होती. एक तर पटेल यांचा शिरपूर विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात नाही. यामुळे ते आयात केलेले उमेदवार आहेत, असा प्रचार जाणीवपूर्वक केला गेला. निवडणुकीत जातीपातीचे राजकारण महत्त्वाचे ठरले. मराठा आणि मुस्लीमबहुल मतदारसंघात माजी मंत्री रोहिदास पाटील आणि पटेल यांच्यातील राजकीय दुही डॉ. भामरेंच्या पथ्यावर पडली. संसदेत प्रथमच खासदार म्हणून गेलेल्या भामरे यांच्यावर थेट संरक्षण खात्याच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली गेली. यामुळे प्रस्थापितांच्याही भुवया उंचावल्या. नुकत्याच झालेल्या धुळे महापालिका निवडणुकीत भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्याशी त्यांचे झालेले वाद सर्वश्रुत आहेत. मालेगाव येथील भाजप नगरसेवकांनी डॉ. भामरेंच्या कार्यपद्धतीवर वरिष्ठांकडे नाराजी प्रगट करत धुसफुस चव्हाटय़ावर आणली. साडेचार वर्षांत मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यावर भामरे यांनी भर दिला. मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग मंजुरी, रेल्वे मार्गातील पाच पूल, सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन प्रकल्प, रस्त्यांच्या कामांसाठी निधी मिळवला. विखरण येथे प्रस्तावित ५०० मेगावॉटचा सौर प्रकल्प, मालेगाव शहरात उड्डाण पुलाचे काम अशा विकासकामांच्या बळावर भाजप निवडणुकीला सामोरे जाईल. पक्षांतर्गत विरोधाला त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. लोकसभा निवडणूकपूर्व आढावा बैठकीत मालेगाव, सटाणा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दांडी मारून प्रदेशाध्यक्षांसमोर आपली नाराजी प्रगट केली. धुळ्यातून अनिल गोटे यांचा त्यांना विरोध आहे. शिवसेनेने वेगळी चूल मांडल्यास मतविभागणीचा लाभ पदरात पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

dhule Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Bhamre Subhash Ramrao
BJP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Dhule 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Anil Ramdas Jadhav
Baliraja Party
1
10th Pass
25
1.17 Lac / 0
Anil Umrao Gote
Loksangram
8
10th Pass
70
3.38 Cr / 2.81 Cr
Bhamre Subhash Shankar
IND
0
10th Pass
48
27.51 Lac / 3 Lac
Dhiraj Prakash Choradiya
IND
0
Graduate Professional
65
13.81 Lac / 0
Dilip Bhaidas Patil
BMUP
0
12th Pass
48
15.79 Lac / 0
Dinesh Punamchand Koli
IND
0
Others
29
2 Thousand / 0
Dipak Khandu Amrutkar
IND
0
8th Pass
44
39.5 Lac / 0
Dnyaneshwar Baliram Dhekale
IND
0
8th Pass
42
12.9 Lac / 5.5 Lac
Iqbal Ahamad Mohammed Rafiq
IND
0
12th Pass
41
2.57 Lac / 0
Irfan Mo Isahak
IND
0
Post Graduate
30
4.75 Lac / 0
Kasmi Kamal Hashim Mohammad Aajmi
IND
0
Others
50
5.36 Cr / 0
Kunal Rohidas Patil
INC
1
Graduate
45
42.1 Cr / 58.58 Cr
Meraj Bi Husain Khan
IND
0
5th Pass
49
7.3 Lac / 0
Mevati Heena Yusufbhai
Bhartiya Kisan Party
0
Graduate
45
75 Thousand / 0
Mo. Ismail Ansari
BMSM
0
Graduate
57
17.37 Lac / 25 Thousand
Mohammed Rizwan Mohammed Akbar
IND
3
Literate
45
29.73 Lac / 0
Nabi Ahamad Ahmadulla
Vanchit Bahujan Aaghadi
1
5th Pass
46
11.77 Cr / 0
Nandkumar Jagannath Chavhan
Rashtriya Jansena Party
0
12th Pass
48
14.29 Lac / 0
Nasim Khan Rauf Khan
IND
0
5th Pass
38
3.9 Lac / 0
Nitin Baburao Khare
IND
0
Post Graduate
33
1.35 Lac / 0
Pandharinath Chaitram More
Bhartiya Tribal Party
0
Post Graduate
36
20.71 Lac / 0
Pinjari Jainuddin Husain
Bahujan Maha Party
1
10th Pass
38
7.78 Lac / 3.8 Lac
Salim Kasam Pinjari
IND
0
8th Pass
56
60.25 Lac / 0
Sanjay Yashwant Aparanti
BSP
0
Post Graduate
59
3 Cr / 0
Sitaram Bhaga Wagh
Bahujan Republican Socialist Party
0
12th Pass
47
12.3 Lac / 4.5 Lac
Subhash Ramrao Bhamre
BJP
2
Post Graduate
66
15.87 Cr / 10 Lac
Tadvi Ayyub Khan Razzaque Khan
IND
0
8th Pass
47
27 Lac / 80 Thousand
Taher Sattar Khatik
Rashtriya Maratha Party
0
Graduate
49
6.73 Cr / 2 Lac

Dhule सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Ramdas Rupla Gavit
BJP
36.14%
2004
Chaure Bapu Hari
INC
46.25%
2009
Sonawane Pratap Narayanrao
BJP
39.3%
2014
Dr. Bhamre Subhash Ramrao
BJP
53.86%
2019
Bhamre Subhash Ramrao
BJP
56.54%

Dhule मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
DHULE RURALKunal (baba) Rohidas PatilINC
DHULE CITYAnil Anna GoteBJP
SINDKHEDAJaykumar Jitendrasinh RawalBJP
MALEGAON CENTRALShaikh Aasif Shaikh RashidINC
MALEGAON OUTERBhuse Dadaji DagduSHS
BAGLANChavan Dipika SanjayNCP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X