12 August 2020

News Flash

Dindori सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

मागील निवडणुकीत भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी लक्षणीय मताधिक्क्याने विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधली होती. ज्येष्ठतेमुळे त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. या मतदारसंघाचा तोंडावळा वेगळा आहे. निम्मा भाग आदिवासीबहुल, काही भाग सधन शेतीचा तर कुठे दुष्काळ कायमचा पुजलेला. पूर्वाश्रमीच्या मालेगाव मतदारसंघाचे पुनर्रचनेत स्वरूप बदलले. दिंडोरी हा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. मालेगाव मतदारसंघावर प्रदीर्घ काळ जनता दलाचे वर्चस्व राहिले. दिवंगत हरिभाऊ महाले यांनी हा गड काही निवडणुकांमध्ये राखला. २००४ च्या निवडणुकीत त्यांचा साडेचार हजारांच्या फरकाने पराभव करीत चव्हाण यांनी पाय रोवले. नव्या मतदारसंघात अधिक्याने मुस्लीम मतदार असणारे मालेगाव वगळले गेल्याने पुनर्रचना भाजपच्या पथ्यावर पडली. विधानसभा मतदारसंघात विरोधकांचा वरचष्मा असतांना सर्वपक्षीयांशी स्नेहाचे संबंध ठेवणाऱ्या चव्हाणांसमोर कोणाचे आव्हान उभे राहिले नव्हते. मोदी लाटेत त्यांनी काँग्रेस आघाडीच्या डॉ. भारती पवार यांचा दारुण पराभव केला. तेव्हा सेनेची रसद मिळाली होती. यंदा भाजप चव्हाणांना चवथ्यांदा संधी देईल, की नव्या चेहऱ्याला मैदानात उतरवेल हे अनिश्चित आहे. आदिवासीबहुल भागात चव्हाणांनी कामे केली असली तरी येवला, नांदगाव, चांदवड-देवळा तालुक्यांकडे दुर्लक्ष केल्याची भावना आहे. शेती हा स्थानिकांचा मुख्य व्यवसाय. तोच कोलमडल्याने शेतकरीवर्गात रोष आहे. गेल्या वेळी जिल्ह्य़ात मराठा-माळी वाद उफाळून आला होता. त्याचा भाजपला फायदा झाला. विकासकामांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी चव्हाणांनी केली आहे. सेना-भाजप युतीचे भवितव्य अधांतरी आहे. सेना स्वतंत्रपणे मैदानात उतरल्यास निवडणूक अधिक चुरशीची होईल. विरोधकांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपले गड कायम राखण्यासाठी ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. विधानसभेचे तीन मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीसाठी बारामतीनंतर सर्वात सुरक्षित मतदारसंघ असे दिंडोरीचे वर्णन केले होते. निकालाअंती तो असुरक्षित असल्याचे सिद्ध झाले. या वेळी शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना गळाला लावत राष्ट्रवादी बेरजेचे राजकारण करण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेस आघाडीचे महालेच उमेदवार असतील, या धास्तीने राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये नाराजी आहे. भारती पवार यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असे राष्ट्रवादीतील नेत्यांचे म्हणणे आहे. ऐनवेळी हे नाराज भाजप किंवा सेनेकडून उमेदवारी मिळवण्याची धडपड करतील. पेठ, सुरगाणा भागात माकपचा प्रभाव आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये त्यांचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता.

dindori Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Dr. Bharati Pravin Pawar
BJP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Dindori 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Ashok Jadhav
BSP
0
Graduate Professional
46
31.24 Lac / 14.77 Lac
Bapu Kelu Barde
Vanchit Bahujan Aaghadi
0
10th Pass
53
33.6 Lac / 2.2 Lac
Bharti Pawar
BJP
0
Graduate Professional
40
12.29 Cr / 14.5 Lac
Dadasaheb Pawar
Rashtriya Maratha Party
0
10th Pass
30
1.03 Lac / 1.05 Lac
Dattu Barde
Bhartiya Tribal Party
0
Graduate
54
2.24 Lac / 0
Dhanraj Mahale
NCP
1
12th Pass
44
1.2 Cr / 1.25 Cr
Gavit Jiva
CPI(M)
7
Graduate
70
2.22 Cr / 6.83 Lac
Tikaram Bagul
IND
0
Post Graduate
65
3 Cr / 0

Dindori सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
2009
Chavan Harishchandra Deoram
BJP
41.26%
2014
Chavan Harishchandra Deoram
BJP
55.95%
2019
Dr. Bharati Pravin Pawar
BJP
49.88%

Dindori मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
NANDGAONPankaj Chhagan BhujbalNCP
KALWANGavit Jiva PanduCPM
CHANDVADDr. Aher Rahul DaultraoBJP
YEVLAChhagan BhujbalNCP
NIPHADAnil Sahebrao KadamSHS
DINDORIZirwal Narhari SitaramNCP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X