राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पाहायला मिळत असून सध्या विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत. या सभेच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी नेत्यांकडून जनतेला आवाहन करण्यात येत आहे. याबरोबरच प्रचारसभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय टीका टीप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंचं मविआला थेट आव्हान

अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला थेट समोरासमोर येऊन चर्चा करण्याचं आव्हान दिलं आहे. वैजापूरमध्ये रमेश बोरनारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं. “महाविकास आघाडीने अडीच वर्षात काय केलं, आणि आम्ही काय केलं. याची खुली चर्चा करायला मी तयार आहे. मात्र, विरोधक हे आव्हान स्वीकारायला नाही. कारण त्यांनी अडीच वर्षांत काहीही केलं नाही”, अशी टीका त्यांनी केली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 Live : “अमित ठाकरे लहान, त्यांनी शांतपणे…”, संजय राऊतांचा खोचक सल्ला

“राज्यात अडीच वर्ष स्थगिती सरकार होतं”

पुढे बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्र सोडलं. “महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षांत अनेक विकास प्रकल्पांना स्थगिती दिली. राज्यात अडीच वर्ष स्थगिती सरकार होतं. त्यावेळी मंदिरं इतर प्रार्थनास्थळेही बंद केली होती. मात्र, महायुतीचं सरकार आलं आणि आपण राज्यातील सगळी मंदिरं उघडली. तसेच स्थगिती मिळालेल्या सगळ्या योजना पुन्हा सुरु केल्या”, असे ते म्हणाले.

“महाविकास आघाडीने आमचा वचननामा चोरला”

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीरनाम्याच्या मुद्द्यावरूनही महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. “महाविकास आघाडीने आमचा वचननामा चोरून त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. कॉपी पेस्ट करून जाहीरनामा बनवता येत नाही, हे त्यांना माहिती नाही”, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा – Video : वडेट्टीवार कन्येची शिव्यांची लाखोली, मोबाईल टॉर्चमधल्या सभेत नेमकं काय घडलं? वाचा…

“महायुतीचा जाहीरनामा म्हणजे फक्त ट्रेलर”

“महायुतीचा जाहीरनामा म्हणजे फक्त ट्रेलर आहे. संपूर्ण सीनेमा अजून यायचा बाकी आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० वरून २१०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही शेतकरी सन्मान योजनेचा निधीदेखील वाढवला आहे. प्रत्येकाच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत”, असेही त्यांनी सांगितलं.

Story img Loader