मुंबई – महापालिकेसह २९ महापालिकांसाठीचं मतदान सुरु झालं आहे. महापालिकेच्या रणधुमाळीत आपल्या आवडत्या पक्षाला, नेत्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक कलाकार प्रचारात उभारलेले दिसले. पक्षाची माळ गळ्यात घातलेल्या कलाकारांचे अनेक व्हिडीओही व्हायरल होत आहेत. दरम्यान प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मनसे अध्यक्ष ऱाज ठाकरेंसाठी खास पोस्ट लिहून ते स्टेटस ठेवलं आहे ज्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केलेली पोस्ट चर्चेत

अभिनेत्री तेजस्विनी पंडित. तिने भ्रष्ट हातांत पालिका देऊ नका अशी एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे ती चर्चेत होती. तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर बऱ्यापैकी चर्चेत असते. सामाजिक, राजकीय घडामोडींवर ती कायम तिचं स्पष्ट मत व्यक्त करताना दिसते. महापालिका निवडणुकीला उगी काही तास शिल्लक असताना अभिनेत्री तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांचा फोटो शेअर करत त्यांना पाठिंबा दर्शवलाय. या पोस्टचे सध्या एकच चर्चा आहे.

तेजस्विनीने केलेली पोस्ट काय?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल २० वर्षांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. मुंबई महापालिकेसाठी उद्धवसेना-मनसे- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशी मुख्य लढत होत आहे. राज्यातील सर्व महापालिकांसाठी आज १५ जानेवारी २०२६ मतदान पार पडणार आहे. मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांची नजर असताना अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठिंबा देणारी पोस्ट केली आहे. ‘ मोठी लढाई लढू. मातीसाठी रं गड्या .. मनगटाचा जोर लावून .. तू आभाळ आभाळ, वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दावजी…’ या गाण्याच्या ओळी कॅप्शन मध्ये लिहीत तेजस्विनीने राज ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला आहे.

Tejaswini Pandit Post For Raj Thackeray
अभिनेत्री तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठीची पोस्ट चर्चेत आली आहे.

तेजस्विनीने आधीही केली होती पोस्ट

तेजस्विनी पंडितने एक पोस्ट याआधीही केली होती. भ्रष्ट हातांत महापालिका देऊ नका अशी एक पोस्ट शेअर केली होती. तिने लिहिले,” आपल्या रोजच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी नगरसेवक असतात.म्हणूनच भ्रष्ट माणसांच्या हातात पालिका देऊ नका.सतर्क रहा.योग्य,सुज्ञ आणि सुशिक्षित उमेदवारांना निवडून द्या.” असं तिने लिहिलंय.यासोबत तिने एक व्हिडिओ आपला instagram वर रि-शेअर केलाय. राज्यातील २९ महानगरपालिकांतील एकूण २,८६९ जागांसाठी १५,९३१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जवळपास नऊ वर्षांच्या खंडानंतर होत असलेल्या या महानगरपालिका निवडणुका सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरल्या आहेत.