13 August 2020

News Flash

Gadchiroli Chimur सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

दांडगा जनसंपर्क, भेटणाऱ्यांची सदैव गर्दी आणि उजळ प्रतिमा या बळावर भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघावर पकड ठेवून असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीत ओबीसी आरक्षण, ग्रामसभांचा जनआक्रोश, सूरजागड लोहखाण व मेडीगट्टा-कालेश्वर प्रकल्पावरून जनतेत निर्माण झालेली नाराजी, बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न, माना समाजाची ओढवून घेतलेली नाराजी, पालकमंत्र्यांच्या विरोधात स्थानिकांचा रोष आणि भाजपतील अंतर्गत गटबाजी यामुळे हा मतदारसंघ कायम ठेवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. तर अंतर्गत गटबाजीमुळे संघटनात्मक पातळीवर पूर्णत: पोखरलेल्या काँग्रेस समोर भाजपकडून हा मतदारसंघ परत मिळविण्याचे आव्हान आहे. राज्याच्या एका कोपऱ्यावर वसलेल्या नक्षलवादग्रस्त गडचिरोली लोकसभा मतदारसंघात गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या तीन जिल्हय़ांतील अहेरी, गडचिरोली, आरमोरी, ब्रह्मपुरी, चिमूर व आमगाव या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. भौगोलिकदृष्टय़ा राज्यातील हा सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ मध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हा चिमूर लोकसभा मतदारसंघाचे चिमूर-गडचिरोली असे नामकरण झाले. त्यात गडचिरोली जिल्हय़ातील तीन, चंद्रपूर जिल्हय़ातील दोन तर गोंदिया जिल्हय़ातील एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. एकूण सहा विधानसभा क्षेत्रांपैकी पाच भाजपच्या ताब्यात तर ब्रह्मपुरी हे विधानसभा क्षेत्र काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे आहे. कधीकाळी या आदिवासीबहुल क्षेत्रावर काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व होते. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे मारोतराव कोवासे येथून लोकसभेत निवडून गेले होते. मात्र २०१४ मध्ये काँग्रेसने निष्क्रियतेचा ठपका ठेवत कोवासे यांचे तिकीट कापले. त्यांच्या ऐवजी नव्या दमाचे डॉ. नामदेवराव उसेंडी यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. मात्र मोदीलाटेत भाजपचे अशोक नेते यांनी डॉ. उसेंडी यांचा अडीच लाखांवर मतांनी पराभव केला. तेव्हापासून काँग्रेस पक्ष येथे अंतर्गत लाथाळ्यांमुळे अधिक कमजोर तर भाजप बळकट झाला. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असतानाही नेते यांना अतिदुर्गम मागास लोकसभा क्षेत्रासाठी विशेष काही करता आलेले नाही. त्यांच्या पाठपुराव्यामुळे देसाईगंज, गडचिरोली रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाची केवळ घोषणा झाली. सूरजागड लोह खाण प्रकल्पाविरोधात दक्षिण गडचिरोलीतील ग्रामसभांचा जनआक्रोशाने आंदोलनाचे स्वरूप धारण केल्यानंतरही लोकप्रतिनिधी म्हणून ते या प्रकल्पाला विरोध करू शकले नाही. मेडीगट्टा-कालेश्वर या प्रकल्पामुळे सर्वाधिक आदिवासींची संख्या असलेला अहेरी मतदारसंघातील सिरोंचा व असंख्य गावे उद्ध्वस्त होणार याची कल्पना असूनही त्यांनी याला साधा विरोध केला नाही. पालकमंत्री अंबरीशराव आत्राम यांनी प्रकल्पाचे काम थांबवू असे खोटे आश्वासन दिले. उलट तेलंगणा सरकाने युद्धपातळीवर या प्रकल्पाचे काम सुरू केले. त्यामुळे दक्षिण गडचिरोलीत भाजपविरोधात तीव्र नाराजीचा सूर आहे. पालकमंत्री आत्राम यांच्या विरोधात तर प्रचंड नाराजी आहेच. त्याचाही फटका खासदार नेते यांना बसू शकतो. तसेच स्वत: पालकमंत्री लोकसभेसाठी इच्छुक असल्यानेही भाजपत दोन गट पडले आहेत. पालकमंत्र्यांचे कार्यकर्ते खासदारांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत नाहीत तर खासदारांचे कार्यकर्ते पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाकडे फिरकत नाही. खासदार व पालकमंत्र्यांमध्ये समन्वय व ताळमेळ नाही. निवडणुकीच्या तोंडावर ही दरी कमी व्हायची तर ती वाढत चालली आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा व माना समाजाची ओढवून घेतलेली नाराजी भाजपला येथे अधिक त्रासदायक ठरणार आहे. काँग्रेस पक्षासाठी वातावरण चांगले असले तरी संघटनात्मक पातळीवर कमकुवत झालेल्या काँग्रेसला नवी उभारी मिळवून देण्यात जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी कमी पडले आहेत. विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार गडचिरोली जिल्हय़ावर पकड ठेवून आहेत. मात्र गटबाजीला त्यांनीच खतपाणी घातल्याने निष्ठावंत काँग्रेसी त्यांच्यावर नाराज आहेत.

Gadchiroli Chimur 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Ashok Mahadevrao Nete
BJP
0
12th Pass
55
5.01 Cr / 1.57 Cr
Deorao Monba Nannaware
Ambedkarite Party of India
0
Graduate Professional
59
48.92 Lac / 5.5 Lac
Harichandra Nagoji Mangam
BSP
0
12th Pass
44
50.1 Lac / 0
Namdeo Dalluji Usendi
INC
0
Post Graduate
48
1.62 Cr / 21.53 Lac
Rameshkumar Baburaoji Gajbe
Vanchit Bahujan Aaghadi
0
Post Graduate
66
1.07 Cr / 6 Lac

Gadchiroli Chimur सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
2009
Kowase Marotrao Sainuji
INC
38.43%
2014
Ashok Mahadeorao Nete
BJP
52.18%
2019
Ashok Mahadeorao Nete
BJP
45.5%

Gadchiroli Chimur मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
AMGAONPuram Sanjay HanwantraoBJP
ARMORIKrushna Damaji GajbeBJP
GADCHIROLIDr. Deorao Madguji HoliBJP
AHERIAmbrishrao Raje Satyavanrao AtramBJP
BRAHMAPURIWadettiwar Vijay NamdevraoINC
CHIMURBanti BhangdiyaBJP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X