शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर केला असून त्यांची सुटका करण्यात आली आहे. ३० हजारांच्या जात मुचलक्यावर नितेश राणेंची सुटका करण्यात आली. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर कोल्हापूरच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नितेश राणेंना जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर ते सिंधुदुर्गात दाखल झाले होते. विशेष म्हणजे रात्री ते थेट गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पोहोचले होते.

जामीन मिळाल्यानंतर नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया, इशारा देत म्हणाले, “त्या दिवशी अनेकांना ब्लड प्रेशरचा…”

rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त
nashik ex soldier fraud marathi news
माजी सैनिकाला कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्यास गोव्यात अटक

गोव्यात गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. या सभेला नितेश राणेंनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी गोव्यात ठाण मांडून बसलेले विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर बंद खोलीत दोघांची चर्चा झाली. गोवा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचं सांगत नितेश राणे यांना जास्त बोलणं टाळलं.

“मला कोणी अटक करु शकलं नाही”

जामीन मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत इशारा दिला होता. “मला कोणी अटक करू शकले नाही. माझ्या सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून मी कुटुंबीय आणि वकिलांशी चर्चा करून स्वतः सरेंडर झालो,” नितेश राणे यांनी दिली. “दरम्यान थोडे दिवस आता आराम करणार आहे. त्यानंतर मुंबईत पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेकांना बीपीचा त्रास होईल हे मात्र निश्चित,” असा इशाराही त्यांनी दिली आहे. विरोधकांकडून सुरु असलेले राजकारण अत्यंत खालच्या पद्धतीचे असल्याचे त्यांनी यावेळी ते म्हणाले.

. “मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. पोलीस तपास कामात अडथळा येण्यासारखे काही केले नाही. मी जबाबदारीने वागत होतो, परंतु नाहक राजकीय त्रास देण्याचा प्रयत्न झाला. ज्या दिवशी स्वतः पोलिसांकडे हजर झालो तेव्हा न्यायालयाने दिलेल्या सुरक्षेतील चार दिवस बाकी होते. परंतु त्या ठिकाणी माझी गाडी जाणीवपूर्वक अडवण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील माझ्या लोकांना त्रास नको म्हणून मी माझ्या कुटुंबीय व वकिलांशी चर्चा करून मी सरेंडर झालो. मला ते कोणी अटक करू शकले नाही,” असे ते म्हणाले.

Nitesh Rane Bail: संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

“आता या ठिकाणी आल्यानंतर दोन चार दिवस आराम करणार आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन दोन दिवस राहणार आहे. त्याठिकाणी काही तपासण्या केल्यानंतर उर्वरित तपासण्या मुंबईत जाऊन करणार आहे,” अशी माहित नितेश राणे यांनी दिली.

नितेश राणेंना कोल्हापूरला हलवलं; छातीत दुखू लागल्याने रुग्णवाहिकेतून रवाना

“माझ्या तपासण्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या. मशीनद्वारे तपासणी झाली. माझा ब्लड प्रेशर, शुगर अशा गोष्टी वाढल्या हे सत्य होते. परंतु त्या ठिकाणी नाहक टीका करण्यात आली. अशा गोष्टीत राजकारण करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून योग्य नाही,” असं नितेश राणे म्हणाले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली मुख्यमंत्री अधिवेशन काळात आजारी का पडतात असा प्रश्न केला तर चालेल का? अशी विचारणा त्यांनी टीका करणाऱ्यांना केली.