विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊतांनी मुंबईत शिवसेनाच दादा असल्याचं म्हणत आम्ही घुसलो तर नागपुरात जाणं मुश्किल होईल असं म्हणत फडणवीसांना आव्हान दिलं. यावर देवेंद्र फडणवीसांनी सिंह कधी गिधाडाला घाबरत नाही, असं म्हणत राऊतांना प्रत्युत्तर दिलं. तसेच संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता येऊन मनोरंजन करतात, असं म्हणत टोला लगावला. ते गोव्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाही. ईडी काय करते, का करते हे ईडी सांगेल. संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता येऊन मनोरंजन करतात. यापेक्षा जास्त त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिलं जाऊ शकत नाही. त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी कोर्टासमोर ती मांडावी.”

“रात्रत दिवसभर आपलंच नाव चर्चेत राहावं असं वक्तव्य करतात”

“संजय राऊत संपादक आहेत. त्यांना माहिती आहे की हेडलाईन कशी द्यायची. दिवसभर आपलंच नाव चर्चेत राहावं असं ते वक्तव्य करतात,” असं म्हणत फडणवीसांनी राऊतांवर निशाणा साधला. तसेच मोदी सरकारने कुणावरही अन्याय केलेला नाही. मोदी सरकारमध्ये असं कधीही होत नाही, असं म्हणत ईडीबाबतच्या आरोपांचं फडणवीसांनी खंडन केलं.

“मुंबईचा दादा शिवसेना आहे”, राऊतांचं फडणवीसांना आव्हान

“माझ्या मुलीच्या लग्नातील फुलवाला, डेकोरेशनवाल्या ईडीवाल्यांन उचलून आणलं. हे त्यांचं काम आहे का? किती पैसे मिळाले विचारलं असता डेकोरेशनवाल्याने आपले कुटुंबाशी चांगले संबंध असल्याने पैसे घेतले नसल्याचं सांगितलं. ती मुलगी माझ्यासमोर मोठी झाली आहे, ते माझ्या कुटुंबासारखे आहेत..मी कसे पैसे घेणार असं त्याने सांगितलं. पण त्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावण्यात आलं. ही काय दादागिरी आहे. ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे,” असं राऊतांनी सांगितलं.

“सूत्रधार कोण आहेत? ईडी कार्यालयात जाऊन बेकायदेशीरणे भाजपाचे लोक बसतात, त्यांना माहिती, आदेश देतात. मी फडवणीसां आवाहन करत आहे. त्यांना माहिती आहे मला काय सांगायचं आहे,” असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.

हेही वाचा : पत्रातून गौप्यस्फोट केल्यानंतर संजय राऊतांचं भाजपाला जाहीर आव्हान; “इच्छा असेल तर कोठडीत जाऊ, पण…”

“उद्धव ठाकरेंच्या कुटुंबीयांनाही खूप त्रास दिला जात आहे. रोज कोणीतरी उठतं आणि बेवड्यासारखा बडबडतो नंतर ईडी त्याच्यावर कारवाई करतं. मी मागेही म्हणालो होतो की, आम्ही तुमच्या घरात घुसलो तर नागपूरलाही जाता येणार नाही,” असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला. संजय राऊतांनी यावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे.

More Stories onमुंबईMumbai
मराठीतील सर्व गोवा विधानसभा निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis answer sanjay raut over challenge in mumbai pbs
First published on: 09-02-2022 at 14:00 IST