scorecardresearch

Premium

गोव्यात अल्वपयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पुण्यातील नऊ पर्यटकांना अटक

कळंगुट पोलिसांना ११ पर्यटक जबरदस्तीने एका अल्पवयीन तरुणीचे फोटो काढत असल्याची तक्रार मिळाली होती

गोव्यात अल्वपयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पुण्यातील नऊ पर्यटकांना अटक

अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्याच्या नऊ पर्यटकांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी तरुणीच्या भावाला मारहाण केल्याचाही आरोप होता. मंगळवारी संध्याकाळी कळंगुट बीचवर ही घटना घडली होती. पोलिसांनी कारवाई करत नऊ जणांना अटक केली आहे. हे सर्वजण पुण्याचे आहेत.

पोलीस निरीक्षक दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंगुट पोलिसांना ११ पर्यटक जबरदस्तीने एका अल्पवयीन तरुणीचे फोटो काढत असल्याची तक्रार मिळाली होती. जेव्हा तिच्या अल्पवयीन भावाने मध्यस्थी करत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली. संध्याकाळी ५.३० वाजता हा सगळा प्रकार घडला.

chakan police arrest five for threatening businessman for extortion of 1 crore
चाकण: एक कोटींच्या खंडणीसाठी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी; घरच्यांचा गेम करेल म्हणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या
mns mla raju patil slams corrupt kdmc officials over pothole
“गणपतीसाठी चांगला रस्ता न बनविणाऱ्या सत्ताधाऱ्यांना येत्या निवडणुकीत…”, राजू पाटील यांची टीका
girls physical abused Bramhapuri Taluka
संतापजनक! दोन अल्पवयीन मुलींना वह्या देण्याचे आमिष दाखवून शौचालयात अत्याचार
crime news
बाणेरमधील धक्कादायक घटना; बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा खून करून तरुणाची आत्महत्या

जेव्हा शॅक मालकांनी आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर पोलिसांना तात्काळ कारवाई करत काहीजणांना हॉटेलमधून अटक केली तर काहीजण गोव्यातून पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली.

आरोपींपैकी दोघे अल्पवयीन असल्याची माहिती दळवी यांनी दिली आहे. त्यांना अपना घरमध्ये ठेवण्यात आलं असून, इतरांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रमेश कांबळे, संकेत भंडाळे, कृष्णा पाटील, सत्यम लांबे, अंकित गुरव, ह्रषिकेश गुरव, आकाश सुवसकर, सनी मोरे आणि ईश्वर पंगारे अशी आहेत. हे सर्वजण पुण्याचे रहिवासी आहेत. ज्या मोबाइलमधून तरुणीचे फोटो काढण्यात आले तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व गोवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nine tourist from pune arrested by goa police for teasing minor girl

First published on: 30-05-2018 at 19:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×