गोव्यात पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता विविध राजकीय पक्षांनी मिशन २०२२ साठी तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. भाजपा, काँग्रेस, शिवसेना, आप, टीएमसी हे पक्ष राजकीय आखाड्यात उतरले आहेत. यावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपली भूमिका मांडली आहे.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रमोद सावंत म्हणाले, “लोक आमच्या बरोबर आहेत. विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरी मला विश्वास आहे. परत एकदा भाजपाचं सरकार गोव्यामध्ये स्थापन होईल. गोव्या मुख्यत: विरोधक म्हणून काँग्रेस पक्ष आहे. बाकी कोणी विरोधक असणार नाही. प्रथम राज्य म्हणून मी काम करत आहे. राज्याच्या हिताच्या आड येणाऱ्या प्रत्येक मानसाला मी घरी पाठवले आहे.”

यावेळी प्रमोद सावंत यांनी आप वर जोरदार हल्ला चढवला. आपने आधी स्वतःच्या राज्यात कीती जणांना नोकऱ्या दिल्या ते बघावं त्यानंतर गोव्यात पोस्टरबाजी करावी, असे सावंत म्हणाले.