देशातल्या पाच राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे. त्यानिमित्त सर्वच पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे. गोव्यामध्येही निवडणुकीची धामधूम दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः भाजपाच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज गोव्यात केलेल्या एका वक्तव्याने लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोव्यात पोंडा शहरात झालेल्या एका सभेत बोलताना अमित शाह म्हणाले, भाजपाने गोव्याचा विकास केला. गांधी परिवारासाठी गोवा फक्त सुट्टी एन्जॉय करण्याचं ठिकाण आहे. भाजपासाठी गोवा म्हणजे गोल्डन गोवा. पण काँग्रेससाठी गोवा म्हणजे गांधी परिवाराचा गोवा. आम्ही राज्याचं बजेट ४३२ कोटींहून २,५६७ कोटींवर आणलं आहे.

अमित शाह पुढे म्हणाले की माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गोव्याच्या विकासासाठी काहीही केलं नाही. भाजपाने मात्र दिलेला शब्द पाळला. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कामाचं कौतुकही केलं. ते म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री सावंतजी, मनोहर पर्रिकरांच्या गोल्डन गोव्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खूप कष्ट घेत आहेत.

गोव्यातल्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचं उदाहरण देताना अमित शाह म्हणाले, गोव्यातला लसीकरणाचा वेग देशात सर्वाधिक आहे. प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळात सर्वाधिक वेगाने १०० टक्के लसीकरणाचं लक्ष गाठण्यात गोवा यशस्वी ठरला आहे. स्टार्टअप पॉलिसीबद्दल बोलताना अमित शाह यांनी हा विश्वास वर्तवला की गोव्यामध्ये २०२५ पूर्वी अनेक स्टार्टअप्स असतील. त्यांनी असंही सांगितलं की भाजपा ३००० कोटींचं आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारेल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa elections 2022 amit shah bjp congress rahul gandhi sonia gandhi priyanka gandhi vsk
First published on: 30-01-2022 at 19:29 IST