गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. सध्या भाजपा एकूण १५४ जागांवर आघाडीवर असून त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. याच कारणामुळे भाजपाच्या गोटात जल्लोषाला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला मात्र या निवडणुकीत चांगलाच फटका बसला आहे. ही निवडणूक आम आदमी पार्टीसाठी विशेष ठरली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आप पक्ष गुजरात राज्यात प्रवेश करत आहे. या पार्श्वभूमीवर आप पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांनी मोठे विधान केले आहे. आता आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष म्हून नावारुपाला येत आहे. राष्ट्रीय राजकारणात शिक्षण, आरोग्य यावर आधारित राजकारणाला महत्त्व येत आहे, असे मनिष सिसोदिया म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा>>>> गुजरातमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता! प्राथमिक निकालानंतर राजनाथ सिंह यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले “विजयाचे आम्हाला नवल नाही, कारण…”

आप पक्षाचा गुजरात राज्यात प्रवेश

गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आम्ही गुजरातमध्ये जिंकत आहोत, माझ्याकडून लिहून घ्या, असे विधान केले होते. विशेष म्हणजे काही माध्यमांसमोर त्यांनी तसे लिहूनही दिले होते. प्रत्यक्ष मात्र या निवडणुकीत भाजपाने मुंसडी मारली असून ते सत्ता स्थापन करत आहेत. दुसरीकडे सत्ता स्थापन करता आली नसली तरी या निवडणुकीच्या माध्यमातून आप पक्ष गुजरात राज्यात प्रवेश करत आहे. कारण सध्या आप पक्ष सहा जागांवर आघाडीवर आहे. तसेच आम आदमी पार्टीला आतापर्यंत १२.७५ टक्के मतं मिळाली आहेत. याच कारणामुळे आप पक्षाकडून समाधान व्यक्त केले.

हेही वाचा>>>> Gujarat Election Results 2022 Live :…हे लोकशाहीसाठी घातक, नाना पटोलेंनी मांडलं स्पष्ट मत; वाचा प्रत्येक अपडेट

मनिष सिसोदिया काय म्हणाले?

आम आदमी पार्टीकडून गुजरातमधील निवडणुकीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. आमचा आता गुजरात राज्यात प्रवेश झाला आहे, असे आप पक्षाचे नेते म्हणत आहेत. “गुजरातमधील जनतेने आम्हाला चांगली मतं दिली. याच मतांच्या जोरावर आम्ही आता राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारुपाला येत आहोत. राष्ट्रीय राजकारणात शिक्षण, आरोग्य हे महत्त्वाचे मुद्दे बनत आहेत. पूर्ण देशाला शुभेच्छा,” अशी प्रतिक्रिया मनिष सिसोदिया यांनी दिली आहे.

गुजरातमध्ये कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

हेही वाचा>>>> Himachal Pradesh Election Results 2022 Live : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची मुसंडी, भाजपा पिछाडीवर, जाणून घ्या निकाल

गुजरातमध्ये सध्या भाजपा चांगली कामगिरी करताना दिसत आहे. सध्या भाजपा येथे १५२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसचे उमेदवार २० जागांवर आघाडीवर आहेत. आम आदमी पार्टीचे ६ उमेदवार सध्या आघाडीवर आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat assembly election result 2022 aap lead in 6 seater manish sisodia congratulatory party prd
First published on: 08-12-2022 at 12:40 IST