Haryana Election 2024 Ashok Tanwar Rejoins Congress Was Seeking Votes For BJP Hours Back : कोणत्याही निवडणुकीत मतदान होत नाही तोवर कधीही राजकीय समीकरणं बदलू शकतात. कोणताही लहान-मोठा नेता कुठल्याही क्षणी पक्ष बदलू शकतो. अशीच काहीशी स्थिती हरियाणात पाहायला मिळाली आहे. हरियाणात विधानसभेची निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचे नेते आपापल्या पक्षांचा, उमेदवारांचा प्रचार करत आहेत. अशातच भाजपाचा एक नेता निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसमध्ये दाखल झाला आहे. हा नेता दुपारी दोनच्या सुमारास भाजपा उमेदवारांसाठी मतं मागत होता. मात्र काहीच वेळात, दुपारी तीनच्या सुमारास त्याने पक्ष बदलला. अशोक तन्वर असं या नेत्याचं नाव असून त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार काही वेळात थांबणार आहे. त्याआधीच तन्वर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे नेते, खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज हरियाणातील जींद येथे प्रचारसभा घेतली. यावेळी अशोक तन्वरही मंचावर उपस्थित होते. त्यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काही वेळापूर्वी ते भाजपाचा प्रचार करत होते. अशोक तन्वर यांच्या काँग्रेस पक्षातील प्रवेशाचा व्हिडीओ काँग्रेसने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर केला आहे.

vidhan sabha election 2024 kalyan east assembly constituency mahesh gaikwad file nomination as a independent candidate
Maharashtra Assembly Election 2024 : कल्याण पूर्वेत महेश गायकवाड यांची एकाकी लढत
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Ratnagiri and Sindhudurg
कोकणातून काँग्रेसचा ‘हात’ गायब; रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यांत एकही जागा नाही
Dr Hemant Chimote has been nominated from Melghat constituency
मेळघाटातून काँग्रेसचा नवा डाव; जनाधार पुन्हा मिळवण्याचे आव्हान
Asaram Borade, Partur assembly Constituency,
परतूरमध्ये काँग्रेसला धक्का; मतदार संघ शिवसेनेकडे
uddhav thackeray
Maharashtra Vidhan Sabha : ठाकरे गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, पाहा सर्व ८३ शिलेदारांची नावं एकाच क्लिकवर
verbal argument between sanjay raut and vijay wadettiwar
जागावाटपावरून पुन्हा ताणाताणी; संजय राऊत वडेट्टीवार यांच्यात शाब्दिक वाद
paithan vidhan sabha
परंडा व पैठण मतदारसंघांत ठाकरे गटात पेच

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे, त्यामुळेच…”; देवेंद्र फडणवीस यांची टीका

एका तासात पक्ष पदलला

दुपारी १.४५ वाजता अशोक तन्वर यांनी फेसबूकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये ते भाजपाच्या मंचावर दिसत आहेत. त्यांनी नलवा मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या संभेला संबोधित केलं. त्यानंतर त्यांनी २.५२ वाजता दुसरी फेसबूक पोस्ट केली आहे. यामध्ये ते राहुल गांधींबरोबर एकाच मंचावर दिसत आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

अशोक तन्वर हे हरियाणा निडणुकीत भाजपाच्या स्टार प्रचारकांपैकी एक होते. भाजपाने त्यांना निवडणूक प्रचार समितीचे सदस्य म्हणून नेमलं होतं. मात्र आज दुपारी ते राहुल गांधी यांच्या जींद येथील प्रचारसभेवेळी काँग्रेसच्या मंचावर दाखल झाले आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हे ही वाचा >> राहुल गांधींची भेट, पवारांचे डावपेच; साखरपट्टा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीची रणनीती काय?

हरियाणात पुन्हा भाजपाचं सरकार येणार : तन्वर

अशोक तन्वर यांनी आज नलवा विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार रणधीर पनिहार यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या प्रचारसभेला हजेरी लावली. बुधवारी देखील ते पनिहार यांच्या प्रचारासाठी आयोजित रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी दावा केला होता की नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तिसऱ्यांदा हरियाणात सरकार स्थापन करेल.