04 August 2020

News Flash

Hatkanangle सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार कोण आणि ते यंदा हॅट्ट्रिक करणार का, हे दोन महत्त्वाचे मुद्दे बनले आहे. डावी आघाडी, महायुती यांचे पाठबळ घेऊन दोनदा लोकसभेत पोहचलेले शेट्टी आता काँग्रेस- राष्ट्रवादीशी जवळीक साधताना दिसत आहेत. आजवर ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांचीच मदत या वेळी त्यांना मिळणार असली तरी हे समीकरण त्यांना कितपत लाभदायक ठरेल, याबाबत साशंकताच आहे. सत्तेत असूनही ऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा ही शेट्टी यांची जमेची बाजू. वस्त्रोद्योग, वारणा पाणी योजना यासारखे काही मुद्दे त्यांना त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार कोण हे निश्चित झालेले नसले तरी शरोळचे आमदार उल्हास पाटील आणि शिवबंधन बांधलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांची नावे आघाडीवर आहेत. त्यांचा चळवळीतील नेतृत्व असलेले शेट्टी यांच्याशी सामना कसा होणार हा मुद्दा आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टी यांच्यामुळे चर्चेत आहे. ऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीने चव्हाटय़ावर आणण्यात शेट्टी यशस्वी ठरले, त्याआधारे त्यांनी जिल्हा परिषद ते लोकसभा असा राजकीय प्रवासही केला. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी डावे, समाजवादी पक्षांची साथ मिळवून दोनदा खासदार झालेल्या राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांना पराभूत केले. तर, गेल्या वेळी भाजप-शिवसेना महायुतीतून काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना पराभूत केले होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे खासदार असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कडवटपणे आव्हान देणाऱ्यांमध्ये शेट्टी आघाडीवर राहिले. या वेळी दोन्ही काँग्रेसने शेट्टी यांच्या पाठीशी राहण्याचे ठरवले आहे. शेतकरी हाच शेट्टी यांचा राजकारणाचा मूलाधार राहिला आहे. स्वाभाविकच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आवाज उठवण्याचा त्यांचे प्राधान्य राहिले आहे. देशातील १२५ पेक्षा अधिक शेतकरी संघटनांचा नवी दिल्लीत भव्य मोर्चा काढून त्यांनी आपले स्थान राष्ट्रीय पातळीपर्यंत उंचावले आहे. हे करीत असताना मतदारसंघावरील मांड ढिली झाली आहे. मात्र, विकास केल्याचा त्यांचा दावा कायम आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपयांचा फायदा थेट शेतकऱ्यांच्या पदरात पडला आहे. कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे, रेल्वे विद्युतीकरण, केंद्रीय मार्ग निधी योजनेतून मोठय़ा प्रमाणात रस्ते, पूल, रेल्वे उड्डाण पूल यांची निर्मिती, क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम, खेडय़ांचे विद्युतीकरण अशी अनेक कामे केली आहेत. वस्त्रोद्योगाचे अनुदान मिळवून देण्यापासून त्याचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याचा त्यांचा दावा आहे. याच वेळी विरोधकांकडून मात्र शेट्टी हे विकासाची कामे करण्यात अपयशी ठरल्याची टीका केली जाते. मतदारसंघात शेतीच्या बरोबरीने औद्योगिक विस्तार मोठा आहे, पण उद्योग आणि उद्योजकांना शेट्टी यांनी वाऱ्यावर सोडल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातो.

hatkanangle Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Dhairyasheel Sambhajirao Mane
SS
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Hatkanangle 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Aitawade Vidyasagar Devappa
IND
0
Literate
73
1.6 Lac / 0
Ajay Prakash Kurane
BSP
0
Graduate
44
35.15 Lac / 0
Anandrao Vasantrao Sarnaik (Fouji Bapu)
IND
0
8th Pass
58
2.16 Cr / 70 Lac
Aslam Badshahaji Sayyad
Vanchit Bahujan Aaghadi
0
5th Pass
56
2.32 Cr / 37.82 Lac
Dhairyashil Sambhajirao Mane
SHS
0
Graduate
38
4.78 Cr / 4.16 Cr
Dr. Nitin Udal Bhat
IND
0
Graduate Professional
34
20.33 Lac / 0
Dr.Prashant Dnyaneshwar Gangavane
Bahujan Republican Socialist Party
1
Doctorate
36
6.24 Cr / 95 Thousand
Kamble Vishwas Ananda
IND
0
Graduate
53
7.63 Lac / 0
Kishor Rajaram Panhalkar
IND
0
Graduate
27
76.14 Thousand / 0
Madan Vajir Sardar
BMUP
0
10th Pass
40
6.46 Lac / 0
Mahadev Jagannath Jagadale
IND
0
10th Pass
35
1.27 Lac / 88 Thousand
Patil Raghunath Ramchandra
IND
9
Graduate Professional
68
3.1 Cr / 10 Lac
Raju Mujikrao Shetty
Bahujan Maha Party
0
10th Pass
67
42.36 Lac / 0
Sangramsinh Jaysingrao Gaikwad
IND
0
Graduate
61
27.9 Lac / 0
Sanjay Ghanshyam Agrawal
IND
0
12th Pass
49
68.24 Lac / 2.08 Lac
Shetty Raju Anna
SWP
15
10th Pass
51
2.44 Cr / 7.74 Lac
Vijay Bhagwan Chougule
IND
0
10th Pass
42
32.46 Lac / 1 Lac

Hatkanangle सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
2009
Shetti Raju Alias Devappa Anna
SWP
49.17%
2014
Raju Shetty
SWP
53.87%
2019
Dhairyasheel Sambhajirao Mane
SHS
46.78%

Hatkanangle मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
SHAHUWADISatyajeet Babasaheb Patil (aba) SarudkarSHS
HATKANANGLEDr. Minchekar Sujit VasantraoSHS
ICHALKARANJISuresh Ganpati HalvankarBJP
SHIROLPatil Ulhas SambhajiSHS
ISLAMPURJayant Rajaram PatilNCP
SHIRALANaik Shivajirao YashwantraoBJP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X