Himachal Pradesh Exit Polls Updates, 8 December 2022 : हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होत. येथे विधानसभेच्या ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात ७५.६ टक्के मतदान झाले होते. या राज्यात प्रत्येक पाच वर्षांत सत्ताबदल होतो. हीच परंपरा यावेळीही कायम राहिली आहे. येथे काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे येथे काँग्रेसच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील निवडणुकीत भाजपाने ६८ पैकी ४४ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. तर काँग्रेसला केवळ २१ जागा जिंकता आल्या होत्या.