Himachal Pradesh Election 2022 Exit Polls Result Updates : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात होते आणि या निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात ७५.६ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत मुख्यमंत्री जयराम ठाकुर, माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंहांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर, हिमाचल प्रदेशातील नागरिक भाजपाला पुन्हा संधी देतील, की विरोधी पक्ष काँग्रेससाठी सत्तेचा मार्ग मोकळा करतील, याची सर्वांना उत्सुकता आहे. ८ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल आहे. मात्र तत्पुर्वी विविध एक्झिट पोलनुसार निकाल समोर आले आहे.

Aaj Tak-Axis My India च्या एक्झिट पोलनुसार हिमाचलप्रदेशमध्ये भाजपाला २४ ते ३४ आणि काँग्रेसला ३० ते ४० जागा मिळत असल्याचे दिसत आहे. आम आदमी पार्टीचा सुपडासाफ होण्याची चिन्ह आहेत. याशिवाय ४ ते ८ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून येणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. बहुमतासाठी ३५ जागा जिंकाव्या लागणार आहेत. भाजपाला ४२ टक्क मतं, काँग्रेसला ४४ टक्के आणि आम आदमी पार्टीला केवळ दोन टक्के मत मिळताना दिसत आहेत.

congress in rajasthan loksabha (1)
जाट समाजाची भाजपावर नाराजी काँग्रेसच्या पथ्यावर?
BJP worker shiv shankar das
‘भाजपा जिंकू दे, तुला घरातून उचलून आणेन’, कार्यकर्त्याची महिलेला धमकी; पोलिसांनी केली अटक
sangli congress, congress leaders sangli latest marathi news
सांगलीत काँग्रेसचे भवितव्य काय ? विधानसभेत फटका बसण्याची नेत्यांना भीती
Gourav Vallabh gives reasons why he left Congress party and joined BJP
सनातन धर्म, राम मंदिर आणि भाजपाचीच भाषा; गौरव वल्लभ यांनी अचानक का सोडला काँग्रेस पक्ष?

हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झंझावाती प्रचार केला होता. “उमेदवार बघू नका, कमळाला मत म्हणजेच मला मत”, असं म्हणत भाजपाला मतदान करण्याचं आवाहन मोदींनी नागरिकांना केलं होतं. निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. हा पराभव यावेळी विजयात बदलण्याचं आव्हान काँग्रेसपुढे होतं.

मागील निवडणुकीत भाजपाने ६८ पैकी ४४ जागांवर विजय मिळवत बहुमताने सरकार बनवले होते. तर काँग्रेसला केवळ २१ जागा जिंकता आल्या होत्या. गुजरातप्रमाणेच हिमाचलमध्येही भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात त्रिशंकु लढत होती.