लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यापैकी दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सध्या सर्वच ठिकाणी प्रचाराची धामधूम जोरात सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सभा, रॅली, मेळाव्यांचा धडाका सुरू आहे. अशातच मोठी बातमी समोर आली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हैदराबादमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची १ मे रोजी हैदराबादमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्यानिमित्ताने रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत अमित शाह यांच्यासह तेलंगणा भाजपाचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. या रॅलीमधील काही फोटो समोर आले असून या फोटोमध्ये अमित शाह यांच्याबरोबर व्यासपीठावर काही लहान मुले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात तेलंगणा काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयोगाने याची दखल घेतली. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.

Nagpur, smart prepaid meters, Devendra Fadnavis, Anti Smart Electric Meter Citizen Struggle Committee, Mahavitaran, protest, electricity sector
सरकारवर लोकांचा विश्वास नाही? स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात पुन्हा आंदोलन…
charulata tokas
‘या’ बड्या महिला काँग्रेस नेत्यास थेट मुख्यमंत्र्यांकडूनच विधानसभेची ऑफर…पक्षात घुसमट होत….
narsayya adam, narsayya adam master,
विधानसभेची उमेदवारी गृहीत धरून नरसय्या आडम यांचे ‘व्होट भी-नोट भी’ अभियान सुरू 
Rahul Gandhi criticizes Prime Minister Narendra Modi government policies BJP
लोकसभेत धुमश्चक्री; राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Opponents displeasure over emergency protest proposal
आणीबाणीच्या निषेधाच्या प्रस्तावावर विरोधकांची नाराजी
mamta banerjee on tista river water
भारत-बांगलादेशच्या पाणीवाटप चर्चेवरून भडकलेल्या ममतादीदींचे पंतप्रधानांना पत्र; नेमके प्रकरण काय?
Bhiwandi, Congress Corporator Siddheswar Kamurti and Family Booked for Alleged illegal asset, Former Bhiwandi Congress Corporator, illegal asset, illegal money, anti corruption Bureau, marathi news, Bhiwandi news,
भिवंडीत काँग्रेसच्या माजी नगरसेवकाविरोधात अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल , ठाणे एसीबीची कारवाई
After defeat of Ajit Pawars NCP in Pimpri-Chinchwad former corporators office bearers are uneasy
अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला बालेकिल्ल्यात खिंडार?

हेही वाचा : “मोदींच्या कुटुंबाची परिस्थिती चिंताजनक…”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर

काँग्रेसने तक्रारीत काय म्हटलं?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत तेलंगणा काँग्रेस पक्षाचे नेते निरंजन रेड्डी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, १ मे रोजी भाजपाची हैदराबादमध्ये रॅली पार पडली. या रॅलीमध्ये अमित शाह यांच्यासह आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी रॅलीदरम्यान अमित शाह यांच्याबरोबर काही लहान मुले व्यासपीठावर दिसून आली आहेत.

व्यासपीठावरील या लहान मुलांच्या हातात भाजपाचे चिन्ह कमळ असणारे एक फलक धरण्यात आले आहे. त्यामुळे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे निरंजन रेड्डी यांनी आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. निरंजन रेड्डी यांनी पुढे असेही म्हटले की, लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आयोगाने काही महत्वाच्या सूचनाही प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामध्ये राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचारात किंवा सभा आणि निवडणकीच्या संबंधित मोहिमेमध्ये लहान मुलांचा वापर करण्यात येऊ नये, असे बजावले होते.

दरम्यान, निरंजन रेड्डी यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी अमित शाह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच अमित शाह यांच्याबरोबर टी यमन सिंह, भाजपाचे ज्येष्ठ नेते जी किशन रेड्डी आणि आमदार टी राजा सिंह यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची पुढील चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.