Premium

‘मंत्रीपदासाठी बोगस फोन, माझ्या स्वाक्षरीचं खोटं पत्र येऊ शकतं’, मोदींनी सावधगिरीचा इशारा का दिला?

NDA government formation meeting : ‘तुम्हाला मंत्री बनवतो’, असे सांगणारा फोन आला किंवा माझ्या स्वाक्षरीचे मंत्र्यांची यादी असणारे पत्र व्हायरल झाले, तर जरा सांभाळून रहा, नरेंद्र मोदींनी सावध राहण्याचा सल्ला का दिला.

Narendra Modi warn mps
पंतप्रधान मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत खासदारांना सावधानतेचा इशारा दिला. (ANI)

NDA meeting for government formation : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज एनडीएच्या घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांची आणि निवडून आलेल्या खासदारांची एकत्रित बैठक संसदेच्या केंद्रीय सभागृहात संपन्न झाली. या बैठकीला संबोधित करत असताना मोदींनी सर्व मित्र पक्षांचे आभार मानले. “एनडीएच्या माध्यमातून चौथ्यांदा सरकार स्थापन होत आहे. हे सरकार आधीच्या सरकारपेक्षाही अधिक गतीने काम करेल”, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिली.

यावेळी बोलत असताना खासदारांना मंत्रीपदाचे आमिष दाखविणारे फोन येऊ शकतात, त्यांनी अशा खोट्या फोनला बळी पडू नये, असा सल्लाही मोदींनी दिला. ते म्हणाले, “तुम्ही टीव्हीवर पाहत असाल की, वेगवेगळी चर्चा घडवली जात आहे. काहीही बातम्या चालवल्या जात आहेत. हे लोक अशा बातम्या कुठून आणतात, हे मलाही कळत नाही. आता तर तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, माझ्या स्वाक्षरीचा वापर करून खोटी यादीही प्रसारित केली जाऊ शकते.”

Ratan Tata Died at 86 in Marathi
Raj Thackeray Letter To PM : “रतन टाटा हयात असतानाच भारतरत्न द्यायला हवा होता, पण…”, राज ठाकरेंचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Samantha naga chaitanya nagarjuna
Samantha-Naga Chaitanya : “समांथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटामागे माजी मंत्री केटीआर यांचा हात”, काँग्रेस नेत्याचा मोठा दावा, “नागर्जुन म्हणाला…”
Controversy over ministership in Shiv Sena
शिवसेनेतील मंत्रिपदाची रस्सीखेच चव्हाट्यावर
Jitendra awhad marathi news
Akshay Shinde Encounter : “…म्हणून अक्षय शिंदेचा बळी देण्यात आला”; आमदार जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
central minister Kiren Rijiju
वक्फ सुधारणांबाबत केंद्रीय मंत्र्याचे भाष्य; म्हणाले, “अपप्रचार नको…”
nitin gadkari's guarantee ramdas athawale will become minister for fourth time
नागपूर : गडकरी म्हणाले “आम्हाला गॅरंटी नाही, मात्र आठवले यांना चौथ्यांदा मंत्री होण्याची गॅरंटी…..”
dcm devendra fadnavis share opinion on protest for reservation with media
“आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार; पण हिंसा, तेढ…” उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मत

‘एनडीएचं सरकार किती वर्ष टिकणार?’, नरेंद्र मोदी म्हणाले…

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “असेही होऊ शकते की, कुणाला तरी मंत्री बनवले जाईल. तसेच खात्यांचेही वाटप केले जाईल. या पद्धतीने अनेक लोक सरकार बनविण्याच्या उद्योग करत आहेत. मंत्री पद आणि खात्यांचे वाटप सुरू आहे. पण मी सांगू इच्छितो की, यात तसूभरही तथ्य नाही. त्यामुळे कुणाला जर मंत्रिपदासाठी फोन आलाच तर त्यांनी दहा वेळा त्याची खातरजमा करावी. फोन करणारा व्यक्ती खरंच कुणी पदावरील महत्त्वाची व्यक्ती आहे का? हे तपासून घ्या. नाहीतर कुणीतरी उगाच फोन फिरवून तुम्हाला मंत्री करून टाकेल.”

“मोदी सांगतील ते मान्य करून पुढे जाऊ”; नितीश कुमारांचाही चर्चांना पूर्णविराम!

“सध्या फसव्या लोकांची मोठी फौज तयार झाली आहे. काही लोक स्वभावानुसार असे करत असतात, तर काहींना हे करण्यात आसुरी आनंद मिळतो. त्यामुळे माझी सर्व खासदारांना विनंती आहे की, त्यांनी अशा आमिषांना बळी पडू नये. आपण पाहिले की, इंडिया आघाडीचे नेते फेक न्यूजच्या बाबतीत आता तज्ज्ञ झाले आहेत. त्यामुळे ते लोक याचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात. आपल्याला अफवांपासून दूर राहण्याची गरज आहे. ब्रेकिंग न्यूजच्या आधारावर देश चालत नाही”, असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: If you got call for minister post cross check ten times says narendra modi in nda meeting kvg

First published on: 07-06-2024 at 16:41 IST

संबंधित बातम्या