Premium

Iltija Mufti : “मेहबुबा मुफ्तींची लेक म्हणून नाही तर…”, उमेदवारी मिळाल्यानंतर इल्तिजा मुफ्तींकडून प्रचार सुरू

Iltija Mufti : पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मोहम्मद सईद (इल्तिजा मुफ्ती यांचे आजोबा) यांच्याकडून इल्तिजा मुफ्ती यांनी राजकीय घडे घेतले आहेत.

Who is Iltija Mehbooba Mufti Bijbehara constituency Jammu and Kashmir
पीडीपी नेत्या इल्तिजा मेहबुबा मुफ्ती (फोटो – इल्तिजा मुफ्ती/Facebook)

Who is Iltija Mehbooba Mufti : जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका होत असल्याने अवघ्या देशाचं लक्ष येथे लागून राहिलं आहे. पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाकडून बिजबेहारा विधानसभा मतदारसंघातून मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी मतदारांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या, मला माझ्या आईचा चेहराच नाही तर तिची जिद्दही मिळाली आहे. मी धोरणी आहे, तर ती भावनिक आहे. हे माझं व्यक्तिमत्व काळानुसार लोकांना समजत जाईल. मी कोण आहे हे लोकांनी ओळखावे. आपण प्रत्येकाचं ऐकलं पाहिजे, पण जे करायचं असतं ते आपल्या मनाप्रमाणेच करायचं असतं.” तसंच, “जम्मू-काश्मीरातील लोकांनी माझ्याकडे माजी प्रमुखांची मुलगी म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून पाहावे अशी माझी इच्छा आहे”, असंही त्या म्हणाल्या.

Raj Thackeray Meet CM Eknath Shinde
Raj Thackeray : मनसेची बैठक सोडून राज ठाकरेंनी अचानक मुख्यमंत्री शिंदेंची भेट का घेतली? नेमकी काय चर्चा झाली?
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Shrikant Shinde interaction with the people of Worli Vidhan Sabha print politics news
मनसेपाठोपाठ शिंदे गटही वरळीत सक्रिय; श्रीकांत शिंदे यांचा वरळीकरांशी संवाद
Delhi New CM Atishi Swearing-in Ceremony Live Updates in Marathi
Delhi CM Oath Ceremony : आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ!
Why Atishi was AAP choice to Delhi CM
Atishi Marlena Delhi New CM: केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांनाच मुख्यमंत्री पद का दिले? ‘आप’ची मोठी खेळी
Atishi Marlena Woman Chief Ministers List
Atishi : दिल्लीचा कारभार आतिशी यांच्या हाती; ‘या’ १६ महिला मुख्यमंत्र्यांनी केलंय विविध राज्यांचं नेतृत्व
BJP leader Anil Vij On Haryana CM
Anil Vij : हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदावर भाजपा नेते अनिल विज यांचा दावा; म्हणाले, “निवडणूक जिंकल्‍यास…”
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : केजरीवालांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री? ‘या’ नेत्यांची नावं आघाडीवर

आई आणि आजोबांचं मिश्रण

पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मोहम्मद सईद (इल्तिजा मुफ्ती यांचे आजोबा) यांच्याकडून इल्तिजा मुफ्ती यांनी राजकीय घडे घेतले आहेत. “मी जे कार्य करते ते या दोघांच्या धोरणांचं मिश्रण असतं. मी दोन्हींचे मिश्रण आहे. लोकांनी मला समजून घ्यावं, माझी धोरणं समजून घ्यावीत, माझा आदर करावा, एवढीच माझी मागणी आहे”, असंही इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या.

तरुणांच्या रोजगावर लक्षकेंद्रीत

दरम्यान, त्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने रोजगाराच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत केलं आहे. “गेल्या पाच वर्षांत, भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आम्हाला आमच्या जमिनीपासून, आमच्या नोकऱ्यांपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्राच्या विविध उपाययोजनांमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केल्यानेही अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

हेही वाचा >> जम्मू-काश्मिरात मेहबुबांची ‘पीडीपी’ किंगमेकर?

काश्मीरमधील अंमली पदार्थ आणि दारूच्या व्यसनाचा प्रश्न सोडवण्याची गरजही तिने व्यक्त केली. “आमच्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांना कौशल्याने सुसज्ज करणे हे माझे मुख्य लक्ष आहे”, असंही त्या म्हणाल्या.

आम्ही सत्तेचे दावेदार नाही

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग हा ‘पीडीपी’चा बालेकिल्ला असून इथल्या बिजबेहरा मतदारसंघातून मेहबुबा मुफ्ती यांच्याऐवजी त्यांची मुलगी इल्तिजा पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची वारसदार म्हणून इल्तिजाकडे पाहिले जात आहे. इल्तिजा निवडून येऊ शकतील हे खरे असले तरी ‘पीडीपी’ला ८-१० जागांवरच समाधान मानावे लागेल असे दिसते. ‘आमचा पक्ष छोटा असून आम्हाला जागाही तेवढ्याच मिळतील. आम्ही सत्तेचे दावेदार नाही’, अशी कबुली मुफ्ती यांचे विश्वासू व ‘पीडीपी’चे प्रवक्ता नजमू साकीब यांनी दिली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Iltija mufti contesting from bijbehara seat peoples democratic partys candidate sgk

First published on: 12-09-2024 at 12:15 IST

संबंधित बातम्या