Lok Sabha Election Result Updates: सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना थेट सभेतून उमेदवारी जाहीर करणं हे उद्धव ठाकरेंना महागात पडलं आहे. कारण यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली होती. काँग्रेसची पारंपरिक जागा असलेला हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरेंनी घेतल्याने आघाडी फुटणार की काय? इथपर्यंत महाविकास आघाडीतला संघर्ष टोकाला गेला होता. अशात विशाल पाटील हेच निवडून येतील अशी स्थिती आता निर्माण झाली आहे.

काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकला

काँग्रेसने विशाल पाटील यांना उमेदवारी नाकाराली. तर उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी थेट जाहीर करुन टाकली. महाविकास आघाडीतल्या दोन प्रमुख पक्षांना हे निर्णय पश्चात्ताप करायला लावणारे ठरले आहेत. लोकसभा निवडणुकीचे जे कल समोर येत आहेत त्यानुसार ३३ हजारांहून अधिक मताधिक्य सध्याच्या घडीला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याकडे आहे. यामुळे ते निर्णयाक आघाडी घेतील आणि निवडून येतील अशी स्थिती आहे. भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या दोघांनाही ते आस्मान दाखवणार हे निश्चित मानलं जातं आहे.

Jitendra Awhad Answer to Chhagan Bhujbal
जितेंद्र आव्हाड यांचं छगन भुजबळांना उत्तर, “शरद पवारांचं नाव घेत नाही तोपर्यंत…”
maharashtra assembly council adjourned over maratha reservation issue
सत्ताधाऱ्यांचाच गदारोळ; आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळाचे कामकाज ठप्प
IAS Puja Khedkar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप समोर; दिव्यांग असल्याचे सांगून UPSC परीक्षेत मिळवली सूट
Criticism of Eknath Shinde government regarding Rabindra Waikar investigation closed by the ed print politics news
खासदार वायकर यांना अभय; विरोधकांची टीका; सोमय्या कुठे गेले, काँग्रेसचा सवाल
sangli congress mla Vikram sawant
सांगली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची कृती त्यांनाच अडचणीची ठरणार ?
Rahul Gandhi on Agniveer
राहुल गांधींनी लोकसभेत प्रश्न मांडला, शहीद अग्निवीराच्या कुटुंबाला मिळाला ‘इतक्या’ लाखांचा मोबदला
Lok Sabha Election Result 2024 PM Modi VS Rahul Gandhi
“राहुल गांधींसारखं वागू नका”, नरेंद्र मोदींचा एनडीएतल्या खासदारांना सल्ला
shashi kapoor children career
अपयश आल्याने शशी कपूर यांच्या तिन्ही मुलांनी सोडलं बॉलीवूड, आता काय करतात? जाणून घ्या

हे पण वाचा- Lok Sabha Election Results Live Updates : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी पिछाडीवर, तृणमूलचे युसूफ पठाण आघाडीवर

सांगलीत ६१ टक्के मतदान

सांगलीत लोकसभा निवडणुकीत ६१ टक्के मतदान झालं. चंद्रहार पाटील यांना उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवारी जाहीर केली. ज्यामुळे महाविकास आघाडीतला काँग्रेस हा पक्ष प्रचंड नाराज झाला होता. उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी चंद्रहार पाटील यांना मदत न करता विशाल पाटील यांना मदत केल्याची चर्चा आहे. सांगलीच्या एक्झिट पोलमध्येही विशाल पाटील विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे संजयकाकांची धाकधूक वाढली आहे. सांगलीत बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण विशाल पाटील यांनी जी आघाडी घेतली आहे त्यावरुन सांगलीत विशाल पाटील यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.

हे पण वाचा- Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : मोदींनी ज्यांना लहान भाऊ म्हटले ते महादेव जानकर १८ हजार मतांनी पिछाडीवर; निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

जागावाटपाचा निर्णय आणि वादाची ठिणगी

महाविकास आघाडीतील जागावाटपामध्ये सांगलीची जागा ही सर्वाधिक वादाची ठरली. शिवसेना ठाकरे गटाने परस्पर या जागेवर चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि त्यानंतर जो वाद सुरू झाला तो शेवटपर्यंत मिटलाच नाही. काँग्रेसने यावर उघड उघड नाराजी दर्शवली, अगदी दिल्लीवाऱ्याही केल्या. पण शिवसेना ठाकरे गटाने शेवटपर्यंत ही जागा सोडली नाही. शेवटी विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला. तसंच विजयाचा विश्वासही व्यक्त केला.

काँग्रेसच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी विशाल पाटलांना मदत केली. खासकरून आमदार विश्वजीत कदम जरी महाविकास आघाडीच्या स्टेजवर दिसले तरी त्यांचा कल हा कुणाकडे होता हे उघड होतं. विश्वजीत कदमांची सर्व यंत्रणा ही विशाल पाटलांच्या मागे उभी राहिली आणि परिणामी विशाल पाटील यांचे पारडे जड झाले.