05 March 2021

News Flash

Jalgaon सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

तीन दशकांपासून २००७ च्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. २०१४ मधील मोदी लाटेत भाजपचे ए. टी. पाटील हे सलग दुसऱ्यांदा विक्रमी मतांनी निवडून आले. यंदा ‘हॅट्ट्रिक’ साधण्यासाठी त्यांनी कंबर कसली असताना मतदारसंघात त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचे भांडवल विरोधी पक्षांसह त्यांच्याच पक्षातील इच्छुक उमेदवारांनी सुरू केल्यामुळे पाटील यांची वाट बिकट मानली जात आहे. युतीचा विषय अधांतरी असल्याने शिवसेनेचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांनीही जय्यत तयारी सुरू केली असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. गत पंचवार्षिकला भाजपतर्फे ए. टी. पाटील आणि राष्ट्रवादीतर्फे डॉ. सतीश पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली होती. त्या वेळी ए. टी. यांच्यावर पक्षातील कार्यकर्त्यांसह मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांची प्रचंड नाराजी होती. याचा फायदा राष्ट्रवादीला होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र निकाल लागल्यानंतर त्यांना तब्बल सहा लाख ४७ हजार ७७३, तर राष्ट्रवादीचे डॉ. पाटील यांना दोन लाख ६४ हजार ८३८ मते पडली. अर्थात यास मोदी लाटेचा मोठा वाटा होताच. पाच वर्षांनंतर पुन्हा पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा उमेदवारीचा दावा केला आहे. जलद रेल्वे गाडय़ांना पाचोरा, चाळीसगाव रेल्वे स्थानकांवर थांबा, रस्ते विकास आणि चौपदरीकरण यासह स्थानिक पातळीवर केलेली विकासकामे विद्यमान खासदारांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र राज्य आणि केंद्रात सत्ता असताना मतदारसंघातील पिण्याच्या, सिंचनाचा प्रश्न सोडविण्यात त्यांना अपयश आले आहे. देशातील दुसरा अभिनव प्रकल्प असलेल्या गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यांची केवळ चर्चा सुरू आहे. त्या दृष्टीने खासदार पाटील यांनी काहीही केले नाही, अशी नाराजी तसेच पाडळसे धरणाचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम, वाघूर धरणातून शेतीपर्यंत जलवाहिनी, विमानतळ असतांना बंद पडलेली विमान सेवा यासारखे अनेक प्रश्न भाजपसमोर मोठी आव्हाने ठरत आहेत. त्यातच माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील वादामुळे अडचणीत अधिक भर पडू शकते. जातीय समीकरणांचा विचार केल्यास मतदारसंघात मराठा समाज निर्णायक असल्याने ए. टी. पाटील यांच्यासाठी ती जमेची बाजू असली तरी या वेळी भाजपतूनच त्यांना आव्हान दिले जात आहे. सलग दोन पंचवार्षिक ते निवडून आल्याने त्यांच्याबद्दलची वाढती नाराजी, पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणावरून त्यांच्याविरुद्धच्या अंतर्गत तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर, आगामी वाट बिकट असल्याची जाणीव त्यांनादेखील आहे. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद दुर्लक्षित करुन चालणार नाही. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्याशी खासदारांचे पटत नाही. पारोळ्याचे सेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील हे देखील मागील निवडणुकीतील पराभवासाठी खासदार पाटील यांना दोषी मानतात. अशा अनेक गोष्टी भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

jalgaon Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Unmesh Bhaiyyasaheb Patil
BJP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Jalgaon 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Anant Prabhakar Mahajan
IND
0
Graduate
36
10.63 Lac / 0
Anjali Ratnakar Baviskar
Vanchit Bahujan Aaghadi
0
Graduate
50
2.04 Cr / 36.65 Lac
Gulabrao Baburao Deokar
NCP
2
10th Pass
63
5.07 Cr / 85.53 Lac
Ishwar Dayaram More
BMUP
2
Graduate
54
86.25 Lac / 20 Lac
Lalit Gaurishankar Sharma (Bunty)
IND
0
10th Pass
34
23.22 Lac / 0
Mohan Shankar Birhade
Rashtriya Samajwadi Party (Secular)
0
10th Pass
53
20 Thousand / 0
Mukesh Rajesh Kuril
IND
0
Graduate
38
5.71 Lac / 38.98 Thousand
Onkaraba Chensing Jadhav
IND
0
12th Pass
56
1.43 Lac / 0
Rahul Narayan Bansode
BSP
0
10th Pass
46
75 Thousand / 0
Sancheti Rupesh Parasmal
IND
0
Graduate Professional
40
8.92 Lac / 30 Thousand
Sant Shri Mahahansaji Maharaj Patil
HND
3
8th Pass
43
11.02 Lac / 0
Sharad Gorakh Bhamre (Sutar)
Rashtriya Janshakti Party (Secular)
0
5th Pass
32
1.5 Thousand / 0
Subhash Shivlal Khairnar
IND
0
Graduate
64
20.2 Lac / 0
Unmesh Bhaiyyasaheb Patil
BJP
1
Graduate Professional
41
1.23 Cr / 25.3 Lac

Jalgaon सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Y G Mahajan Sir
BJP
47.62%
2004
Y. G. Mahajan (sir)
BJP
48.44%
2009
A.t. Nana Patil
BJP
52.34%
2014
A.t. Nana Patil
BJP
65.41%
2007*
Jawale Haribhau Madhav
BJP
50.85%
2019
Unmesh Bhaiyyasaheb Patil
BJP
65.6%

Jalgaon मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
JALGAON CITYSuresh Damu Bhole (rajumama)BJP
JALGAON RURALPatil Gulab RaghunathSHS
AMALNERShirishdada Hiralal ChaudhariIND
ERANDOLAnnasaheb Dr. Satish Bhaskarrao PatilNCP
CHALISGAONUnmesh Bhaiyyasaheb PatilBJP
PACHORAKishor Appa PatilSHS

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X