05 March 2021

News Flash

Jalna सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

मागील सलग सहा निवडणुकांत जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचा विजय झालेला असून त्यापकी चार वेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे निवडून आलेले आहेत. सलग सहा वेळेस पराभव झाल्यामुळे यावेळेस दानवे यांच्याविरुद्ध सर्वार्थाने सक्षम उमेदवार कसा द्यावा हा काँग्रेसच्या राज्यपातळीवरील नेतृत्वापुढे प्रश्न होता. त्यांनी विलास अवताडेंना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात भाजपची पाळे-मुळे रुजविण्यात वैयक्तिकरित्या दानवे यांचा मोठा वाटा आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यापासून तर जालना जिल्हयातील भाजप म्हणजेच दानवे असे अप्रत्यक्ष समीकरण झालेले आहे. काँग्रेस पक्षाची या लोकसभा मतदारसंघात स्वत:ची अशी मतपेढी आहे. परंतु काही अपवाद वगळले तर या पक्षातील नेतेमंडळींनी दानवे यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेली नाही. काँग्रेस आणि भोकरदन तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने दानवे यांना जेवढे लक्ष्य केले त्यापेक्षा अधिक लक्ष्य गेल्या दोन वर्षांत शिवसेनेने केलेले आहे. अलिकडेच जालना येथे भाजपच्या राज्य कार्यसमितीची बठक आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करून दानवेंनी जणू काही प्रचाराचा नारळच फोडलेला आहे. नुकतेच जालना येथे अखिल भारतीय पशुप्रदर्शन पार पडले. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकारातून आयोजित या प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीररित्या खोतकर यांना इकडे-तिकडे पाहू नका असे आवाहन करीत सोबतच राहा, असे सांगितले. खोतकर यांनी दानवेंना पाठिंबा जाहीर केला असून यामुळे दानवेंची बाजू पक्की झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री या कार्यक्रमात खोतकर यांना उद्देशून म्हणाले, ‘तुम्ही इकडे-तिकडे बघू नका. आपल्याला खूप गोष्टी करायच्या आहेत. मला तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकायच्या आहेत. घरामध्ये वाद-विवाद होत असतातच. तुमची इच्छा असेल तर मोठा भाऊ म्हणून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न मी करील!’ तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात खोतकर यांचा उल्लेख डायनामिक असा करून देशातील सर्वात भव्य पशुप्रदर्शन भरविण्याचा शब्द खरा करून दाखविल्याचे सांगितले. खोतकर यांनी प्रारंभी पशुप्रदर्शन विभागाशी संबंधित ज्या तीन-चार मागण्या केल्या होत्या त्याही मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. खासदार रावसाहेब दानवे यांनी विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविण्याचे ठरविले असून त्यांची अलिकडील सर्व भाषणे या स्वरूपाची आहेत. गेल्या २८ जानेवारी रोजी जालना येथील मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत दानवे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी केलेल्या कामांचा तपशील जनतेसमोर ठेवला. रस्त्यांचा विकास, ड्रायपोर्ट, सिडकोची नवीन वसाहत उभारण्याचे प्रयत्न, समृद्धी महामार्ग, रसायन तंत्रज्ञान संस्था इत्यादी अनेक उदाहरणे दानवे यांनी विकासाच्या अनुषंगाने दिली.

jalna Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Danve Raosaheb Dadarao
BJP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Jalna 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Adv. Yogesh Dattu Gullapelli
IND
0
Post Graduate
29
4.08 Lac / 0
Ahemad Rahim Shaikh
IND
0
12th Pass
49
/ 0
Anita Lalchand Khandade (Rajput)
IND
0
10th Pass
38
1.15 Cr / 20.22 Lac
Annasaheb Devidasrao Ugale
IND
0
Illiterate
51
4.74 Lac / 0
Arun Chintaman Chavhan
IND
0
Graduate
32
58.1 Thousand / 0
Autade Vilas Keshavrao
INC
3
12th Pass
50
27.82 Cr / 1.57 Cr
Danve Raosaheb Dadarao
BJP
2
Graduate
65
22.96 Cr / 24 Lac
Feroz Ali
BMUP
0
10th Pass
59
1 Lac / 0
Ganesh Shankar Chandode
Akhil Bharatiya Sena
1
8th Pass
30
6.4 Lac / 1.6 Lac
Mahendra Kacharu Sonwane
BSP
0
10th Pass
39
1.04 Cr / 22 Lac
Nade Dnyaneshwar Dagduji
IND
1
8th Pass
52
1.35 Lac / 0
Pramod Baburao Kharat
Bahujan Republican Socialist Party
0
8th Pass
49
30 Thousand / 0
Raju Ashok Gawali
IND
0
12th Pass
30
7.56 Lac / 0
Ratan Aasaram Landge
IND
0
Illiterate
39
1.26 Lac / 0
Sapkal Lilabai Dharma
Rashtriya Mahila Party
0
Illiterate
55
1.78 Lac / 0
Shahadev Mahadev Palve
IND
1
Graduate
35
4.58 Lac / 0
Sharadchandra Ganpatrao Wankhede
Vanchit Bahujan Aaghadi
2
Post Graduate
65
2.33 Cr / 0
Sirsath Sham
IND
0
Graduate
31
76.99 Lac / 3.2 Lac
Trimabak Baburao Jadhav
Swatantra Bharat Paksha
0
Graduate Professional
64
1.74 Cr / 32.48 Lac
Uttam Dhanu Rathod
Aasra Lokmanch Party
0
10th Pass
65
2.58 Lac / 65.54 Thousand

Jalna सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Danve Raosaheb Dadarao Patil
BJP
45.79%
2004
Danve Raosaheb Dadarao Patil
BJP
48.87%
2009
Danve Raosaheb Dadarao
BJP
44%
2014
Danve Raosaheb Dadarao
BJP
55.47%
2019
Danve Raosaheb Dadarao
BJP
57.78%

Jalna मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
JALNAArjun Panditrao KhotkarSHS
BADNAPURKuche Narayan TilakchandBJP
BHOKARDANDanave Santosh RaosahebBJP
SILLODAbdul Sattar Abdul NabiINC
PHULAMBRIBagde Haribhau KisanraoBJP
PAITHANBhumre Sandipanrao AasaramSHS

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X