सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची जंगम व स्थावर मालमत्ता १६ कोटी ६५ लाख रुपये असून, पाच वर्षांच्या तुलनेत यामध्ये ३३ लाखांची वृद्धी झाल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे ३३६ ग्रॅम सोने असून, पत्नी शैलजा पाटील यांच्याकडे ७९२ ग्रॅम स्त्रीधन आहे. स्थावर मालमत्ता वारसा हक्काने मिळाली असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

आमदार पाटील यांच्याकडे सद्य:स्थितीला हातात १५ हजारांची रोख रक्कम असून, विविध बँका, कंपन्यांतील भाग, वित्तीय संस्थांतील ठेवी, बंधपत्र अशी एकूण जंगम मालमत्ता ९ कोटी २६ लाख ५९ हजार २५६ रुपयांची आहे. तर कासेगाव, आमणापूर आणि नरवाड या ठिकाणी १८ एकर ४१ गुंठे जमीन, कासेगाव आणि सांगलीतील वसंत हौसिंग सोसायटीमध्ये इमारतीसह असलेला भूखंड याचे मूल्य ७ कोटी ३९ लाख ८७८ रुपये आहे. तर ६ लाख ४२ हजार ४८६ रुुपयांचे दायित्व आहे. २०१९ मध्ये निवडणुकीवेळी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची मालमत्ता १६ कोटी २२ लाख ८८ हजार ९२४ रुपये होती. या तुलनेत या वेळी मालमत्तेच्या मूल्यामध्ये ३३ लाखांची वृद्धी झाल्याचे दिसून आले. पत्नी श्रीमती पाटील यांच्या हाती रोख रक्कम ११ हजार ४९६ रुपये असून, त्यांच्याकडे १ कोटी ३६ लाख ४० हजार १७० रुपयांची मालमत्ता आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हे ही वाचा… Ashish Shelar : महायुती माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? आशिष शेलारांचं मोठं विधान; म्हणाले, “समर्थन देण्याची…”

एकूण मालमत्ता- १६,६५,६०१३४

जंगम- ९,२६,५९२५६

स्थावर- ७,३९,००८७८

वारसाने मिळालेली मालमत्ता- २,९४,६६५७८

२०१९ मध्ये – एकूण मालमत्ता- १६,२२,८८९२४

गेल्या पाच वर्षांत संपत्तीत ३३ लाखांची वाढ.

शिक्षण- बी.ई. सिव्हिल

Story img Loader