Jharkhand Vidhansabha Election 2024 : झारखंड विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. झारखंड विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं. यामध्ये पहिल्या टप्प्यातील ४१ जागांसाठी १३ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. तसेच दुसऱ्या टप्प्यातील ३८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झालं. यानंतर आता २३ नोव्हेंबर रोजी झारखंड विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवध्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. आता या निकालात झारखंडची जनता कोणाच्या बाजुने कौल देते? झारखंडमध्ये कोणाचं सरकार स्थापन होतं? कोणत्या पक्षाला जास्त जागा मिळतात? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं आता २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याआधीच झारखंडमधील नेत्यांकडून देखील सत्तास्थापनेबाबत दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.

असं असलं तरी निकालानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर तेथील एक्झिट पोलही समोर आले आहेत. यावेळी झारखंडमध्ये इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये लढत होत आहे. काही एक्झिट पोल्सच्यानुसार झारखंडमध्ये भाजपा युतीला ४२-२४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच काँग्रेस आघाडीला २५ ते ३० तर इतरांना १-४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, असं असलं तरी निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. खरं तर या निवडणुकीत राज्यात सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया ’ आघाडीचा सामना भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मुख्य लढत पाहायला मिळाली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : Kenya cancels Adani Deal: अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत

एनडीए आघाडीत कोणत्या पक्षांचा सहभाग?

झारखंड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, जनता दल युनायटेड, एजूएसयू पार्टी आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास).

इंडिया आघाडीत कोणत्या पक्षांचा सहभाग?

झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, सीपीआय-एमएल पक्षांचा सहभाग आहे.

झारखंडमध्ये किती जागांसाठी निवडणूक झाली?

झारखंडमध्ये एकूण ८१ विधानसभेच्या जागांवर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ८१ विधानसभेच्या जागांवर तब्बल १२११ उमेदवारांनी निवडणूक लढवली. यामध्ये काही प्रमुख पक्षांसह अपक्षांचा सहभाग आहे. त्यामुळे १२११ उमेदवारांचं भवितव्य आता उद्या निवडणुकीच्या निकालानंतर समोर येणार असून कोणाचा विजय मिळणार? हे स्पष्ट होणार आहे.

झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान झालं

झारखंड विधानसभा निवडणुकीत एकूण दोन टप्प्यात मतदान झालं. पहिल्या टप्प्यातील ४१ जागांसाठी १३ नोव्हेंबर रोजी मतदान झालं. तर दुसऱ्या टप्प्यातील ३८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झालं. या दुसऱ्या टप्प्यात एकूण ५२८ उमेदवार होते.

झारखंडमध्ये २०१९ साली कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या?

झारखंडमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाला ३० जागा मिळाल्या होत्या. तसेच भारतीय जनता पक्षाने २५ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस पक्षाने १६ जागा जिंकल्या होत्या. तसेच झारखंड विकास मोर्चा प्रजातांत्रिक पक्षाला 3 जागा मिळाल्या होत्या. दरम्यान झारखंडमध्ये २०१९ साली झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष तर भाजपा दुसरा क्रंमाकाचा पक्ष ठरला होता. त्यामुळे आता २०२४ च्या या विधानसभा निवडणुकीत काय होणार? याची अनेकांना मोठी उत्सुकता आहे.


Story img Loader