05 March 2021

News Flash

Kalyan सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

शिवसेनेची उत्तम पकड असलेला मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपने शिवसेनेला तोडीस तोड आव्हान उभे केले आहे. युती नसती तर शिवसेनेसाठी कडवे आव्हान उभे ठाकले असते. पण युती झाल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. भाजप आणि शिवसेनेत युतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीच्या बाजूने अनुकूल भूमिका मांडली होती. अर्थात याला किनार कल्याण मतदारसंघाची होती. कारण युतीशिवाय कल्याणमध्ये पुत्राची खासदारकी कायम राहणे सोपे नाही हे शिंदे यांनाही लक्षात आले होते. डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्य़ात शिवसेनेला बेजार केले होते. खासदार शिंदे यांच्याविरोधात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांना िरगणात उतरवले आहे. या मतदारसंघातील शिळफाटा ते २७ गाव आणि पुढे अंबरनाथ, कल्याण, बदलापुरातील काही ग्रामीण पट्टय़ांत आगरी मतदारांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी येथून निवडणूक लढवावी असा आग्रह काही स्थानिक नेत्यांनी धरला होता. असे असताना नाईक यांच्या निष्ठावंतांमध्ये ओळखले जाणारे बाबाजी यांना रिंगणात उतरवून ही निवडणूक जातीय समीकरणांसोबत स्थानिक प्रश्नांवर शिवसेनेला आलेल्या अपयशाच्या मुद्दय़ांवर नेण्याचा प्रयत्न आघाडीचे नेते करू पाहात आहेत. मात्र शिवसेना-भाजपची या भागातील परंपरागत मते पाहता हा प्रयत्न वाटतो तितका सोपा नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा आगरीबहुल आणि शिवसेनेचे वर्चस्व असलेला मतदारसंघ. अगदी वसंत डावखरे यांच्यासारखा तगडा उमेदवारही शिवसेनेच्या विरोधात पराभूत झाला होता. कळवा-मुंब्र्याचा अपवाद वगळला तर या मतदारसंघातील उर्वरित विधानसभा क्षेत्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्वीइतका प्रभाव राहिलेला नाही. उल्हासनगरात ज्योती कलानी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार असल्या तरी त्यांचे पुत्र ओमी यांनी महापालिका निवडणुकीत भाजपची साथ धरली आहे. अंबरनाथ, कल्याण या भागांत शिवसेनेची ताकद मोठी असून डोंबिवली भागात भाजपचा वरचष्मा आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील दिवा आणि २७ गाव परिसरात शिवसेनेची चांगली ताकद असली तरी स्थानिक आमदार सुभाष भोईर यांच्या कामाविषयी मात्र फारसे समाधानकारक चित्र नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील शिळफाटा परिसरातील देसई गावचे रहिवासी. जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष होते. ठाणे पालिकेत नगरसेवक आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर वैयक्तिक, कौटुंबिक संबंध वगळता त्यांना शहरी पट्टय़ातील त्यांचा संपर्क मात्र यथातथाच आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे बाबाजी किती आव्हान उभे करतील याविषयी संदिग्धता आहे. रेल्वे, पायाभूत सुविधांचे प्रश्न कायम पायाभूत सुविधांच्या आघाडीवर तीनतेरा वाजलेली शहरे या मतदारसंघात आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना भाजपची सत्ता असली तरी ही शहरे नियोजनाच्या आघाडीवर फसली आहेत. कल्याण ते सीएसटी हा मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे प्रवास अजूनही सुसह्य झालेला नाही. खासदार शिंदे यांनी या प्रश्नांविषयी गेल्या काही वर्षांत सजग भूमिका घेतल्याचे अनेकदा पाहायला मिळाले असले तरी स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या शिवसेना-भाजपच्या संघर्षांत अजूनही अनेक प्रश्न जैसे थे आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गावे, अंबरनाथ, बदलापूर, मलंगपट्टी भागातील गावांमधील रस्ते, पाणी प्रश्न सोडविण्याला खासदारांनी पक्षातील आमदार तसेच स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. असे असले तरी स्थानिक पातळीवर मजबूत संघटना ही शिवसेनेची आणि खासदार शिंदे यांची जमेची बाजू मानली जाते.

kalyan Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Dr. Shrikant Eknath Shinde
SS
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Kalyan 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Ajayshyam Ramlakhan Maurya
IND
0
8th Pass
47
74.11 Lac / 0
Amrish Raj Morajkar
IND
0
Others
33
3.77 Lac / 1 Lac
Asmita Pushkar Puranik
IND
1
Others
40
2.55 Cr / 0
Babaji Balaram Patil
NCP
1
10th Pass
52
42.19 Cr / 35.87 Lac
Chandrakant Mote
IND
0
10th Pass
57
1.14 Cr / 32.43 Lac
Dinkar Rangnath Palake
IND
0
5th Pass
64
5.78 Lac / 0
Dr. Shrikant Eknath Shinde
SHS
1
Post Graduate
32
1.96 Cr / 12.41 Lac
Dr. Suresh Abhiman Gawai
Bharat Prabhat Party
0
Graduate Professional
50
1.21 Cr / 15 Lac
Gautam Baburao Waghchaure
BMUP
0
Illiterate
56
25 Thousand / 0
Habibur Rehaman Obbadur Khan
PECP
0
10th Pass
59
58.88 Lac / 0
Haresh Sambhaji Bramhane
Bahujan Republican Socialist Party
0
12th Pass
43
61.8 Thousand / 0
Jafarullah Gulam Rab Sayyad
IND
0
Post Graduate
36
70.34 Lac / 11.15 Lac
Milind Kashinath Kamble
Bharat Jan Aadhar Party
0
Graduate
35
28.92 Lac / 4.74 Lac
Mohd. Yusuf Mohd. Farook Khan
IND
0
8th Pass
40
2.79 Lac / 0
Munir Ahmad Ansari
IUML
1
8th Pass
45
34.6 Lac / 0
Nafis Ahamad Ansari
IND
0
8th Pass
42
8.63 Lac / 2.18 Lac
Narendra Vaman More
IND
0
Graduate
55
97 Lac / 0
Ravindra Abhimanyu Kene
BSP
1
10th Pass
35
89.99 Lac / 9.05 Lac
Sanjay Ramrao Hedaoo
Vanchit Bahujan Aaghadi
3
12th Pass
54
2.6 Lac / 8.14 Lac
Santosh Bhikaji Bhalerao
APoI
0
Post Graduate
41
1.5 Cr / 22.22 Lac
Shiva Krishnamurthy Iyer
IND
1
Post Graduate
57
2.18 Cr / 0
Sonali Ashok Gangavane
IND
0
12th Pass
34
5.73 Lac / 0
Suhas Dhananjay Bonde
IND
1
12th Pass
47
7.26 Cr / 27.67 Lac
Vasim Ali Nazir Ali Sayyed
IND
3
Graduate
40
19.28 Lac / 0
Vinay Dubey
IND
3
12th Pass
33
22.14 Lac / 0
Vinod Manohar Salve
Bhartiya Kisan Party
0
5th Pass
45
18 Thousand / 0
Yasmin Banoo Mohammed Salim
IND
0
12th Pass
40
1.15 Cr / 0

Kalyan सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
2009
Anand Prakash Paranjape
SHS
39%
2014
Dr.shrikant Eknath Shinde
SHS
53.49%
2019
Dr. Shrikant Eknath Shinde
SHS
62.87%

Kalyan मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
AMBERNATHDr. Balaji KinikarSHS
ULHASNAGARJyoti Pappu KalaniNCP
KALYAN EASTGanpat Kalu GaikwadIND
DOMBIVALIChavhan Ravindra DattatrayBJP
KALYAN RURALBhoir Subhash GanuSHS
MUMBRA-KALWAAwhad Jitendra SatishNCP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X