scorecardresearch

Karnataka Assembly Election : कर्नाटकात भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता, सर्व्हेत धक्कादायक आकडेवारी समोर

Karnataka Election 2023 : कर्नाटकात भाजपा, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

modi-shah
कर्नाटकात भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता, सर्वेत धक्कादायक आकडेवारी समोर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. आज ( २९ मार्च ) निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. १० मे ला मतदान होणार आहे, तर १३ मेला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अशात ‘एबीपी न्यूज’चा एक सर्व्हे समोर आला आहे. यात भाजपाचा पराभव होत असून, काँग्रेस सत्तेवर येत असल्याचं दाखवलं आहे.

‘एबीपी न्यूज’ आणि ‘सी व्होटर’ने एकत्ररित्या सर्व्हे केला आहे. यात काँग्रेसला मोठी आघाडी मिळाली आहे. सर्व्हेत २४ हजार ७५९ हजार लोकांची मते जाणून घेण्यात आली आहे. त्यानुसार काँग्रेसला ११५ ते १२७ जागा मिळू शकतात. भाजपाला ६८ ते ८० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, जनता दल (सेक्युलर) या पक्षाचे २३ ते ३५ उमेदवार निवडून येऊ शकतात.

हेही वाचा : अमृतपाल सिंगचा नवीन व्हिडीओ आला समोर, पोलिसांना आव्हान देत म्हणाला…

मेटेरोइज पोलनुसार, कर्नाटकात काँग्रेसला ८८ ते ९८ जागा, भाजपाला ९६ ते १०६ आणि जेडीएसला २३ ते ३३ जागा मिळू शकतात. लोक पोलच्या सर्व्हेत काँग्रेसला ११६ ते १२३, भाजपाला ७७ ते १२३ आणि जेडीएसला २१ ते २७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अन्य पक्षांना १ ते ४ जागा मिळतील.

हेही वाचा : पंजाबात अमृतपाल सिंगला घेरलं? सुवर्ण मंदिरात आत्मसमर्पण करण्याची शक्यता; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पॉप्युलर पोल्सच्या सर्व्हेत काँग्रेसला ८२ ते ८७ जागा मिळताना दिसत आहेत. भाजपाला ८२ ते ८७ आणि जेडीएसला ४२ ते ४५ जागा मिळू शकतात. कर्नाटक पोल्सच्या सर्व्हेनुसार काँग्रेसला १०० ते १०८ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपाला ८१ ते ८९ आणि जेडीएसला २७ ते ३५ आणि अन्य पक्षांना १ ते ३ जागा मिळतील, असं दिसत आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 21:26 IST

संबंधित बातम्या