05 March 2021

News Flash

Latur सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

वर्षांनुवर्षे काँग्रेसचा गड राहिलेला हा मतदारसंघ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपल्या ताब्यात घेतला. भाजपचे खासदार म्हणून सुनील गायकवाड यांनी अडीच लाखांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवत विजयश्री मिळविली. केवळ दोन अपवादवगळता सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसची सत्ता होती. सामना दुरंगी असो अथवा तिरंगी, काँग्रेसचे यश ठरलेले असायचे. शिवराज पाटील चाकूरकर यांनी या मतदारसंघाचे सलग सात वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी मांडलेले मांडे मनातल्या मनातच राहिले. मात्र २००४ साली भाजपच्या नवख्या उमेदवार रूपाताई पाटील निलंगेकर यांनी चाकूरकरांचा पराभव केला. हा पराभव त्यांना धक्कादायक होता. २००९ साली हा मतदारासंघ राखीव झाला. त्यामुळे चाकूरकरांच्या पराभवाची जखम कायम वाहती राहिली. लातूर मतदारसंघ राखीव झाल्यावर २००९ मध्ये विलासराव देशमुख यांनी इचलकरंजीच्या जयंतराव आवळे यांना लातूरमध्ये आयात केले. आयात उमेदवार म्हणून आवळेंना मोठा विरोध झाला. भाजपाचे सुनील गायकवाड यांनी तेव्हाही चांगली लढत दिली होती. २०१४ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी जनतेतून उमेदवार निवडावा यासाठी देशातील काही मतदारसंघ निवडले व त्यात लातूर लोकसभेचा समावेश होता. तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे गुरुजी यांना जनतेतून उमेदवारी मिळाली. मात्र, मोदी लाटेत त्यांचा टिकाव लागला नाही. काँग्रेसचा गड असलेला हा मतदारसंघ प्रचंड मताने भाजपने खेचून घेतला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली व नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका अशा प्रत्येक निवडणुकीत भाजपने यश मिळविले. काँग्रेस ‘बॅकफुट’वर गेली होती. ती कायमस्वरूपी मागच्या बाकावर राहावी अशी रचना भाजपची मंडळी करत आहे. अगदी अमित शहापासून ते राज्याच्या प्रमुख नेत्यांनी लातूरवर जरा अधिकच प्रेम केले आहे. त्यामुळे भाजपच्या नेतेमंडळींचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस आमदार अमित देशमुख यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून त्यांनी मतदारसंघातील अनेक गावात सभांचा सपाटा लावला आहे. रस्त्यावर उतरून मोच्रेही काढले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसला साथ मिळेल तर भाजपबरोबर शिवसेनेची युती झाल्यामुळे भाजपाची बाजूही मजबूत होत आहे. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन ठिकाणीच काँग्रेसचे आमदार आहेत तर चार ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर तांत्रिकदृष्टय़ा शिवसेनेत असले तरी ते मनाने भाजपत आहेत. केंद्र व राज्य सरकारवरील नाराजीचा लाभ काँग्रेसला मिळेल, असा आशावाद अनेकांच्या मनात आहे. भाजपमध्येही टोकाची अंतर्गत गटबाजी आहे. ही गटबाजी डोके किती वर काढते, की निवडणुकीपुरती गटबाजी दूर करण्यात भाजपला यश मिळते यावर भाजपचे भवितव्य आहे.

latur Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Sudhakar Tukaram Shrangare
BJP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Latur 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Arun Ramrao Sontakke
Bahujan Republican Socialist Party
0
12th Pass
60
3.6 Lac / 0
Dattu Prabhakar Karanjikar
BMUP
0
12th Pass
40
37.85 Lac / 0
Kamant Machindra Gunaji
INC
0
Post Graduate
59
12.5 Cr / 1.93 Cr
Madhukar Sambhaji Kamble
IND
0
Graduate
65
71.79 Lac / 0
Papita Raosaheb Randive
IND
0
12th Pass
37
/ 2 Lac
Ramesh Nivrati Kambale
IND
0
5th Pass
48
6 Thousand / 0
Ramrao Garkar
Vanchit Bahujan Aaghadi
0
Post Graduate
59
1.43 Cr / 5.4 Lac
Rupesh Shamrao Shanke
Swatantra Bharat Paksha
0
12th Pass
26
2.6 Lac / 18 Thousand
Siddharthkumar Digambarrao Suryawanshi
BSP
0
Doctorate
43
18.76 Lac / 7 Lac
Sudhakar Tukaram Shrangare
BJP
0
10th Pass
57
28.65 Cr / 10.03 Cr

Latur सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Patil Shivraj Vishwanath
INC
41.72%
2004
Patil Rupatai Diliprao Nilangekar
BJP
49.19%
2009
Awale Jaywant Gangaram
INC
44.96%
2014
Dr. Sunil Baliram Gaikwad
BJP
58.32%
2019
Sudhakar Tukaram Shrangare
BJP
56.22%

Latur मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
LOHAChikhalikar Prataprao GovindraoSHS
LATUR RURALBhise Trimbakrao ShrirangraoINC
LATUR CITYAmit Vilasrao DeshmukhINC
AHMADPURJadhav Patil Vinayakrao KishanraoIND
UDGIRSudhakar Sangram BhaleraoBJP
NILANGANilangekar Sambhaji Deeliprao PatilBJP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X