महाविकास आघाडीचे दोन उमेदवार रवींद्र धंगेकर आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी पुण्यात सभा घेतली. शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी सभेत भाषणं केली. या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख वखवखलेला आत्मा असा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा उल्लेख अतृप्त आत्मा असा केला होता. त्यावर उत्तर देत उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“मला भाजपाची आणि मोदींची खरंच कीव येते. कारण मोदी यांच्याबरोबर माझ्याही सभा झाल्या आहेत. मला नाही आठवत की तेव्हा इतक्या वेळी महाराष्ट्रात सभा घेतल्या होत्या. त्यावेळी सभांमध्ये मोदींनी माझा उल्लेख माझे लहान भाऊ म्हणून केला होता. अरे मग लहान भाऊ होतो तर नातं का तोडलंत? तुम्ही दहा वर्षे काय केलं ते सांगा. अजूनही यांच्या मानगुटीवरती काँग्रेसचं भूत बसलं आहे तेच उतरत नाही” असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला.

keshav upadhye replied to anil deshmukh allegation
“माजी गृहमंत्र्याचा अभ्यास कायद्याचा नसून केवळ १०० कोटींच्या वसुलीचा, त्यामुळे…”; अनिल देशमुखांच्या ‘त्या’ आरोपाला भाजपाचं प्रत्युत्तर!
Mahayuti base remains Analysis by Devendra Fadnavis
महायुतीचा जनाधार कायम! देवेंद्र फडणवीस यांचे विश्लेषण, उद्धव यांना सहानुभूती नसल्याचा दावा
Chandrapur lok sabha seat, Congress MP Pratibha Dhanorkar s Claim of bjp office bearers Support her in election, Chandrapur bjp office bearers,
चंद्रपूर : धानोरकरांच्या ‘त्या’ वक्तव्याने भाजपत अस्वस्थता……पडद्यामागे राहून…
Ajit Pawar Yugendra Pawar Sharad Pawar
शरद पवार बारामती विधानसभेत युगेंद्र पवारांना अजित पवारांविरोधात उभं करणार? जितेंद्र आव्हाड म्हणाले…
Deputy Chief Minister Statements by Devendra Fadnavis discussion BJP
फडणवीस यांचा निर्णय नाराजीपोटी ?
Sushma Andhare on Devendra Fadnavis
“देवेंद्र फडणवीस यांची ‘एक्झिट’ नक्की, आता विनोद तावडे…”, सुषमा अंधारे यांचं सूचक विधान
Rohit pawar on Tanaji Sawant
“भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता नांग्या…”, अधिकाऱ्याच्या पत्रावरून रोहित पवारांची शिंदेंच्या मंत्र्यांवर टीका
ajit pawar
पुणे अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांनी पैसे खाल्ल्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप; अजित पवार म्हणाले, “उचचली जीभ अन्…”

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंची मोदी-फडणवीसांवर टीका, “मशालीच्या धगीने कमळ कोमेजणार, टरबुजाचं चिराट झालं”

महाराष्ट्रात वखवखलेला आत्मा फिरतो आहे

“परवा मोदी अतृप्त आत्मा असं म्हणाले. कुणाला म्हणाले शरद पवारांना का? अजित पवार पुढच्या सभेत त्यांना विचारतो म्हणाले आहेत. पण आज तुम्हाला सांगू इच्छितो जसा अतृप्त आत्मा असतो तसा वखवखलेला आत्माही असतो. वखवखलेला आत्मा महाराष्ट्रात सगळीकडे फिरतो आहे. वखवखलेला हा आत्मा सगळीकडे जातो आणि शरद पवार त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करु इच्छितात, मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतो आहे असं सांगतो. हे मात्र स्वतःसाठी लढत आहे. मी, माझं, माझ्यासाठी आणि सगळी कामं मित्रांसाठी असं यांचं धोरण. आम्ही मुलांसाठी लढतो आहोत त्यांना मुख्यमंत्री करायचं की नाही ते जनता ठरवेल. हा वखवखलेला आत्मा महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोय. या वखवखलेल्या आत्म्याला थोड्या जरी संवेदना असतील तर जिथे फिरताय तिथे तुमच्या नादानपणामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आत्म्यांकडे आणि घरांकडे बघा.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात फिरतोय, कारण..”, संजय राऊत यांचं नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर

औरंगजेबही वखवखलेला आत्माच

“महाराष्ट्र भोळा आहे, साधा आहे, दिलदार आहे. मात्र महाराष्ट्र कृतघ्न आणि गद्दार नाही. महाराष्ट्राची परंपरा शूरांना वंदन करण्याची आहे. शूरा मी वंदिले असं गाणं आहे. भाजपाचं मात्र चोरा मी वंदिले असं चाललं आहे. मोदींना माहीत असेल किंवा नसेल पण असाच एक वखवखलेला आत्मा ३५० वर्षांपूर्वी गुजरातमध्ये जन्माला आला होता. तो म्हणजे औरंगजेब जो महाराष्ट्रावर चाल करुन आला होता. हिंदवी स्वराज्य चिरडायला आणि महाराष्ट्र आपल्या ताब्यात घ्यायला तो आला होता. २७ वर्षे तो महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता. त्याने आग्रा नंतर पाहिलाच नाही त्या औरंगजेबाचा आत्मा अजूनही भटकत असेल. इतकी वखवख बरी नाही.” असंही उद्धव ठाकरेंनी सुनावलं.