Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates : अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ४ जून रोजी निकाल लागला. यंदाचा निकाल अनपेक्षित आणि सर्वच राजकीय विश्लेषक आणि एक्झिट पोल्सना धक्का देणारा ठरला. भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तविण्यात येत असतानाच प्रत्यक्षात मात्र भाजपाला २४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. याचा अर्थ बहुमताचा २७२ हा आकडा गाठण्यासाठी आता त्यांना इतर सहयोगी पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने देशभरात चांगली कामगिरी करत ४४ खासदारांच्या संख्येवरून थेट ९९ वर मजल मारली आहे. तसेच इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांचीही कामगिरी उत्तम राहिली. ज्या उत्तर प्रदेशवर भाजपाची सर्वाधिक भिस्त होती, तिथे समाजवादी पक्षाने ३७ जागा मिळवून तिसरा सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने २९ जागा मिळवत चौथ्या क्रमाकांचा मोठा पक्ष होण्याचा मान मिळविला आहे. आता बहुमताचा आकडा गाठण्यात कुणाला यश येते? हे पाहावे लागेल.

Live Updates

Lok Sabha Election 2024 Result Live | लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतरची प्रत्येक अपडेट मिळवा एका क्लिकवर

21:56 (IST) 5 Jun 2024
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा

पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक्स अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत. भारतातील ६५० दशलक्ष लोकांनी मोदींना मतदान केले. आपली मैत्री अशीच कायम राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

21:45 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Result Live : योग्य वेळ साधून निर्णय जाहीर करू – मल्लिकार्जुन खरगे

“इंडिया आघाडी यापुढेही हुकुमशाही विरोधात लढत राहिल. आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. लोकांना भाजपाचे शासन नको आहे, याची काळजी आम्ही घेऊ”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर दिली.

21:42 (IST) 5 Jun 2024
“मोदींच्या विरोधात जनादेश मिळालाय, मतदारांच्या इच्छेचा विचार केला जाईल”, इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगेंचं महत्त्वाचं विधान

इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मित्र पक्षाचे आभार मानले आणि जनतेने दिलेल्या जनादेशाचा विचार केला जणार असल्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. यासंदर्भात त्यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवादही साधला. या बैठकीत काँग्रेस पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह विविध पक्षाचे ३३ नेते हजर होते. या बैठकीच्या माध्यमातून मल्लिकार्जुन खरगे यांनी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

सविस्तर वाचा

20:11 (IST) 5 Jun 2024
कोकण रेल्वेने लावली पाच हजार रोपे

कोकण रेल्वेने पाच हजार रोपे लावून पर्यावरणासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे.

सविस्तर वाचा…

20:06 (IST) 5 Jun 2024
इंडिया आघाडीची बैठक संपली, संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला २३३ जागा मिळाल्यानंतर आज दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडीया आघाडीत असलेल्या पक्षातील नेत्यांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. तसेच आपल्या समविचारी पक्षाला बरोबर येण्याचं निमंत्रण, आपले संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं बैठकीत ठरलं आहे.

20:04 (IST) 5 Jun 2024
मुंबईत पूर्वमोसमी पावसाची हजेरी

मुंबईतील भायखळा, दादर परिसरात पूर्वमोसमी पावसाने बुधवारी पहाटे हजेरी लावली.

सविस्तर वाचा…

19:52 (IST) 5 Jun 2024
सांगली: तासगाव परिसरात मुसळधार पाऊस

तासगाव तालुक्यातील अनेक गावांत सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस पडला.

सविस्तर वाचा…

19:45 (IST) 5 Jun 2024
कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन; काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी मान्सूनचे दमदार आगमन झाले आहे. कोल्हापूर शहरासह परिसरात पहिलाच मुसळधार पाऊस झाला.

सविस्तर वाचा…

19:43 (IST) 5 Jun 2024
Solapur Lok Sabha Election Result : सोलापुरात भाजपचे गणित का बिघडले ?

भाजपसाठी प्रतिष्ठा आणि काँग्रेससाठी अस्तित्व पणाला लागलेल्या सोलापूर लोकसभा लढतीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी जोरदार मुसंडी मारून भाजपचा गड खेचून आणला आहे. त्यांच्या विजयामुळे सोलापुरातील राजकीय समीखरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सविस्तर वाचा

19:41 (IST) 5 Jun 2024
विश्लेषण: ‘स्वयंभू’ नरेंद्र मोदी आघाडी सरकार कसे चालवणार? ‘म्हणेन ती पूर्व’ प्रवृत्तीला आळा बसेल?

२०१९ मध्ये ३०३ जागांचे प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे केंद्रातील सत्तेसाठी भाजपला ‘एनडीए’तील घटक पक्षांची फारशी गरज नव्हती. ‘मोदी २.०’ हे एनडीएचे सरकार म्हटले जात होते पण, प्रत्यक्षात ते फक्त भाजपचे सरकार होते. त्यामुळे केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकछत्री कारभार होता. सविस्तर वाचा…

19:40 (IST) 5 Jun 2024
Navneet Rana Lost Amravati Lok Sabha: नवनीत राणांचा पराभव; भाजपचे शहराध्‍यक्ष आ. प्रवीण पोटेंचा राजीनामा

अमरावती महाराष्‍ट्रात पराभवाची जबाबदारी स्‍वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा देण्‍याची तयारी दर्शविलेली. सविस्तर वाचा…

19:38 (IST) 5 Jun 2024
दहावीच्या गुणपत्रिका कधी मिळणार? राज्य मंडळाने दिली माहिती…

यंदा दहावीचा निकाल राज्य मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच मेमध्ये जाहीर झाला.

सविस्तर वाचा…

19:38 (IST) 5 Jun 2024
आयआयटी मुंबईची ११८ व्या स्थानी झेप…क्यूएस क्रमवारीत राज्यातील किती संस्था?

जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची असलेल्या क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२५ मध्ये राज्यातील चार संस्थांनी पहिल्या एक हजार संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे.

सविस्तर वाचा…

19:36 (IST) 5 Jun 2024
राज्य मंडळाची ऑनलाईन समुपदेशन सेवा: समुपदेशनाऐवजी तांत्रिक प्रश्नांचाच भडीमार

इयत्ता दहावी व बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना मानसिक नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळाने ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू केली आहे. सविस्तर वाचा…

19:35 (IST) 5 Jun 2024
दहिसरमध्ये दुचाकीच्या धडकेनंतर ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू; रिक्षा चालकानेही रुग्णालयात नेण्याऐवजी रस्ताच्या कडेला सोडले

वसई जवळील नायगाव येथे ७५ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. त्याप्रकरणी रिक्षा चालक व मोटरसायकस्वाराविरोधात बोरिवली येथील एमएचबी पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…

19:34 (IST) 5 Jun 2024
या आठवड्यात समुद्रात मोठी भरती; साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार, पावसाळ्याच्या चार महिन्यात २२ दिवस मोठ्या भरतीचे

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून समुद्रात मोठी भरती येणार असून यावेळी समुद्रात साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. ५ ते ८ जूनदरम्यान दररोज समुद्रात मोठी भरती येणार आहे. सविस्तर वाचा…

19:33 (IST) 5 Jun 2024
राज्यात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा, मोसमी पावसाची गोव्यात अल्पविश्रांती

शनिवारपासून (८ जून) पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

सविस्तर वाचा…

19:28 (IST) 5 Jun 2024
इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला उद्धव ठाकरे अनुपस्थित

इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या पक्षाच्यावतीने संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत हे बैठकीला उपस्थित राहिले आहेत. उद्धव केंद्रात सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यास उत्सुक आहेत. दरम्यान, इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत काय रणनीती ठरते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

18:56 (IST) 5 Jun 2024
संजय मंडलिक यांच्या पराभवाचे चिंतन; महायुतीच्या नेत्यांची बैठक

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विजयाची अपेक्षा असताना पराभव पदरी पडल्यानंतर महायुतीचे नेते लगेचच सतर्क झाले आहेत.

सविस्तर वाचा…

18:50 (IST) 5 Jun 2024
एनडीएचे नेते लवकरच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेणार

सरकार स्थापन करण्यासाठी एनडीएचे नेते लवकरच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेणार आहेत. आज एनडीएची दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी एनडीएमधील नेते उपस्थित होते. आता ७ जून रोजी एनडीएच्या खासदारांच्या बैठकीनंतर सर्व मित्रपक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार घण्याची शक्यता आहे.

18:16 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Result Live : दिल्लीतील घडामोडींना वेग, भाजपा आजच सत्तास्थापनेचा दावा करणार

दिल्लीतील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एनडीएच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीला टीडीपीचे एन. चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे नेते नितीश कुमार यांच्यासह इतर मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर आता एनडीएकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. तसेच दुसरीकडे इंडिया आघाडीनेही घटकपक्षांची बैठक बोलावली असून समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, शरद पवार, सुप्रिया सुळे, सीताराम येचूरी, राघव चढ्ढा हे नेते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या घरी पोहोचले आहेत.

18:08 (IST) 5 Jun 2024
Lok Sabha Election 2024 Result Live : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक सुरू

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आता दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे एनडीएच्या घटक पक्षांची बैठक सुरू असताना आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक सुरू झाली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी या बैठकीसाठी उपस्थित आहेत.

17:48 (IST) 5 Jun 2024
भावना गवळींचे तिकीट कापणे शिंदे सेनेच्या अंगलट, हा निकाल युतीसाठी धोक्याची घंटा

वाशिम : मागील तीन टर्मपासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून खासदार भावना गवळी वाढत्या क्रमाने निवडून येत होत्या. यावेळी देखील त्यांनी निवडणुकीची तयारी केली होती. परंतु, ऐनवेळी त्यांचे तिकीट कापून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील महाले यांना उमेदवारी देण्यात आली.

सविस्तर वाचा…

17:14 (IST) 5 Jun 2024
फडणवीसांकडून राजीनाम्याच्या तयारीचे पडसाद उमटणे सुरू, समर्थकांनी सामूहिक…

नागपूर : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासह महायुतीला मिळालेले अपयश बघता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळे करण्यात यावे, अशी मागणी वरिष्ठांकडे करून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे फडणवीस समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

सविस्तर वाचा…

17:11 (IST) 5 Jun 2024
यवतमाळ- वाशीममध्ये सत्ताधारी महायुतीचे सात आमदार, तरीही मताधिक्य…….

यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीचे सात आमदार असतानाही शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांचा पराभव झाला.

सविस्तर वाचा…

17:01 (IST) 5 Jun 2024
यवतमाळ : ‘माहेरच्या ऋणाईतच राहील’, महायुतीच्या राजश्री पाटील यांचा विधानसभेपाठोपाठ लोकसभेतही पराभव

यवतमाळ : यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमदेवार राजश्री हेमंत पाटील यांना विधानसभेपाठोपाठ आता लोकसभा निवडणुकीतही पराभवास सामोरे जावे लागले आहे. २०१९ मध्ये राजश्री पाटील या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या. राजश्री पाटील यांच्या पराभवामुळे भाजपने निवडणुकीपूर्वी उपस्थित केलेल्या ‘इलेक्टिव मेरीट’च्या मुद्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सविस्तर वाचा…

16:48 (IST) 5 Jun 2024
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा व गोंदिया विधानसभेत महायुती, तर अर्जुनी मोरगावमध्ये आघाडीला मताधिक्य

गोंदिया : लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या विधानसभा क्षेत्रात लीड मिळेल तिथेच महायुतीतील त्या त्या आमदारास पुन्हा तिकीट देवू, असा इशारा दिला होता. ही निवडणूक तीन पक्ष मिळून लढत असल्यामुळे कोण कुणा इतर पक्षाचे काम करणार की नाही याला उद्देशून हे तंत्र असावे. पण गोंदिया जिल्ह्यात हे फसवे ठरले असल्याची प्रचिती लोकसभेत मिळालेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे.

सविस्तर वाचा…

16:40 (IST) 5 Jun 2024
कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेनेमध्ये इच्छुकांची रस्सीखेंच

कोकण पदवीधर निवडणूकीत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना अद्याप शिवसेनेने (शिंदे गट) उमेदवार निश्चित केला नाही.

सविस्तर वाचा…

16:36 (IST) 5 Jun 2024
पहिल्याच निवडणुकीत विजयाला गवसणी! अनुप धोत्रेंनी आजोबा व वडिलांचा राजकीय वारसा जोपासला

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी विजयश्री मिळवत पक्षाचा गड कायम राखला. अनुप धोत्रे यांनी आपले आजोबा व वडिलांचा राजकीय वारसा जोपासला आहे.

सविस्तर वाचा…

16:26 (IST) 5 Jun 2024
राज्यात आज पावसाचा ‘येलो अलर्ट’, पूर्व मोसमी पावसाची हजेरी

नागपूर : पूर्व मोसमी पावसाने गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात हजेरी लावली आहे. विशेषकरुन पुण्यात झालेल्या पावसामुळे शहर तुंबले आणि तारांबळ उडाली. आजदेखील राज्याच्या विविध भागात पूर्व मोसमी पावसाची हजेरी लागणार असून हवामान खात्याने संपूर्ण राज्यातच ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

सविस्तर वाचा…

नरेंद्र मोदी, अमित शाहांना किती मताधिक्क्य? 'या' चार उमेदवारांना देशात सर्वाधिक मते