Lok Sabha Election Results 2024 Leading & Trailing: लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालाच्या आधी एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले होते. त्यामध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला. एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर, इंडिया आघाडीला १५० ते १७० जागा मिळतील, असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं. मात्र, इंडिया आघाडीने २९५ जागा मिळतील, असा दावा केला आहे. एनडीए की इंडिया आघाडी कोण सत्ता स्थापन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक जागांवर चुरशीची लढत बघायला मिळाली होती. आता देशभरातील निकाल तुम्हाला एक क्लिकवर वाचा.
Election Results 2024, NDA Vs INDIA Alliance Vote Counting
लोकसभा निवडणुकीचे निकाल आता समोर येत आहेत. मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या हेमा मालिनी या १२ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तसेच रवी किशन हे गोरखपूर मतदारसंघातून ८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. मंडी मतदारसंघातून कंगना राणौत आघाडीवर आहेत. दिनेश लाल यादव आणि पवन सिंगही आघाडीवर आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल आता समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “आम्ही जिंकत आहोत, याचा मला आनंद आहे. संपूर्ण देश जिंकावा हीच माझी इच्छा आहे. अशी प्रार्थना घेऊन मी इथे आले आहे. मी देवाला प्रार्थना करते की मोदी पंतप्रधान बनतील, असं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.
#watch | Hema Malini says, "…I am happy that we are winning wonderfully. I would like the entire nation to win. That is my wish, I have come here with that prayer…I pray to God that PM Modi becomes the Prime Minister once again and the development of the country… https://t.co/2VeLmnA5Ju pic.twitter.com/CgOaH2c1eT
— ANI (@ANI) June 4, 2024
जनता दल सेक्युलर पक्षाचे (जेडीएस) हसन लोकसभा मतदरासंघाचे प्रज्वल रेवण्णाचा पराभव झाला आहे. प्रज्वल रेवण्णावर लैंगिक शोषणाचा आरोप आहे. सेक्स स्कँडल प्रकरणात गुन्हा दाखल असून प्रज्वल रेवण्णाला पोलिसांनी अटक केलेलं आहे.
ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे मनोज तिवारी यांनी ३ लाख मतांचा आकडा पार केला आहे. तर काँग्रेसचे कन्हैया कुमार पिछाडीवर आहेत. थोड्याच वेळात हा निकाल स्पष्ट होणार आहे.
मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव ६६,०८१ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत १९२९५२ मते मिळाली आहेत. तर भाजपाचे उमेदवार जयवीर सिंह यांना १२६८७१ मते मिळाली आहेत.
पश्चिम बंगाल येथील बहरामपूर मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार आणि उमेदवार अधीर रंजन चौधरी ९१९९ मतांच्या फरकाने पिछाडीवर आहेत. येथे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार युसूफ पठाण आघाडीवर आहेत. थोड्या वेळात निकाल स्पष्ट होणार आहे.
Congress MP and candidate from Behrampore (West Bengal), Adhir Ranjan Chowdhury trailing by a margin of 9199 votes.
TMC candidate Yusuf Pathan leading here. Counting underway. #loksabhaelections2024
(File photo) pic.twitter.com/yl9gy4JrJj
— ANI (@ANI) June 4, 2024
तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून द्रमुकचे उमेदवार गणपती राजकुमार पी ७,४०० जागांच्या फरकाने आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार के अन्नामलाई पिछाडीवर आहेत.
DMK candidate from Tamil Nadu's Coimbatore Lok Sabha seat Ganapathy Rajkumar P leading with a margin of 7,400 seats.
— ANI (@ANI) June 4, 2024
BJP candidate K Annamalai trailing. #loksabhaelections2024 pic.twitter.com/4yjAiVEYEC
लोकसभा निवडणुकीचे निकालाचा कल आता समोर येत आहे. छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पार्टी १० जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार आघाडीवर आहे. आता थोड्याच वेळात निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून दोन लाख मतांनी आघाडीवर आहेत. तसेच उत्तर प्रदेशातील रायबरेली येथूनही आघाडीवर आहेत. गांधीनगरमधून अमित शाह २ लाख ७६ हजार ५३४ मतांनी आघाडी घेतली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील वाराणसीमधून आघाडीवर आहेत.
पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीचे कल हाती आले असता तृणमूल काँग्रेस पक्षाच्या काही उमेदवारांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केली असून थोड्या वेळात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर आनंदोत्सव साजरा केला.
#watch | Kolkata, West Bengal: TMC workers celebrate outside party office as initial trends show massive victory for the party candidates. pic.twitter.com/GodsYByMWr
— ANI (@ANI) June 4, 2024
अमेठीत लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या स्मृती इराणी यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. स्मृती इराणी यांना ८५ हजार १२७ हजार मत पडले असून त्या पिछाडीवर आहेत. तर अमेठीत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार किशोरी लाल हे १ लाख २२ हजार मतांनी आघाडीवर आहेत. दुसरीकडे मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रणौत ३ लाख मतांनी आघाडीवर आहेत.
कंगना रणौतने मंडी लोकसभा मतदारसंघातून ३ लाख मतांनी आघाडी घेतली आहे. मंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार दोन लाखांनी पिछाडीवर आहेत. थोड्याच वेळात येथील निकाल समोर येणार आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून दोन लाख मतांनी आघाडीवर आहेत. तसेच उत्तर प्रदेशातील रायबरेली येथूनही आघाडीवर आहेत.
गांधीनगर मतदारसंघातून अमित शाह यांनी जवळपास २ लाख ७६ हजार ५३४ मतांनी आघाडी घेतली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून आघाडी घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून उत्तर प्रदेशच्या फैजाबादमधून सपाचे अवधेश प्रसाद 76 हजापेंक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे लल्लू सिंह पिछाडीवर आहेत. देशातील सर्वात महत्त्वाची जागा मानल्या जाणाऱ्या अयोध्येत म्हणजेच फैजाबाद लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान झाले होते. आता या निवडणुकीचा निकाला थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ हजापेंक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. वाराणसीमधून काँग्रेसचे अजय राय आघाडीवर गेले आहेत. या निवडणुकीचा निकाला थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल आता समोर येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरु असून सध्या मतमोजणीचे आकडे समोर येत आहेत. एनडीए सध्या तरी जास्त जागांवर आघाडीवर आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालाच्या आधी एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले होते. त्यामध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. सध्या सुरू असलेल्या मतमोजणीनुसार महाराष्ट्रात आणि देशात जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे? याबद्दल लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विश्लेषण केलं आहे.
समाजवादी पार्टी ३६ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर आहे. भाजपा ३४ जागांवर आघाडी आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेस मिळून ४३ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे एनडीएसाठी हा धक्का असणार आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू उत्तर प्रदेशमध्ये एकूण ८० जागा आहेत. यापैकी भारतीय जनता पार्टी ३७ जागांवर आघाडीवर आहे. तर समाजवादी पार्टी ३३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष तीन जागांवर आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये ‘काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू बिहारचा कौल काय? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी ३६ जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी फक्त ४ जागांवर आघाडीवर आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू मध्य प्रदेशचा कौल काय? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी २७ जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी २ जागांवर आघाडीवर आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू गुजरातचा कौल काय? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी २५ जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी १ जागांवर आघाडीवर आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी चौथ्या फेरीनंतर पुन्हा आघाडीवर आले आहेत. वाराणसीमधून काँग्रेसचे अजय राय आता पिछाडीवर गेले आहेत. या निवडणुकीचा निकाला थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ हजापेंक्षा अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. वाराणसीमधून काँग्रेसचे अजय राय ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत. या निवडणुकीचा निकाला थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. पंतप्रधान मोदी ६ हजार मतांनी पिछाडीवर जाताच काँग्रेसचे नेते जयरमेश यांनी’हा फक्त ट्रेलर’ आहे, असं म्हटलं आहे.
इसे ही *ट्रेलर* कहते हैं! pic.twitter.com/bCbUSL9ZTi
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 4, 2024
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत टीडीपी ३९ जागांवर आघाडीवर आहे. वाएसआर काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे. तर जनसेना पक्ष ५ जागांवर आघाडीवर आहे. भाजप २ जागांवर आघाडीवर आहे.
As per initial trends by ECI, TDP is leading on 39 seats, YSRCP leading on 11 seats, Jana Sena Party leading in 5 seats, BJP leading on 2 seats in the Andhra Pradesh Assembly elections. pic.twitter.com/RpOusoDISA
— ANI (@ANI) June 4, 2024
राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टी १५ जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी १० जागांवर आघाडीवर आहे. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्रात एनडीए १६ जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी ११ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर पक्ष २१ जागांवर आघाडीवर आहेत. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच सेन्सेक्स लाल रंगात उघडला आहे. सध्या १३४२.२२ अंकांनी घसरून ७५,१२६.५६ वर ट्रेंड करत आहे.
Sensex opens in red; currently down by 1342.22 points, trending at 75,126.56 pic.twitter.com/axuCsrPl0a
— ANI (@ANI) June 4, 2024
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. तर येथून काँग्रेसचे अजय राय ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत. या निवडणुकीचा निकाला थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासात समोर येणार आहे. काही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. निवडणुकीच्या निकालाआधी सर्वच पक्षाचे उमेदवार आपलाच विजय होईल, अशी आशा व्यक्त तरत आहेत. तसेच एकीकडे भारतीय जनता पार्टी ४०० पारचा दावा करत आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडी २९५ जागा येतील असा दावा करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले असून निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.