Premium

Madhya Pradesh Election Result 2023 : भाजपाला स्पष्ट बहुमत, काँग्रेसचा धोबीपछाड; नेमकी स्थिती काय?

Madhya Pradesh Legislative Assembly Election Result 2023 Live Updates : मध्य प्रदेशमध्ये २०१८ चा दीड वर्षांचा अपवाद वगळता २००३ पासून दोन दशके भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यापैकी १६ वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले.

Madhya Pradesh Election Result 2023 Live Updates in Marathi (2)
मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२३ लाइव्ह (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Madhya Pradesh Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023 : मध्य प्रदेशमध्ये २०१८ चा दीड वर्षांचा अपवाद वगळता २००३ पासून दोन दशके भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यापैकी १६ वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यामुळे या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला सत्ता मिळणार की, जनमत विरोधात जाऊन काँग्रेस सत्तेवर येणार याबाबत कमालीची उत्सुकता लागली होती. मात्र, सर्व एग्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरवत मध्य प्रदेशमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर सुरुवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतली, तर काँग्रेस पिछाडीवर पडली. २३० विधानसभा मतदारसंघांच्या या राज्यात बहुमताचा जादुई आकडा ११६ इतका आहे. तो भाजपाने सहजपणे पार केला आहे. आजच्या या मतमोजणी आणि निकालाच्या प्रत्येक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स…

Live Updates

MP Assembly Election Result 2023 Live Updates : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी आणि निकालाच्या प्रत्येक घडामोडीच्या लाईव्ह अपडेट्स…

23:59 (IST) 3 Dec 2023
मध्य प्रदेशात पुन्हा भाजपाचे कमळ फुलले

मध्य प्रदेश, रात्री १२ वाजेपर्यंतचा निकाल

भाजपा १६३ जागांवर विजयी,

काँग्रेस ६५ जागांवर विजयी, १ जागेवर आघाडी

भारतीय आदिवासी पार्टी १ जागेवर विजयी

21:45 (IST) 3 Dec 2023
शिवराज सिंग यांना विजयी प्रमाणपत्र सुपूर्त

21:44 (IST) 3 Dec 2023
तीन राज्यात अपयशाची अपेक्षा नव्हती – जयवर्धन सिंग

३ राज्यांमध्ये अशाप्रकारचे निकाल लागतील अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. आम्हाला विश्वास होता की आजचे व्यापारी, शेतकरी आणि तरुण भाजपने निर्माण केलेल्या महागाईने नाराज आहेत. कमलनाथ यांनी १५ महिन्यांत केलेल्या कामावर आमचा विश्वास होता. आम्ही आमचे म्हणणे मांडले पण कदाचित तसे झाले नाही. आपण याचे पुनर्परीक्षण केले पाहिजे – जयवर्धन सिंग, मध्य प्रदेश काँग्रेस नेता

19:20 (IST) 3 Dec 2023
“मोदींना शिवीगाळ करणं म्हणजे ओबीसींना शिवीगाळ करणं हे विरोधकांना…”; भाजपा अध्यक्षांचा हल्लाबोल

या निवडणुकीत काँग्रेसच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवरील वक्तव्ये केली. ही वक्तव्ये केवळ खालच्या पातळीची नाही, तर असंसदीयही होते. काँग्रेसच्या नेत्यांनी अशी टीका केली, जिचा सार्वजनिक ठिकाणी पुनरुच्चारही करता येत नाही. मोदींना शिवीगाळ करणं म्हणजे ओबीसींना शिवी देणं आहे हे त्यावेळी त्यांना माहिती नव्हतं का?

– जे. पी. नड्डा (भाजपा अध्यक्ष)

19:13 (IST) 3 Dec 2023
“निवडणुकांनी हा संदेश दिला आहे की…”; तीन राज्यांमधील विजय घोडदौडीनंतर भाजपा अध्यक्षांचं वक्तव्य

या निवडणुकींच्या निकालांनी हा संदेश दिला आहे की, मोदीच देशाला मजबूत करू शकतात. निवडणुकीच्या निकालाने हा स्पष्ट संदेश दिला आहे की, गरीब, वंचित, पीडित, शोषित, आदिवासी यांना मोदीच मुख्य प्रवाहात आणू शकतात.

– जे. पी. नड्डा (भाजपा अध्यक्ष)

18:29 (IST) 3 Dec 2023
“आमच्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे, ते म्हणजे…”; कमलनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

या लोकशाहीच्या सामन्यात आम्ही मध्य प्रदेशच्या जनतेचा निर्णय स्वीकार करतो. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमचं काम करत राहू. आमच्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे, ते म्हणजे तरुणांचं भविष्य, बेरोजगारी आणि शेतीवरील संकट. आपल्या अर्थव्यवस्थेत शेतीचा वाटा ७० टक्के आहे. शेती क्षेत्र मजबूत व्हावं याला आपलं प्राधान्य असलं पाहिजे.

– कमलनाथ सिंह (काँग्रेस नेते)

18:22 (IST) 3 Dec 2023
मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारूण पराभव; कमलनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आम्ही या निवडणुकीच्या निकालावर विचार करू. आमच्यात काय कमतरता आहेत याचं आत्मपरिक्षण करू. आम्ही मतदारांना आमचं म्हणणं का समजून सांगू शकलो नाही, यावर चर्चा करू. उमेदवार जिंकलेला असो, अथवा पराभूत झालेला असो; सगळ्यांशी चर्चा करू. त्या चर्चेनंतर आम्ही या निकालाचा निष्कर्ष काढू.

– कमलनाथ सिंह (काँग्रेस नेते)

16:49 (IST) 3 Dec 2023
“अमित शाह यांची अचूक रणनीती आणि…”; मध्य प्रदेश निकालावर शिवराज चौहान यांची प्रतिक्रिया

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजपा १५९ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसला केवळ ६८ जागांवर आघाडी घेण्यात यश आलं आहे. त्यामुळे २३० विधानसभा मतदारसंघ असलेल्या मध्य प्रदेशात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निवडणूक निकालाचे कल स्पष्ट झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीचा उल्लेख केला.

सविस्तर वाचा…

16:07 (IST) 3 Dec 2023
मध्य प्रदेशमध्ये कुणाला किती जागा? वाचा निवडणूक आयोगाची आकडेवारी…

16:03 (IST) 3 Dec 2023
मध्य प्रदेशात भाजपाची विजयी घोडदौड, पंकजा मुंडे म्हणाल्या, “पंतप्रधानांनाचा आदेश…”

मध्य प्रदेशातून भाजपासाठी अधिकृतरित्या गुड न्युज आली नसली तरीही आगामी दिवसांत मध्य प्रदेशात भाजपा सत्ता स्थापन करेल, असं चित्र निर्माण झालं आहे. या सर्व पार्श्वभूमवीर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशच्या सहप्रभारी पकंजा मुंडे यांनी एक्स पोस्ट करून भाजपाचे अभिनंदन केले आहे.

सविस्तर बातमी वाचा

15:22 (IST) 3 Dec 2023
“हा आमच्यासाठी फार मोठा धक्का, याची जबाबदारी…”; सुसकारा टाकत काँग्रेस नेत्या म्हणाल्या…

हा आमच्यासाठी फार मोठा धक्का आहे. कुणाला तरी याची जबाबदारी घ्यावीच लागेल. तीन राज्यांमध्ये पराभव का झाला यावर आम्हाला आत्मपरिक्षणही करावं लागेल. तसेच तत्काळ मैदानात उतरून काम सुरू करावं लागेल. ही एक निवडणूक आहे, ठीक आहे. पुढील पाच महिन्यात लोकसभा निवडणूकही आहे. अनेकदा मतदार राज्यात वेगळ्या पद्धतीने मतं देतात आणि केंद्रात वेगळ्या पद्धतीने मतदान देतात. आता आमच्याकडे हातावर हात चोळत बसण्याला वेळ नाही. आम्ही लढू आणि पुढे जाऊ.

– रेणुका चौधरी (काँग्रेस नेत्या)

15:03 (IST) 3 Dec 2023
मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? कैलाश विजयवर्गीय म्हणाले…

काँग्रेसने बसून पराभवावर आत्मपरिक्षण करावं. भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार मध्य प्रदेशला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारा असेल.

– कैलाश विजयवर्गीय (भाजपा नेते, मध्य प्रदेश)

14:29 (IST) 3 Dec 2023
मध्य प्रदेशात भाजपा नेत्यांचा जल्लोष

14:06 (IST) 3 Dec 2023
मध्य प्रदेशमध्ये कुणाला किती जागा? वाचा निवडणूक आयोगाची आकडेवारी…

13:46 (IST) 3 Dec 2023
“एग्झिट पोल, वर्तमानपत्रातील रिपोर्टमध्ये…”; आश्चर्य व्यक्त करत काँग्रेस नेते म्हणाले…

एग्झिट पोल, वर्तमानपत्रातील रिपोर्ट यात मध्य प्रदेशमध्ये बदल करण्याची भावना असल्याचं म्हटलं गेलं. मात्र, निकालात ते झालेलं नाही. ती भावना मतात रुपांतरीत झालेली नाही. आम्हाला आश्चर्य वाटत आहे की, हा बदल झाला का नाही.

– विवेक तंखा (काँग्रेस खासदार, राज्यसभा)

13:24 (IST) 3 Dec 2023
मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार? शिवराज सिंह यांचा मुलगा म्हणाला…

मध्य प्रदेशमधील विजयाचं श्रेय देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातं. भाजपाच्या सर्व नेत्यांना जातं. या विजयाचं सर्वाधिक श्रेय मध्य प्रदेशमधील लाडक्या बहिणींना, माझ्या आत्यांना जातं. निकालाचं चित्र जसजसं स्पष्ट होईल, तसं दिसेल की, भाजपाच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. शिवराज सिंह पाचव्यांदा मुख्यमंत्री होण्याबाबत पक्ष अंतिम निर्णय घेईल.

– कार्तिकेय चौहान

12:26 (IST) 3 Dec 2023
“मध्य प्रदेशमध्ये भाजपाचा खूप चांगला विजय, मोदींबद्दल…”; केंद्रीय मंत्री वैष्णव यांचं वक्तव्य

मध्य प्रदेशमध्ये भाजपाचा खूप चांगला विजय झाला आहे. राज्यात भाजपा सरकारने चांगलं काम केलं आहे. डबल इंजिन सरकारबद्दल, मोदींबद्दल जनमानसात विश्वास आहे. तसेच शिवराज सिंह चौहान यांनी केलेल्या कामाचा परिणाम आज निकालात दिसला आहे. मध्य प्रदेशच्या जनतेचं अभिनंदन.

– अश्विनी वैष्णव (केंद्रीय मंत्री)

12:21 (IST) 3 Dec 2023
मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेसला किती जागा? वाचा…

12:18 (IST) 3 Dec 2023
‘लाडली बेटी’ने सर्व काटे काढले का? शिवराज सिंह म्हणाले…

लाडली बेटीच नाही, तर लाडली लक्ष्मी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण, कन्या विवाह, पंतप्रधान मोदींची योजना प्रधानमंत्री मातृवंदना या सर्वांची प्रभावी अंमलबजावणी, ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’सारखे अभियान, संपत्तीची खरेदी करताना महिलांना नोंदणी शुल्कात सवलत, ३५ टक्के भरती यामुळे महिलांचं आयुष्य बदललं. त्यामुळे त्यांच्या मनात प्रेम आणि विश्वास निर्माण झाला.

– शिवराज सिंह चौहान (मुख्यमंत्री, मध्य प्रदेश)

11:59 (IST) 3 Dec 2023
“अमित शाह यांची अचूक रणनीती”; मध्य प्रदेश निकालावर शिवराज चौहान यांची प्रतिक्रिया

अमित शाह यांची अचूक रणनीती, त्याला मिळालेला प्रतिसाद, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं मिळालेलं मार्गदर्शन, संघटनेचं नेतृत्व आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे निवडणुकीला वेग आला. त्यामुळेच मी आधीही म्हटलं होतं की, आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल. कारण जनतेचं प्रेम सगळीकडे दिसत होतं.

– शिवराज सिंह चौहान (मुख्यमंत्री, मध्य प्रदेश)

11:55 (IST) 3 Dec 2023
आमच्या कामाने जनतेची मनं जिंकली – शिवराज सिंह चौहान

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने केलेल्या कामाची आम्ही मध्य प्रदेशमध्ये योग्यरीत्या अंमलबजावणी केली. तसेच मध्य प्रदेशमध्ये लाडली लक्ष्मीपासून लाडली बेहना अशा योजना आणल्या. त्यामुळे गरिबांसाठी, भाचे-भाच्यांसाठी काम झालं. या कामानेही जनतेची मनं जिंकली. तसेच मध्य प्रदेश एक कुटुंब बनला.

– शिवराज सिंह चौहान (मुख्यमंत्री, मध्य प्रदेश)

11:44 (IST) 3 Dec 2023
…म्हणून मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत हा निकाल बघायला मिळाला – शिवराज सिंह चौहान

नरेंद्र मोदी मध्य प्रदेशच्या जनतेच्या मनात आहेत. मोदींच्या मनातही मध्य प्रदेश आहे. त्यांनी मध्य प्रदेशात ज्या सभा घेतल्या, जनतेला आवाहन केलं ते जनतेच्या मनाला स्पर्श करून गेलं. त्यामुळेच हा निवडणूक निकालाचा कल समोर येत आहे. हेच या निकालाचं प्रमुख कारण आहे.

– शिवराज सिंह चौहान (मुख्यमंत्री, मध्य प्रदेश)

11:03 (IST) 3 Dec 2023
निकालाच्या दिवशी भोपाळ गॅस गळतीवर बोलत शिवराज सिंह चौहान म्हणाले…

आजही २ आणि ३ डिसेंबरची रात्र आठवते तेव्हा अंगावर काटा येतो. गॅस गळतीमुळे भोपाळमध्ये लहान मुलांसह हजारो भाऊ आणि बहिणींचा जीव गेला. भोपाळचं ते दृश्य विसरलं जात नाही. त्यावेळी रस्त्यावर लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते. ते भयानक दृश्य असं होतं की, अनेक गायांचे पोट फुटले होते. पळता पळता अनेक लोक पडले आणि कायमस्वरुपी हे जग सोडून गेले.

– शिवराज सिंह चौहान (मुख्यमंत्री, मध्य प्रदेश)

10:57 (IST) 3 Dec 2023
मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेसला किती जागा? वाचा…

10:11 (IST) 3 Dec 2023
मध्य प्रदेशात भाजपाची मुसंडी, काँग्रेस पिछाडीवर; कुणाला किती जागा? वाचा…

09:14 (IST) 3 Dec 2023
मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेसला किती जागा? वाचा…

08:54 (IST) 3 Dec 2023
सुरुवातीच्या मतमोजणीत भाजपा पुढे, तर काँग्रेस मागे; कमलनाथ म्हणाले, “मी निकालाचे…”

मी निकालाचे सुरुवातीचे कल बघितलेले नाहीत. ११ वाजेपर्यंत मी कोणताही कल पाहणं गरजेचं नाही. मला मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल याबाबत अगदी आत्मविश्वास आहे. माझा मध्य प्रदेशच्या मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. किती जागा येणार याचा अंदाज मी करत नाही. मी मतदारांच्या मताकडे लक्ष देतो.

– कमलनाथ सिंह

08:39 (IST) 3 Dec 2023
मतमोजणीला सुरुवात, मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेसला किती जागा? वाचा…

08:23 (IST) 3 Dec 2023
मतमोजणीला सुरुवात, मध्य प्रदेशमध्ये भाजपा ८, तर काँग्रेस ७ जागांवर पुढे

मध्य प्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच भाजपा ८ मतदारसंघांमध्ये पुढे आहे, तर काँग्रेसला ७ जागांवर आघाडी मिळाली आहे. यावरून मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्षांत ‘काँटे की टक्कर’ असल्याचं दिसत आहे.

07:34 (IST) 3 Dec 2023
आम्ही मध्य प्रदेशमध्ये १२५ ते १५० जागा जिंकू – नरोत्तम मिश्रा

आम्ही मध्य प्रदेशमध्ये १२५ ते १५० जागा जिंकू आणि राज्यात भाजपाचंच सरकार स्थापन होईल. आता केवळ काही तासांचा अवधी आहे.

– नरोत्तम मिश्रा (भाजपा नेते, मध्य प्रदेश मंत्री)

06:44 (IST) 3 Dec 2023
आता आमचं पुढचं ध्येय २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व २९ जागा जिंकणं – क्रिष्णा गौर

भाजपा मध्य प्रदेशमध्ये पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करेल. आमचं पुढचं ध्येय २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व २९ जागा जिंकणं हे आहे. काँग्रेसला त्यांचा पराभव समजला आहे. यावेळी आमचा ऐतिहासिक विजय होईल.

– क्रिष्णा गौर (भाजपा उमेदवार, गोविंदपुरा, भोपाळ)

06:36 (IST) 3 Dec 2023
मध्य प्रदेशात भाजपाला १५० हून अधिक जागा मिळतील – विश्वास सारंग

आम्ही मोठ्या बहुमताने मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकू. भाजपाला १५० हून अधिक जागा मिळतील आणि आमचं सरकार स्थापन होईल.

– विश्वास सारंग (वैद्यकीय शिक्षण मंत्री, मध्य प्रदेश)

06:34 (IST) 3 Dec 2023
भोपाळमध्ये मतमोजणीची तयारी सुरू, थोड्याच वेळेत मतमोजणीला सुरुवात होणार

भोपाळमध्ये मतमोजणीची तयारी सुरू, थोड्याच वेळेत मतमोजणीला सुरुवात होणार

06:15 (IST) 3 Dec 2023
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने? काय सांगतायत एग्झिट पोल?

06:13 (IST) 3 Dec 2023
मध्य प्रदेशात दोन दशकांचे वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपची धडपड

मध्य प्रदेशमध्ये २०१८ चा अपवाद वगळता २००३ पासून दोन दशके भाजपची सत्ता राहिली आहे. त्यापैकी १६ वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र जनमत विरोधात जाण्याची भाजप आणि शिवराज या दोघांनाही भीती असल्याने त्यांना सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागत आहे. त्यामुळेच कदाचित भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. भाजपची सर्व भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असून त्यांनी काँग्रेस राजवटीतील गैरकारभार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारातून ऐरणीवर आणला आहे.

सविस्तर वाचा…

06:12 (IST) 3 Dec 2023
लालकिल्ला: मध्य प्रदेशातील अटीतटी!

उत्तर प्रदेशमध्ये केंद्रीय योजनांचा राजकीय लाभ मिळाला तसा मध्य प्रदेशातही मिळेल असा भाजपचा विश्वास आणि  विद्यमान कारभाराला लोक विटले असल्याने स्थानिक मुद्दय़ांच्या आधारे यंदा स्पष्ट बहुमताची काँग्रेसची उमेद, यांचा हा सामना आहे..

सविस्तर वाचा…

मध्य प्रदेशमध्ये जनता भाजपाला पुन्हा सत्ता देते की काँग्रेसला संधी देते हे पाहणं महत्त्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी आणि निकालाच्या सर्व लाईव्ह अपडेट्स…

Web Title: Madhya pradesh assembly election result 2023 live updates in marathi vote counting congress bjp latest news pbs

First published on: 03-12-2023 at 06:04 IST
Next Story
Assembly Election Results 2023 Date Time : मतमोजणीला उरले अवघे काही तास; कुठे, कधी आणि कसा पाहाल निकाल?