Maharashtra Assembly Election 2024 Sharad Pawar NCP & Ajit Pawar Party Candidates Lists : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (शरद पवार) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे आता बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई पाहायला मिळणार आहे. तर, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) विधानसभेसाठीच्या उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. यापैकी पहिल्या यादीत ३८ तर दुसऱ्या यादीद्वारे सात उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ते आता बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे.

गेल्या वर्षी (२०२३) जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. अजित पवारांनी पक्षातील ४१ आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळी चूल मांडली. तसेच या गटाला आपल्याबरोबर घेत त्यांनी राज्यातील तत्कालीन युतीच्या (शिंदेंची शिवसेना भाजपा) सरकारमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. तर शरद पवारांच्या गटाला आपलं नावं बदलावं लागलं, तसेच नव्या निवडणूक चिन्हासह निवडणुका लढवाव्या लागत आहेत. गेल्या सव्वा वर्षांपासून या दोन पक्षांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. हा संघर्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही दिसणार आहे. शरद पवारांच्या पक्षाने ४४ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४५ उमेदवार जाहीर केले आहेत. दोन्ही पक्ष १५ मतदारसंघांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्यातील १५ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : अमित ठाकरेंविरोधात निवडणूक लढण्यास सदा सरवणकर ठाम; सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष!
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fourth list of 7 candidates
Sharad Pawar NCP 4th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fifth list of 5 candidates
Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
close race between Kamala Harris and Donald Trump in US election 2024
अमेरिकेत अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात अभूतपूर्व चुरस! अधिक मते मिळूनही होऊ शकतो पराभव?

हे ही वाचा >> २६ मतदारसंघांत ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ सामना रंगणार! ठाकरे-शिंदेंकडून उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर

बारामतीत काका विरुद्ध पुतण्यात तर अहेरी मतदारसंघात बाप विरुद्ध लेक असा सामना रंगणार आहे. अजित पवारांनी अहेरी मतदारसंघातून धर्मराव अत्राम यांना उमेदवारी दिली आहे. तर, शरद पवारांनी याच मतदारसंघातून अत्राम यांची कन्या भाग्यश्री अत्राम यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.

१५ मतदारसंघांमध्ये ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ लढाई!

क्र.मतदारसंघराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१.बारामतीयुगेंद्र पवारअजित पवार
२.इंदापूरहर्षवर्धन पाटीलदत्तात्रय भरणे
३.आंबेगावदेवदत्त निकमदिलीप वळसे पाटील
४.अहेरीभाग्यश्री अत्रामधर्मराव अत्राम
५.कागलसमरजीत घाटगेहसन मुश्रीफ
६.मुंब्रा-कळवाजितेंद्र आव्हाडनजीब मुल्ला
७.हडपसर प्रशांत जगतापचेतन तुपे
८.वसमतजयप्रकाश दांडेगावकरचंद्रकांत नवघरे
९.वडगाव-शेरीबापूसाहेब पठारेसुनील टिंगरे
१०.चिपळूणप्रशांत यादवशेखर निकम
११.शिरुरअशोक पवारज्ञानेश्वर कटके
१२.तासगाव – कवठे महांकाळरोहित पाटीलसंजयकाका पाटील
१३.इस्लामपूरजयंत पाटीलनिशिकांत पाटील
१४.उदगीरसुधाकर भालेरावसंजय बनसोडे
१६.कोपरगावसंदीप वर्पेआशुतोष काळे

हे ही वाचा >> मोठी बातमी! काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?

राष्ट्रवादीची (शरद पवार) पहिली यादी

इस्लामपूरजयंत पाटील
काटोलअनिल देशमुख
घनसावंगीराजेश टोपे
कराड उत्तरबाळासाहेब पाटील
मुंब्रा कळवाजितेंद्र आव्हाड
कोरेगावशशिकांत शिंदे
वसमतजयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीणगुलाबराव देवकर
इंदापूरहर्षवर्धन पाटील
१०राहुरीप्राजक्त तनपुरे
११शिरूरअशोक पवार
१२शिराळामानसिंगराव नाईक
१३विक्रमगडसुनील भुसारा
१४कर्जत जामखेडरोहित पवार
१५अहमदपूरविनायकराव पाटील
१६सिंदखेडराजाडॉ. राजेंद्र शिंगणे
१७उदगीरसुधाकर भालेराव
१८भोकरदनचंद्रकांत दानवे
१९तुमसरचरण वाघमारे
२०किनवटप्रदीप नाईक
२१जिंतूरविजय भांबळे
२२केजपृथ्वीराज साठे
२३बेलापूरसंदीप नाईक
२४वडगाव शेरीबापूसाहेब पठारे
२५जामनेरदिलीप खोडपे
२६मुक्ताईनगररोहिणी खडसे
२७मुर्तिजापूरसम्राट डोंगरदिवे
२८नागपूर पूर्वदुनेश्वर पेठे
२९तिरोडारविकांत बोपचे
३०अहेरीभाग्यश्री आत्राम
३१बदनापूररुपकुमार चौधरी
३२मुरबाडसुभाष पवार
३३घाटकोपर पूर्वराखी जाधव
३४आंबेगावदेवदत्त निकम
३५बारामतीयुगेंद्र पवार
३६कोपरगावसंदीप वर्पे
३७शेवगावप्रताप ढाकणे
३८पारनेररानी लंके
३९आष्टीमहेबुब शेख
४०करमाळानारायण पाटील
४१सोलापूर उत्तरमहेश कोठे
४२चिपळूनप्रशांत यादव
४३कागलसमरजीत घाटगे
४४तासगाव-कवठे महांकाळरोहित पाटील
४५हडपसरप्रशांत जगताप

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी

बारामतीअजित पवार
येवलाछगन भुजबळ
आंबेगावदिलीप वळसे पाटील
कागलहसन मुश्रीफ
परळीधनंजय मुंडे
दिंडोरीनरहरी झिरवळ
अहेरीधर्मरावबाबा आत्राम
श्रीवर्धनआदिती तटकरे
अंमळनेरअनिल पाटील
१०उदगीरसंजय बनसोडे
११अर्जुनी- मोरगावराजकुमार बडोले
१२माजलगावप्रकाश सोळंके
१३वाईमकरंद पाटील
१४सिन्नरमाणिकराव कोकाटे
१५खेड आळंदीदिलीप मोहिते
१६अहिल्यानगर शहर (अहमदनगर)संग्राम जगताप
१७इंदापूरदत्तात्रय भरणे
१८अहमदपूरबाबासाहेब पाटील
१९शहापूरदौलत दरोडा
२०पिंपरीअण्णा बनसोडे
२१कळवणनितीन पवार
२२कोपरगावआशुतोष काळे
२३अकोलेकिरण लहामटे
२४वसमतचंद्रकांत नवघरे
२५चिपळूणशेखर निकम
२६मावळसुनील शेळके
२७जुन्नरअतुले बेनके
२८मोहोळयशवंत माने
२९हडपसरचेतन तुपे
३०देवळालीसरोज अहिरे
३१चंदगडराजेश पाटील
३२इगतपुरीहिरामण खोसकर
३३तुमसरराजू कारेमोरे
३४पुसदइंद्रनील नाईक
३५अमरावती शहरसुलभा खोडके
३६नवापूरभरत गावित
३७पाथरीउत्तमराव विटेकर
३८मुंब्रा कळवानजीब मुल्ला

Story img Loader