बारामतीकरांनो लोकसभा निडणुकीत तुम्ही शरद पवार साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. तसेच राज्यातील जनतेने विकासासाठी महायुतीला मतदान करावे, असेही ते म्हणाले. दरम्यान, अजित पवारांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. ते गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहे. जास्तीत लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आज बारामतीत अशाच एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी मतदारांना लोकसभेप्रमाणे भावनिक होऊन मतदान न करण्याचं आवाहन केलं.

AMit Thackeray Prasad lad
“भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार”, प्रसाद लाडांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “सरवणकरांना विधान परिषदेवर…”
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”

हेही वाचा – Chhagan Bhujbal : अजित पवार आणि सुप्रिया सुळे भाऊबीजेच्या निमित्ताने एकत्र येणार? छगन भुजबळ म्हणाले, “निदान पुढच्या वर्षी तरी…”

अजित पवार म्हणाले, “लोकसभेला तुम्ही बोलत नव्हता, पण तुम्ही मनातून ठरवलं होतं. त्यावेळी तुमच्यामध्ये एक अंडरकरंट होता. तेव्हा काहीजण म्हणत होते, ताई निवडणुकीत पडल्या तर साहेबांना या वयात कसं वाटेल? त्यामुळे तुम्ही तेव्हा ताईला मतदान केलं. पण आता विधानसभेची निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत ताईला मतदान करून तुम्ही साहेबांना खूश केलं, आता विधानसभा निवडणुकीत मला मतदान करून खूश करा.”

पुढे बोलताना, “लोकसभा निवडणुकीत तुम्ही दिलेला निकाल मी स्वीकारला. मात्र आता आपल्या भागाच्या विकासासाठी तुम्ही मला मतदान करा. लोकसभेला तुम्ही सुप्रिया सुळे यांना निवडणूक दिलं. आता विधानसभेला घडाळासमोरील बटन दाबून मला विजयी करा. ते त्यांच्या पद्धतीने तालुक्याचा विकास करतील, मी माझ्या पद्धतीने विकास करेन”, अशीही प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – Jitendra Awhad: “अजित पवार मर्द असतील तर…”, जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह विधान; अजित पवार गटाचा पलटवार

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. विशेष म्हणजे अजित पवारांच्या मतदारसंघातही सुप्रिया सुळे यांना तब्बल ४८ हजार मतं मिळाली होती. त्यामुळे बारामतीतील जनता शरद पवार यांच्या बाजुने असल्याचे सिद्ध झालं होतं. त्यानंतर अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन चूक केली, अशी कबुलीही दिली होती.

Story img Loader