केंद्रीय निवडणूक आयोगानं आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानुसार २० नोव्हेंबर रोजी मतदान व २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. निवडणुकीच्या वेळापत्रकापासून मतदारांसाठीच्या सुविधांपर्यंत सर्व तपशील केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितला. त्यामध्ये मतदारांसाठीच्या तीन मोबाईल अ‍ॅपचा उल्लेख राजीव कुमार यांनी केला.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्येही मतदारांच्या सोयीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं. त्यात त्यांनी VHA, cVigil व KYC या तीन मोबाईल अ‍ॅपबाबत माहिती दिली. या तीन मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने मतदारांना निवडणूक प्रक्रियेबाबत, त्यांच्या उमेदवारांबाबत व गैरप्रकारांबाबतही माहिती मिळू शकेल.

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते, एकनाथ शिंदे दिलदार माणूस-राज ठाकरे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Vote and get discount on hotel bill 10 percent discount on payment of voters on behalf of Pune Hotel Association
मतदान करा अन् बिलात सवलत मिळवा! पुणे हॉटेल संघटनेच्यावतीने मतदारांच्या देयकावर १० टक्के सूट
dr sulakshana shilwant dhar
“तीच्यावर पक्षाचा फार जीव”, शिलवंत यांचं तिकीट कसं कापलं? अजित पवारांनी सगळं सांगितलं
Rajan Vikhare, demands CCTV system
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची मागणी
Chandrapur marathi news
एकदाच मतदान करण्याचा अधिकार…पण, या गावात मात्र दोन वर्षांत चौथ्यांदा…
maharashtra assembly election quiz
Election Quiz: महाराष्ट्रात सर्वाधिकवेळा आमदार होण्याचा विक्रम कुणाच्या नावावर? क्विझ सोडवा, स्मार्टफोन जिंका
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : “महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते लाडकी बहीण योजना..”, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

१. VHA – वोटर हेल्पलाईन अ‍ॅप

निवडणूक आयोगानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये या अ‍ॅपसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार मतदारांना नाव नोंदणीसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे, मतदार यादी आपलं नाव तपासणे, मतदान केंद्राबाबतचा तपशील माहिती करून घेणे, आपल्या मतदान परिसराच्या बीएलओ किंवा ईआरओ पदाधिकाऱ्याशी संपर्क साधणे आणि ई-मतदान ओळखपत्र डाऊनलोड करणे अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.

२. cVigil

लोकसभा निवडणुकीवेळीही निवडणूक आयोगानं सी-व्हिजिल या मोबाईल अ‍ॅपचा वापर केला होता. यासंदर्भात यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माहिती दिली. “याबाबत आम्ही फार उत्सुक आहोत. लोकसभा निवडणुकीदरम्यान आम्ही १० हजार कोटींची रोकड जप्त केली. नुकत्याच झालेल्या जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्येही आम्ही मोठी रक्कम जप्त केली. आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्र व झारखंडमध्येही सजग नागरिक आम्हाला या अ‍ॅपवर त्यांच्या भागात घडणाऱ्या कोणत्याही गैरप्रकाराबाबत माहिती देतील. आम्ही तिथे ९० मिनिटांच्या हात पोहोचू”, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.

३. KYC – तुमच्या उमेदवाराला जाणून घ्या

निवडणूक आयोगानं या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून उमेदवारांची सर्व माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन केलं आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाप्रमाणेच केवायसी अ‍ॅपवरही उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र मतदारांना पाहता येईल. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना त्यांची माहिती वर्तमानपत्रामध्ये तीन वेळा द्यावी लागेल, प्रत्येक मतदाराला उमेदवाराबाबतची माहिती मिळवण्याचा अधिकार आहे, असं निवडणूक आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं.

४. सुविधा पोर्टल

दरम्यान, मतदारांप्रमाणेच उमेदवारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाकडून सुविधा पोर्टलची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावर उमेदवारांना उमेदवारी अर्ज व प्रतिज्ञापत्र भरता येईल. तसेच, बैठका, सभा अशा गोष्टींसाठी उमेदवारांना या पोर्टलवरच ऑनलाईन पद्धतीने परवानगी घेता येईल. त्यामुळे ज्याचा आधी अर्ज येईल, त्या उमेदवाराला आधी परवानगी मिळेल, अशा पद्धतीने न्याय्य प्रक्रिया राबवली जाईल.