Maharashtra MNS Candidate List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या पाचव्या यादीत १५ जणांची नावे जाहीर करण्यात आली असून आतापर्यंत ७८ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ही यादी (MNS Fifth List) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा केला. तसंच या वेळी आपण २०० ते २२५ जागा लढणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार आता ही नावं समोर येत आहेत.

Raj thackeray sixth List
MNS Candidates List : मनसेची सहावी यादी जाहीर; मुंबई-ठाण्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा!
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
MNS Fourth List
MNS Fourth List : मनसेची चौथी यादी जाहीर कसबा पेठ मतदारसंघातून ‘या’ उमेदवाराला तिकिट
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fourth list of 7 candidates
Sharad Pawar NCP 4th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fifth list of 5 candidates
Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी

मनसेची पाचवी यादी (Fifth List of MNS)

विधानसभा मतदारसंघउमेदवाराचे नाव
पनवेलयोगश जनार्दन चिले
खामगांवशिवशंकर लगर
अक्कलकोटमल्लिनाथ पाटील
सोलापूर शहर मध्यनागेश पासकंटी
जळगाव जमोदअमित देशमुख
मेहकरभय्यासाहेब पाटील
गंगाखेडरुपेश देशमुख
उमरेडशेखर दंडे
फुलंब्रीबाळासाहेब पार्थीकर
परांडाराजेंद्र गपाट
उस्मानाबाद (धाराशिव)देवदत्त मोरे
काटोलसागर दुधाने
बीडसोमेश्वर कदम
श्रीवर्धनफैझल पोपेरे
राधानगरीयुवराज येडुरे

राज ठाकरेंनी शनिवारी १५ नावं जाहीर केली. याआधी चौथ्या यादीत १३ जणांची नावे जाहीर केली होती. तर, आत्तापर्यंत एकूण मनसेनेने ७८ नावं जाहीर केली आहेत. आणखी कुठे कसे उमेदवार जाहीर केले जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अनेक पक्षांनी उमेदवारांना एबी फॉर्मही वाटला आहे. २९ तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तोपर्यंत अनेकांचे जागा वाटप स्पष्ट झाले असतील.

मनसेचे आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार (MNS All Declare Candidates)

  • राजू पाटील- कल्याण
  • अमित ठाकरे -माहीम
  • शिरीष सावंत-भांडुप
  • संदीप देशपांडे-वरळी
  • अविनाश जाधव-ठाणे शहर
  • संगिता चेंदवणकर -मुरबाड
  • किशोर शिंदे- कोथरुड
  • साईनाथ बाबर-हडपसर
  • मयुरेश वांजळे- खडकवासला
  • प्रदीप कदम-मागाठाणे
  • कुणाल माईणकर-बोरीवली
  • राजेश येरुणकर-दहिसर
  • भास्कर परब-दिंडोशी
  • संदेश देसाई-वर्सोवा
  • महेश फरकासे-कांदिवली पूर्व
  • वीरेंद्र जाधव -गोरेगांव
  • दिनेश साळवी-चारकोप
  • भालचंद्र अंबुरे- जोगेश्वरी पूर्व
  • विश्वजीत ढोलम-विक्रोळी
  • गणेश चुक्कल- घाटकोपर पश्चिम
  • संदीप कुलथे-घाटकोपर पूर्व
  • माऊली थोरवे-चेंबूर
  • जगदीश खांडेकर-मानखुर्द-शिवाजीनगर
  • निलेश बाणखेले-ऐरोली
  • गजानन काळे-बेलापूर
  • सुशांत सूर्यराव-मुंब्रा-कळवा
  • विनोद मोरे- नालासोपारा
  • मनोज गुळवी-भिवंडी-पश्चिम
  • संदीप राणे – मिरा भाईंदर
  • हरिश्चंद्र खांडवी- शहापूर
  • महेंद्र भानुशाली-चांदिवली
  • प्रमोद गांधी-गुहागर
  • रविंद्र कोठारी-कर्जत-जामखेड
  • कैलास दरेकर-आष्टी
  • मयुरी म्हस्के-गेवराई
  • शिवकुमार नगराळे-औसा
  • अनुज पाटील-जळगाव
  • प्रवीण सूर- वरोरा
  • रोहन निर्मळ- कागल
  • वैभव कुलकर्णी- तासगांव-कवठे महाकाळ
  • महादेव कोनगुरे-सोलापूर दक्षिण
  • संजय शेळके-श्रीगोंदा
  • विजयराम किनकर-हिंगणा
  • आदित्य दुरुगकर-नागपूर दक्षिण
  • परशुराम इंगळे-सोलापूर शहर, उत्तर
  • गणेश भोकरे, कसबा पेठ
  • गणेश बरबडे, चिखली
  • अभिजित राऊत, कोल्हापूर, उत्तर
  • रमेश गालफाडे, केज
  • संदीप उर्फ बाळकृष्ण हटगी, कलीना