महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपनं जोरदार मुसंडी मारली. मुंबईसह राज्यातील तब्बल २५ महापालिकांमध्ये भाजपनं विजय मिळवला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईत २५ वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या भाजपा युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावलीय. ८९ जागा मिळवत मुंबईत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असल्याचं स्पष्ट झालं. मुंबईची निवडणूक यंदा सर्वार्थानं वेगळी होती. तब्बल २० वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येत निवडणूक लढवली. ठाकरे बंधूंना ७१ जागी यश मिळालं आहे. दरम्यान राज्यभरात कुठल्या पक्षाचे किती उमेदवार विजयी झाले आहेत जाणून घेऊ.
| महाराष्ट्राताल्या २५ महापालिकांमध्ये भाजपाची सत्ता | राज्यभरात कुणाचे किती नगरसेवक निवडून आले? |
| पक्षनिहाय निकाल | |
| पक्ष | राज्यभरात किती नगरसेवक |
| भाजपा | १४२५ |
| काँग्रेस | ३२४ |
| शिवसेना एकनाथ शिंदे</td> | ३९९ |
| राष्ट्रवादी अजित पवार</td> | १६७ |
| शिवसेना- उद्धव ठाकरे</td> | १५५ |
| राष्ट्र्ट्रवादी-शरद पवार | ३६ |
| मनसे | १३ |
| एआयएमआयएम | १२५ |
| सीपीआय एम | ० |
| बसपा | ६ |
| अपक्ष | १९ |
भाजपाची राज्यभरात जोरदार मुसंडी
२९ महापालिकांपैकी भाजपाने २५ महापालिकांमध्ये विजय मिळवला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे पुणे नाशिक, नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपा महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झालं आहे. भिवंडी, लातूर, चंद्रपूर आणि वसई विरार या चार महापालिका वगळता उर्वरित महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता आली आहे. महापालिका निवडणुकांकडे मिनी विधानसभा म्हणूनच पाहिलं जात होतं. भाजपाने या निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्यामुळे भाजपा १४२५ नगरसेवकांसह राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य काय?
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. महाराष्ट्रात आपल्या पक्षाने महाविजय मिळवला. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये महाविजय मिळवला आहे. आपण सगले रेकॉर्ड आपण मोडले आहेत. २९ पैकी २५ महापालिकांमध्ये आपली सत्ता येते आहे. अजूनही मतमोजणी सुरु आहे.पूर्ण बहुमत आपल्यालाच मिळणार आहे. मुंबईच्या महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल यात शंका नाही. मोदींच्या आशीर्वादाने विकासाचा अजेंडा दिला आहे तो घेऊनच आपण जनतेत गेले होतो. त्याला जनतेने आशीर्वाद दिला आहे.”
