ECI on Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Dates Constituencies with least voting : भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. तर, झारखंडमध्ये दोन टप्प्यांमध्ये (१३ व २० नोव्हेंबर रोजी) मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राबरोबरच या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. २५ नोव्हेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पाडणं हे निवडणूक आयोगाचं उद्दीष्ट असल्याचं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केलं.

दरम्यान, निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी अनेक मतदारसंघांमधील मतदानाचं कमी प्रमाण पाहून चिंता व्यक्त केली. त्यांनी लोकसभा निवडणुकीतील विविध मतदारसंघांमधील मतादानाची टक्केवारी जाहीर करत सुधारणांची आवश्यकता असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील शहरी भागांमधील अनेक मतदारसंघांबाबत आम्हाला चिंता आहे. या भागातील मतदारांना आम्ही विनंती करतो की मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजावा, लोकशाहीच्या उत्सहात सहभागी व्हा”.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Date Announced : महाराष्ट्र विधानसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात; वाचा निवडणूक प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक!

राजीव कुमार म्हणाले, “मतदानाच्या बाबतीत शहरी भागात आम्हाला चांगल्या गोष्टी पाहायला मिळालेल्या नाहीत. देशातील अनेक शहरांमध्ये अशीच स्थिती आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गुरुग्राम, फरीदाबाद, हैदराबादमधील जुबिली हिल्स, गुजरातमधील गांधीनगर, बंगळुरू दक्षिण आणि दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघात खूप कमी मतदानाची नोंद झाली आहे. तसेच पुणे, ठाणे व डोंबिवलीतही मतदानाची टक्केवारी कमी होती. येथील मतदानाची आकडेवारी सुधारावी यासाठी आम्ही त्या-त्या शहराचे पालिका आयुक्त व विभागीय अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन येथील मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी काय काय करता येईल याची योजना तयार करणार आहोत. येथील मतदारांना मतदान केंद्रांकडे कसं वळवता येईल यासाठी विशेष प्रयत्न करू. कारण येथील स्थिती पार बरी दिसत नाहीये”.

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Date Announced : ठरलं! महाराष्ट्र निवडणुकीची तारीख जाहीर, नोव्हेंबर महिन्यातल्या ‘या’ तारखेला निवडणूक, तर निकाल ‘या’ तारखेला

लोकसभेला सर्वात कमी मतदान झालेले विधानसभेचे मदारसंघ

क्र.मतदारसंघमतदानाची टक्केवारी
कल्याण४०.१
डोंबिवली४०.८
कल्याण (पश्चिम)४१.९
वर्सोवा४२.४
अंबरनाथ४२.५
ऐरोली४२.६
ओवळा-माजिवडा४३.१
पुणे कॅन्टॉन्मेंट४३.४
अंधेरी पश्चिम४३.५
१०कल्याण पूर्व४३.७

Story img Loader