Maharashtra Assembly Election 2024 Updates : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या निवडणुकीत रंगणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असून सर्वच पक्षाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर काही मतदारसंघात काहीसं नाराजीचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच काही ठिकाणी बंडखोरीही झालेली पाहायला मिळत आहे. सध्या माहीम विधानसभा मतदारसंघावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबतं सुरु असून मनेसकडून अमित ठाकरे या मतदारसंघातून मैदानात आहेत. तसेच या ठिकाणीशिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत. सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीत सध्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. तसेच निवडणुकी संदर्भातील बातम्यांचा आढावा आणि राजकीय घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
Maharashtra Breaking News Today, 02 November 2024 | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस, बंडखोर काय करणार?
“हा अहवाल वाचत असताना graph reading मध्ये कदाचित आपली गल्लत झालेली दिसते. गुजरात प्रेमाच्या चष्म्यामुळे ही गल्लत झालेली असावी. आपण गुजरात प्रेमाचा चष्मा बाहेर काढून उघड्या डोळ्यांनी नीट बघितलं तर तुम्हाला तुमच्या सरकार काळात महाराष्ट्राची झालेली पीछेहाट स्पष्ट दिसेल. तरीही एक मित्र म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, २०१४-१५ नंतर महाराष्ट्राचा जीडीपीमधील वाटा मोठ्या प्रमाणात घसरलेला आहे. Relative per capita income चा ग्राफ बघितला तर त्यामध्ये देखील २०१४ नंतर महाराष्ट्राचा ग्राफ खालावला आहे तर गुजरातचा ग्राफ उंचावलेला स्पष्ट दिसतो. असो, देवेंद्र फडणवीस साहेबांची बाजू मांडण्यासाठी आपण पुढे आलात याचे आश्चर्य वाटले आणि आनंद देखील आहे”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
प्रिय, आशिष शेलार जी,
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 2, 2024
हा अहवाल वाचत असताना graph reading मध्ये कदाचित आपली गल्लत झालेली दिसते. गुजरात प्रेमाच्या चष्म्यामुळे ही गल्लत झालेली असावी. आपण गुजरात प्रेमाचा चष्मा बाहेर काढून उघड्या डोळ्यांनी नीट बघितलं तर तुम्हाला तुमच्या सरकार काळात महाराष्ट्राची झालेली पीछेहाट… https://t.co/i2AZshqbAX pic.twitter.com/UqXIv1H58S
“नवाब मलिक हे आधीपासून आमचे सहकारी राहिलेले आहेत. ते मंत्री देखील राहिलेले आहेत. तसेच त्यांच्यावरील कोणताही गुन्हा सिद्ध झालेलं नाही.तसेच या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेला नवाब मलिक यांना मदत करायची नसेल तर ती त्यांची इच्छा आहे. मात्र, यामुळे महायुतीमध्ये कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेणार आहोत”, असं राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
“अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर मला देखील पक्षांतर्गत अनेक गोष्टी बोलता येतील. पण मला असं वाटतं की दिवाळी आणि पाडवा आहे. त्यामुळे टिका-टिप्पणी करण्यापेक्षा दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या चांगल्या”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना इशारा दिला आहे.
मुंबईच्या गोरेगावमधील सिद्धार्थ नगर परिसरातील एका ३१ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
शिवसेनेच्या (शिंदे) मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शायना एन. सी यांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेचे (ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर आता अरविंद सावंत यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
विधानसभा निवडणुकीमुळे राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यासंदर्भात आज शरद पवार यांनीही भाष्य करत महायुतीवर टीका केली आहे. शरद पवार यांनी म्हटलं की, “राज्यात परिवर्तन आणण्याचा निर्धार आजच्या दिवशी करायचा आहे. आपल्याला महाराष्ट्र राज्य योग्य मार्गावर आणायचं आहे. विकास करणाऱ्यांना लोकांनी देखील सत्ता दिली पाहिजे. मग फक्त राजकारण केल्याने प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन करायचं आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
“लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकले नाही, पाहिजे म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले. २० नोव्हेंबरला मतदान आहे. २३ नोव्हेंबरला निकाल आहे. त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्ये येणार आहेत”, अशी महत्वाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
“विधानसभा निवडणुकीची सुरुवात झाली आहे. ही निवडणूक महत्त्वाची आहे. ओबीसीसाठी सुद्धा ही निवडणूक महत्त्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसींचं आरक्षण थांबवलं जाणार आहे. दुसऱ्या बाजूला एससीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. विधानसभेमध्ये आपले आमदार निवडून आले तर आरक्षणावरचा हा हल्ला थांबवता येईल”, असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी निवडणुकीचे अर्ज दाखल केलेले आहेत. मात्र, आता निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी ४ तारखेला शेवटचा दिवस बाकी आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार अर्ज मागे घेतात? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.