Manipur Assembly Election: बेरोजगारी, विकास आणि AFSPA च्या मुद्द्यांवरुन रंगणार प्रचार

२०१७ च्या निवडणुकीमध्ये केवळ २१ जागा मिळवून भाजपाला सत्तेत वाटा मिळाला होता. काँग्रेसकडे सध्या २८ जागा आहेत.

2022 Manipur Legislative Assembly election
दोन टप्प्यांमध्ये होणार मतदान

मणिपूरमधील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि सत्तारुढ भाजपाच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या पक्षांमध्ये काँटे की टक्कर होण्याची चिन्हं दिसत आहेत. उग्रवाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांबरोबर राज्यामधील या निवडणुकीमध्ये बेरोजगारी आणि विकासाचे मुद्देही चर्चेत असतील. भाजपा सध्या एनपीपी आणि एनपीएफसोबत युती करुन सत्तेत आहे. २०१७ च्या निवडणुकीमध्ये केवळ २१ जागा मिळवून भाजपाला सत्तेत वाटा मिळाला होता. काँग्रेसकडे सध्या २८ जागा आहेत.

कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच सशस्त्र दलाला देण्यात आलेले विशेष अधिकार अधिनियम (एएफएसपीए) रद्द करण्यासंदर्भातील चर्चा मागील बऱ्याच काळापासून सुरु आहे. राज्यावरील आर्थिक संकट, राज्यात उद्योगांना आर्षित करण्यात येणारं अपयश या गोष्टी दोन्ही बाजूंकडून चर्चेमधील आणि प्रचारातील महत्वाचे मुद्दे ठरतील. नॅशनल पिपल्स पार्टी म्हणजेच एनपीपीप आणि नागा पिपल्स फ्रंट म्हणजेच एनपीएफसारखे छोटे पक्ष आपआपले जाहीरनामे जारी करत स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार करतील.

भाजपाने या निवडणुकीमध्ये दोन तृतीयांश जागा जिंकण्यासाठी आम्ही लढणार असल्याचं म्हटलंय. राज्याच्या विधानसभेत ६० जागा आहेत. दोन टप्प्यांमध्ये २७ फेब्रुवारी आणि तीन मार्च रोजी मतदान होणार आहे. भाजपाचे मणिपूरमधील उपाध्यक्ष सी. चिदानंद यांनी, “६० पैकी ४० जागा जिंकण्याचा आमचा मानस आहे,” असं स्पष्ट केलंय. सध्या अनेक मुद्द्यांवर सत्तेत असणाऱ्या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळेच निवडणुकीनंतरच युती होईल अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

काँग्रेसचे मणिपूरमधील अनेक नेते मागील काही महिन्यांपासून पक्ष सोडून भाजपामध्ये सहभागी होत आहेत. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात मणिपूर काँग्रेसचे माजी अध्यक्ष गोविंददास कोंथोजम यांच्यासहीत पाच आमदार भाजपामध्ये गेले. मात्र मणिपूर प्रदेश काँग्रेसच कमिटीचे अध्यक्ष एन. लोकेन सिंह यांनी काँग्रेस चांगली कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केलाय. भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळ्यांच्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी भाजपा आणि सहकारी पक्षांवर निशाणा साधलाय. लोकांचं मतपरिवर्तन झालंय. बेरोजगारी दिवसोंदिवस वाढत आहे. गरिबांची परिस्थिती चिंताजनक आहे. भाजपा श्रीमंतांना बँका, विमानतळे, रेल्वे स्थानकं विकत आहे, अशी टीका सिंह यांनी केलीय.

मागील जनगणनेमध्ये मणिपूरची साक्षरता ही ८० टक्के होती. राष्ट्रीय टक्केवारीपेक्षा ही आकडेवारी फार अधिक आहे. २०२०-२१ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार १५-२४ वयोगटामधील बेरोजगारीचं प्रमाण हे ४४.४ टक्के इतकं आहे.

मराठीतील सर्व मणिपूर विधानसभा निवडणूक २०२२ ( Manipur-assembly-elections-2022 ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2022 manipur legislative assembly election bjp vs congress topics which will be used to attract voters scsg

Next Story
Manipur Election 2022 : मणिपूरमध्ये भाजपाकडून मिळू शकतो संगमा यांना झटका
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी