04 August 2020

News Flash

Maval सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

पुणे जिल्हय़ातील मावळ, चिंचवड, पिंपरी आणि रायगड जिल्हय़ातील कर्जत, पनवेल, उरण असे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झालेला मावळ लोकसभा मतदारसंघ मुंबईपर्यंत गेला आहे. शहरी-ग्रामीण असा मिश्र भाग तसेच भूमिपुत्र, शेतकरी, परप्रांतीय, आगरी, आदिवासी, नोकरदार असे संमिश्र चित्र मतदारसंघात आहे. पिंपरी-चिंचवडचे मोठे क्षेत्र यात समाविष्ट आहे. भाजप, शिवसेना, शेकाप आणि राष्ट्रवादी या पक्षांची वेगवेगळय़ा ठिकाणी प्रभाव क्षेत्रे आहेत. तुलनेने इतर पक्षांची ताकद मर्यादित दिसून येते. २००९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन बाबर हे राष्ट्रवादीचे आझम पानसरे यांचा पराभव करून निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने शेवटच्या क्षणी बाबरांना उमेदवारी नाकारून बारणे यांना संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या बाबरांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. तेव्हाचे राष्ट्रवादीशी संलग्न अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली. मात्र, शेकाप-मनसेच्या पाठिंब्यावर ते रिंगणात उतरले. राष्ट्रवादीने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. तिरंगी लढतीत बारणे यांनी जगताप व नार्वेकरांचा दारुण पराभव केला. नंतर, नार्वेकरांनी मतदारसंघाशी संबंध ठेवला नाही. तर, जगतापांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत ते चिंचवडमधून पुन्हा आमदार झाले. खासदार बारणे आणि आमदार जगताप यांच्यात सातत्याने खटके उडताना दिसतात. अजित पवार १९९१ पासून मावळ आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहेत. २००२ पासून १५ वर्षे पिंपरी पालिकेत त्यांचीच एकाधिकारशाही होती. त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या आमदारद्वयीने पिंपरी पालिका खेचून भाजपकडे आणली. पाच वर्षांपूर्वी अस्तित्वासाठी झगडणाऱ्या भाजपची ताकद सध्या वाढली आहे. तर, राष्ट्रवादी तुलनेने दुबळी झाली आहे. स्थानिक राजकारणाचा आढावा घेतल्यास, पक्षनिष्ठा नावाचा प्रकार अभावानेच दिसतो. व्यक्तिपूजा हेच येथील राजकारणाचे मुख्य सूत्र आहे. त्यामुळे या पट्टय़ातील प्रभावशाली नेत्यांनी अनेकदा पक्ष बदललेले आहेत. सध्या सत्ता असलेल्या भाजपमध्ये मोठी गर्दी झाली असून त्यात पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीतून आलेल्यांचा भरणा जास्त आहे. आमदार जगताप, लांडगे यांच्यासह एकमेकांच्या विरोधात लोकसभा लढलेले गजानन बाबर आणि आझम पानसरेदेखील भाजपमध्ये आले आहेत. ज्यांचे मूळ राष्ट्रवादीत आहे, त्यांच्यावर पवारांची भिस्त आहे. त्यामुळे त्यांना गोंजारण्याचे काम सध्या सुरू आहे.

maval Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Shrirang Appa Chandu Barne
SS
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Maval 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Ajay Hanumant Londhe
IND
1
12th Pass
34
79.34 Thousand / 3.9 Lac
Amruta Abhijit Apte
IND
0
12th Pass
33
2.17 Lac / 0
Balkrushna Dhanaji Gharat
IND
0
5th Pass
54
23.88 Lac / 2 Lac
Dr. Somnath Arjun Pol
IND
3
Graduate Professional
47
2.04 Lac / 2.83 Lac
Jagdish Shamrao Sonawane
Kranti Kari Jai Hind Sena
1
Graduate
63
4.01 Cr / 0
Jaya Sanjay Patil
APoI
1
Others
32
32.25 Thousand / 0
Madan Shivaji Patil
Bharatiya Praja Surajya Paksha
0
10th Pass
57
13.05 Lac / 0
Navnath Vishwanath Dudhal
IND
0
Post Graduate
57
1.39 Cr / 18 Lac
Pandharinath Namdeo Patil
BMUP
0
10th Pass
47
2.45 Cr / 0
Parth Ajit Pawar
NCP
0
Graduate
29
20.12 Cr / 9.36 Cr
Prakash Bhivaji Mahadik
bns
0
8th Pass
70
75 Thousand / 0
Prashant Ganpat Deshmukh
IND
0
Graduate
34
3.51 Lac / 0
Rajaram Narayan Patil
Vanchit Bahujan Aaghadi
0
Others
47
65.26 Lac / 5.35 Lac
Rajendra Maruti Kate
IND
0
12th Pass
50
64.35 Lac / 0
Rakesh Prabhakar Chavan
IND
0
8th Pass
45
2.19 Cr / 6 Lac
Sanjay Kisan Kanade
BSP
0
Graduate Professional
49
1.42 Cr / 20.61 Lac
Shrirang Chandu Barne
SHS
3
8th Pass
55
1.02 Ar / 4.17 Lac
Sunil Baban Gaikwad
Bahujan Republican Socialist Party
1
10th Pass
49
39.49 Lac / 10.8 Lac
Suraj Ashokrao Khandare
IND
0
Post Graduate
28
5.85 Lac / 5.42 Lac
Suresh Shripati Taur
IND
0
12th Pass
49
99.5 Lac / 6 Lac
Vijay Hanumant Randil
IND
0
12th Pass
36
18.44 Lac / 1 Lac

Maval सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
2009
Babar Gajanan Dharmshi
SHS
50.84%
2014
Appa Alias Shrirang Chandu Barne
SHS
43.62%
2019
Shrirang Appa Chandu Barne
SHS
52.65%

Maval मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
PANVELPrashant Ramsheth ThakurBJP
KARJATSureshbhau Narayan LadNCP
URANManohar Gajanan BhoirSHS
MAVALBhegade Sanjay (bala) VishwanathBJP
CHINCHWADJagtap Laxman PandurangBJP
PIMPRIAdv. Chabukswar Gautam SukhdeoSHS

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X