04 August 2020

News Flash

Mumbai North East सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

१९८०च्या दशकात तत्कालीन जनता पार्टीचे सुब्रमण्यम स्वामी यांचा अपवाद वगळता गेल्या ४० वर्षांत प्रत्येक लोकसभा निवडणुकीत बदल घडविण्याची ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची पंरपरा आहे. कधी काँग्रेस, कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी अशा सगळ्याच पक्षाच्या गळ्यात विजयश्रीची माळ घालणाऱ्या या मतदारसंघात लागोपाठ दुसऱ्यांना लोकप्रतिनिधी निवडून येत नाही. आता पुन्हा एकदा भाजपचे खासदार किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील यांच्यात सरळ लढत होण्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये युती झाली असली तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र अजूनही मनोमीलन झालेले दिसत नाही. आपल्या श्रद्धास्थळावर अर्थात थेट मातोश्रीवरच भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या सोमय्यांना धडा शिकविण्यासाठी गेली पाच वर्षे जंग जंग पछाडणाऱ्या शिवसैनिकांना आता त्याच सोमय्यांचा झेंडा हाती कसा घ्यायचा, असा प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत शिवसैनिकांचे पाठबळ आणि उमेदवारी मिळविण्याची सोमय्यांसाठी तर गेली पाच वर्षे विस्कटलेली पक्ष कार्यकर्त्यांची घडी नीट बसवत विरोधकांसमोर आव्हान उभे करण्याची पहिली लढाई आव्हानात्मक असेल. मुंबईत राष्ट्रवादीच्या वाटय़ाला येणारा एकमेव लोकसभा मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई. मागील म्हणजेच सन २०१४च्या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत भाजपचे किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार संजय पाटील यांचा तब्बल तीन लाखांच्या मताधिक्याने पराभव केला होता. त्या वेळी आपच्या तिकिटावर प्रथमच आपले राजकीय भाग्य आजमावणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकरांची उमेदवारी सोमय्यांच्या पथ्यावर पडली होती. संमिश्र वस्तीचा मतदारसंघ संमिश्र वस्तीच्या मतदारसंघात मुलुंड पूर्व, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर पश्चिम या भागात मराठी वस्ती अधिक असून, मुलुंड पश्चिम आणि घाटकोपर पूर्व या भागात गुजराती मतदारांचा बोलबाला आहे. मानखुर्द, गोवंडी या भागात मुस्लिमांचा वरचष्मा असून या मतदारसंघात दलित, उत्तर भारतीयांचाही टक्का निर्णायक आहे. या सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ शिवसेना-भाजपच्या ताब्यात आहेत. युती झाली असली तरी सोमय्यांच्या प्रचारासाठी शिवसैनिक मनापासून तयार दिसत नाहीत. त्यामुळेच युतीची घोषणा झाल्यांतरही सोमय्यांच्या उमेदवारीस शिवसैनिकांकडून उघड विरोध होत आहे. मात्र राजकारणात कोणी कुणाचा कायमचा वैरी नसतो. युती झाली असून शिवसैनिकांचाही आपल्याला पाठिंबा आहे. गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलताना आपण कधीही पक्षीय राजकारण केले नसून शिवसेना-भाजप कार्यकर्ते आणि या भागातील मतदार आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचा दावा करीत सोमय्या यांनी प्रचाराही सुरुवात केली आहे. सोमय्यांबद्दल शिवसेनेत असलेल्या नाराजीचा फायदा उठविण्यासाठी राष्ट्रवादीचे संजय पाटील यांनीही आघाडीचा उमेदवार म्हणून गाठीभेटी आणि बैठकांचा धडाका लावला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीसह काँग्रेस, समाजवादी, मनसे अशा सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोट बांधून आणि सोमय्यांबद्दल भाजप-शिवसेनेत असलेल्या अंतर्गत नाराजांना आपलेसे करून ही लढाई जिंकण्याची तयारी पाटील यांनी सुरू केली असली तरी राष्ट्रवादीतील गटबाजी आणि निस्तेज काँग्रेस ही पाटील यांच्यासाठी डोकेदुखी आहे. सोमय्या यांना अडचणीत आणण्यासाठी मराठी विरुद्ध गुजरात असा रंग दिला जाण्याची शक्यता आहे. २००९ मध्ये पाटील यांनी सोमय्या यांचा पराभव केला होता. समाजवादी पक्षाने आपली भूमिका अजून स्पष्ट न केल्याने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही या मतदारसंघात उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केल्याने पाटील यांच्यासाठी लढाई सोपी राहणार नाही. मध्यंतरी मनसेला येथून उमेदवारी देण्याची चाचपणीही राष्ट्रवादीने सुरू केली होती. मात्र शिशिर शिंदे हे या भागातील मनसेचे एकमेव नेते शिवसेनेत गेल्याने आता याही पक्षाची मजल झेंडे आणि फलकांपर्यंत राहिल्याचे बोलले जात आहे.

mumbai north east Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Manoj Kishorbhai Kotak
BJP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Mumbai North East 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Aiyyar Ganesh
Bahujan Maha Party
0
Graduate Professional
54
4.14 Cr / 26.5 Lac
Anil Hebbar Koni
IND
1
Graduate Professional
54
3.97 Cr / 40.6 Lac
Baban Sopan Thoke
IND
0
Graduate
25
1.1 Thousand / 0
Bhaskar Mohan Goud
IND
1
Graduate
36
21.99 Lac / 80 Lac
Dandge Sukhadev Chandu
APoI
0
Literate
63
20 Thousand / 0
Dayanand Jagnnath Sohani
IND
2
12th Pass
45
64.88 Lac / 0
Deepak Digambar Shinde
IND
0
Post Graduate
42
42.99 Lac / 37 Lac
Jatin Rangrao Harne
IND
1
12th Pass
44
2.03 Thousand / 0
Jayashri Minesh Shah
Bhartiya Manavadhikaar Federal Party
0
12th Pass
49
1.73 Cr / 7 Lac
Jitendra Kumar Nanku Pal
IND
0
12th Pass
47
65 Thousand / 39.4 Thousand
Manoj Kishorbhai Kotak
BJP
2
10th Pass
46
5.47 Cr / 20.48 Lac
Niharika Prakashchandra Khondalay
Vanchit Bahujan Aaghadi
0
Graduate
50
29.27 Lac / 32.49 Thousand
Nilesh Ramchandra Kudtarkar
IND
0
10th Pass
27
90 Thousand / 0
Nutan Singh
Aapki Apni Party (Peoples)
0
Graduate
34
1.99 Lac / 68.26 Thousand
Patil Sanjay Dina
NCP
1
Graduate
50
2.61 Cr / 0
Pravin Chandrakant Kedare
IND
1
12th Pass
48
10.09 Lac / 0
Rakesh Sambhaji Raul
IND
0
Graduate Professional
45
2.86 Thousand / 0
Sanjay Chandrabahadur Singh
BSP
1
Graduate
46
77 Lac / 28.62 Lac
Shahajirao Dhondiba Thorat
IND
1
10th Pass
55
7.51 Lac / 2.5 Lac
Shahenaz Begam Mo.Siraj Khan
RUC
0
Illiterate
43
3.22 Lac / 96.84 Thousand
Shahin Parveen Shakil Ahamad Khan
IND
0
Graduate
44
4.62 Lac / 0
Shrikant Suburao Shinde
BMUP
0
Post Graduate
34
12.15 Lac / 0
Sneha Ravindra Kurhade
IND
0
8th Pass
50
42.2 Lac / 28.8 Lac
Sushma Motilal Maurya
Jan Adhikar Party
0
10th Pass
38
43.98 Lac / 14.05 Lac
Vijay Janardan Shiktode
Bahujan Republican Socialist Party
0
Post Graduate
55
87.88 Lac / 0
Vinod Narayan Chaugule
ssrd
0
12th Pass
41
1.13 Cr / 85.02 Lac

Mumbai North East सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Kirit Somaiya
BJP
43.08%
2004
Kamat Gurudas
INC
53.3%
2009
Sanjay Dina Patil
NCP
31.97%
2014
Kirit Somaiya
BJP
60.95%
2019
Manoj Kotak
BJP
56.61%

Mumbai North East मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
MULUNDSardar Tara SinghBJP
VIKHROLISunil Rajaram RautSHS
BHANDUP WESTAshok PatilSHS
GHATKOPAR WESTRam KadamBJP
GHATKOPAR EASTMehta Prakash ManchhubhaiBJP
MANKHURD SHIVAJI NAGARAbu Asim AzmiSP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X