10 August 2020

News Flash

Mumbai North सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

भाजपने दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल, अशी ओळख असलेल्या ‘उत्तर मुंबई मतदारसंघा’चा प्रश्न ‘लोकसभा निवडणुकी’च्या परीक्षेत आजच्या घडीला सर्वच विरोधी पक्षांनी ‘ऑप्शन’ला टाकला आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्यात लढण्यास काँग्रेसमध्ये कोणीच इच्छुक नाही. परिणामी हा मतदारसंघ समाजवादी पार्टी किंवा वंचित बहुजन आघाडीच्या गळ्यात मारण्याचाही प्रयत्न झाला. पण कुणालाच उत्तर मुंबईच्या कठीण परीक्षेला सामोरे जायचे नाही. निवडणुकीच्या आधीच विरोधकांनी एक प्रकारे भाजपला हा मतदारसंघ दानच केल्यासारखे चित्र आहे. उत्तर मुंबई हा मतदारसंघ पूर्वी वसई, पालघपर्यंत पसरलेला होता. पुनर्रचनेनंतर तो मालाड ते बोरिवली असा झाला. ज्येष्ठ संसदपटू आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. भाजपचा हा पारंपरिक बालेकिल्ला असलेला मतदारसंघ २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेसने भाजपकडून खेचून घेतला होता. योगायोग म्हणजे दोन्ही वेळेस दोन ‘राजाबाबू’ याला कारणीभूत ठरले. त्यातले एक पडद्यावरचे राजाबाबू म्हणजेच अभिनेते गोविंदा, तर दुसरे राज ठाकरे. गोविंदा यांची खासदार म्हणून कारकीर्द अत्यंत वादग्रस्त राहिल्याने दुसऱ्या खेपेला त्यांच्या नावावर फुली मारण्यात आली. परंतु तोपर्यंत मनसेचा उदय झाला होता आणि हीच बाब काँग्रेसच्या पथ्यावर पडली. चित्रपट अभिनेता गोविंदा यांनी राम नाईक यांचा आधी पराभव केला, नंतर २००९ मध्ये मनसेने केलेल्या मतविभाजनाचा काँग्रेसचे संजय निरुपम यांना फायदा झाला होता. २०१४ मध्ये गोपाळ शेट्टी राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले होते. भाजपची ताकद, शेट्टी यांचा करिष्मा यामुळे विरोधकांना या मतदारसंघात अजिबात आशादायी चित्र दिसत नाही. यातूनच माजी खासदार संजय निरुपम यांनी शेजारच्या उत्तर पश्चिम मतदारसंघाचा आधार घेतला. काँग्रेसचा कोणीही बडा नेता येथून लढण्यास इच्छुक नाही. या निवडणुकीत कुणी ‘राजाबाबू’ काँग्रेसच्या मदतीला आला तरच या ठिकाणी चमत्कार शक्य आहे. अन्यथा इथून जो उभा राहील त्याचा कपाळमोक्ष ठरलेला. भाजपला हे सातत्याने साध्य होते ते इथल्या गुजराती-मारवाडी मतदारांमुळे. हा भाजपचा पारंपरिक व निष्ठावंत मतदार. निश्चलनीकरण, जीएसटीमुळे कंबरडे मोडायची वेळ आली तरी हा व्यापारी वर्ग ‘आपडो मोदीं’च्या पाठीशी उभे राहणार आहे. उरलेले उत्तर भारतीय भाजप, काँग्रेसमध्ये विभागलेले. मराठी मतेही शिवसेनेकडे तर काही प्रमाणात मनसेत विभागलेली. पण या विभागणीचा फायदा भाजपला कायम होतो. २०१४ची निवडणूक मनसेने लढवलीच नव्हती. आताही मनसे लढण्यास इच्छुक नाही. या निवडणुकीत मनसे असो किंवा नसो भाजपला काहीच फरक पडणार नाही. दहिसर चेकनाक्यापासून म्हणजे मुंबईच्या हद्दीपासून हा मतदारसंघ सुरू होतो. पुढे मालाड पूर्व आणि गोरेगावच्या क्रीडा संकुलापर्यंत या मतदारसंघाची हद्द आहे. मध्यम व उच्चवर्गीय वस्ती मोठय़ा प्रमाणावर असलेल्या या मतदारसंघात सध्याच्या घडीला साधारणपणे १७ लाख मतदार आहेत. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतरही मालाड, कांदिवली, बोरिवली परिसरातील गुजराती-मारवाडी आणि उत्तर भारतीयांनी भाजपला भरभरून मतदान केल्याने या परिसरात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. तत्पूर्वी २०१४ मध्ये विधानसभेत स्वबळावर निवडणुका लढवूनही इथल्या सहापैकी चार विधानसभेच्या जागा भाजपने खिशात टाकल्या होत्या. तर प्रत्येकी एक शिवसेना, काँग्रेसच्या वाटय़ाला आली होती. आता तर युती असल्याने आणि या परिसरात भाजप-सेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये तशी फारशी भांडणे नसल्याने दगाबाजी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजपचा भर आपली एकगठ्ठा मते जपण्यावर असेल. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपासून राजकारणात सक्रिय असलेले गोपाळ शेट्टी – महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकदाही पराभव न पाहिलेला असा हा उमेदवार इथला खऱ्या अर्थाने ‘चौकीदार’. कारण, बोरिवली, कांदिवलीत रस्त्यांना जोडणाऱ्या अनेक चौकांचे सुशोभीकरण शेट्टी यांच्या खासदार निधीतून पार पडले आहे. या भागातील खुली मैदाने जपण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यामुळे ती मैदाने पालिकेच्या ताब्यात देण्यावरून उद्भवलेल्या वादाचेही ते धनी ठरले आहेत. चौक, मैदाने याबरोबरच शौचालये, जिमखाने, जॉगिंग ट्रॅक याकरिता शेट्टी यांनी आपल्या खासदार निधीचा मोठा वाटा खर्च केला आहे. लोकसभेतील १०० टक्के उपस्थिती आणि सभागृहात सक्रिय या बाबीही त्यांच्यासाठी जमेच्या आहेत. उत्तर मुंबईतून कुणीही निवडून येवो उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नात त्याला लक्ष घालावेच लागते. त्यात शेट्टीही मागे नाहीत. तरीही विविध वादांमध्ये ते अडकले आहेत. कधी ख्रिश्चनांना ‘अंग्रेज’ संबोधले म्हणून तर कधी इथल्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पात हस्तक्षेप केल्याने तर कधी तलाव बुजवून उद्यान बांधल्याचा ठपका आल्याने शेट्टी वादात सापडले. त्यांच्या बेधडक भाषणांच्या ‘क्लिप’ अधूनमधून व्हायरल होत असतात. पण संपर्काचे जाळे, कार्यकर्त्यांची फौज, नियोजन यांच्या जोरावर भाजपच्या या पारंपरिक गडाचे ‘गडकरी’ म्हणून शेट्टी यांनी आपली भूमिका बकुबाने निभावली आहे. काँग्रेसमध्ये प्रवीण छेडा, उपेंद्र जोशी, भूषण पाटील यांची नावे चर्चेत आहेत. शेट्टी यांच्या विरोधात ख्रिश्चन समाजात प्रचंड नाराजी आहे. तसेच मराठी मतदारही त्यांच्यावर नाराज आहेत. याचा फटका शेट्टी यांना बसेल, असे काँग्रेसचे गणित आहे.

mumbai north Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Gopal Shetty
BJP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Mumbai North 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Akhtar Shaikh
IND
0
10th Pass
63
60.53 Lac / 3.4 Lac
Amol Ashokrao Jadhav
IND
2
Graduate
30
1.87 Lac / 4 Lac
Andrew John Fernandes
Hum Bhartiya Party
0
Post Graduate
58
1.45 Cr / 0
Ankushrao Shivajirao Patil
Rashtriya Maratha Party
0
Graduate
51
36.85 Lac / 1.75 Lac
Bhagvatidan Karnidan Gadhavi
IND
1
Graduate
74
1.38 Cr / 0
Chhannu Sahadewrao Sontakkey
Bharat Prabhat Party
0
Graduate
57
43.22 Lac / 18.13 Lac
Dr. Raies Khan
IND
0
Graduate Professional
46
2.66 Cr / 0
Fateh Mohammad Mansoori Shaikh
Bhartiya Lokmat Rashtrwadi Party
2
5th Pass
64
2.56 Cr / 0
Gopal Chinnaya Shetty
BJP
9
5th Pass
65
15.75 Cr / 2.11 Cr
Manojkumar Jayprakash Singh
BSP
0
12th Pass
36
2.17 Cr / 2.07 Cr
Milind Shankar Repe
IND
0
Others
57
2.09 Cr / 71.7 Lac
Mohammad Azad Ansari
IND
0
8th Pass
47
17.5 Lac / 24.2 Lac
Pawan Kumar Pandey
Sarvodaya Bharat Party
1
Doctorate
44
5.55 Cr / 11.96 Lac
Ranjit Bajrangi Tiwari
NAP
0
5th Pass
43
11.72 Lac / 0
Samaysingh Anand Chanda Liya
BMUP
0
5th Pass
52
10.85 Lac / 70 Thousand
Sunil Uttamrao Thorat
Vanchit Bahujan Aaghadi
0
Graduate
48
8.9 Lac / 60 Thousand
Urmila Shrikant Matondkar
INC
0
12th Pass
48
68.91 Cr / 18.94 Lac
Vilas Hiwale
Marxist Leninist Party of India (Red Flag)
0
Literate
44
2.01 Lac / 1 Lac

Mumbai North सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Ram Naik
BJP
56.39%
2004
Govinda
INC
50.01%
2009
Sanjay Brijkishorlal Nirupam
INC
37.25%
2014
Gopal Chinayya Shetty
BJP
70.15%
2019
Gopal Shetty
BJP
71.4%

Mumbai North मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
BORIVALIVinod TawdeBJP
DAHISARChaudhary Manisha AshokBJP
MAGATHANEPrakash SurveSHS
KANDIVALI EASTAtul BhatkhalkarBJP
CHARKOPYogesh SagarBJP
MALAD WESTAslam ShaikhINC

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X