04 August 2020

News Flash

Mumbai North West सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

१९९९ पासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या उत्तर-पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघाने गेल्या वेळी शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांच्या बाजूने कौल दिला होता. मोदी यांची लाट आता बऱ्यापैकी ओसरली असली तरी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून वाद सुरू झाले आहेत. संजय निरुपम यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. बंगले, उच्चभ्रू वस्ती, म्हाडा वसाहती, कोळीवाडे, झोपडपट्टी अशा संमिश्र लोकवस्तीच्या या मतदारसंघात साडे सहा लाख मराठी मतदार आहेत. त्याखालोखाल उत्तर भारतीय (तीन लाख ६५ हजार) आणि मुस्लीम (तीन लाख ४५ हजार) यांचे प्राबल्य आहे. गुजराती आणि मारवाडी समाजाचे तब्बल दोन लाख मतदार आहेत. दरवेळी ४५ ते ५० टक्के मतदान होते. हे प्रमाण लक्षात घेतले तर ही काटय़ाची टक्कर असते. परंतु गेल्या कीर्तिकर यांचा विजय खूपच सोपा झाला होता. भाजप कार्यकर्त्यांनीही मनापासून सेना उमेदवाराचा प्रचार केला होता. आता त्याची पुनरावृत्ती होईल, याची खात्री नाही. गेल्या पाच वर्षांत सेना-भाजप यांच्यातील कलहामुळे उभय कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. कीर्तिकर यांचा प्रचार भाजप कार्यकर्ते त्याच जोमाने करतील, याची शक्यता नाही. कीर्तिकर मात्र त्याबाबत निश्चिंत आहेत. भाजप कार्यकर्ते आपल्या संपर्कात असून काँग्रेसचा कोणीही उमेदवार असला तरी विजय आपलाच आहे, असे ते सांगतात. २००९ मध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले व माजी केंद्रीय राज्यमंत्री गुरुदास कामत यांच्या अकाली निधनाने काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी याही इच्छुक असल्या तरी निरुपम यांच्या उमेदवारीची धास्ती सेनेला निश्चितच आहे. या मतदारसंघाशी दांडगा संपर्क असल्यामुळे युतीची मते खेचता येतील, असा निरुपम यांचा दावा आहे. गेल्यावेळी मनसेनेही ६६ हजार मते मिळविली होती. प्रामुख्याने अंधेरी पश्चिम व पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचा पारंपरिक मतदार मोठय़ा प्रमाणात आहे, त्याचा कलही या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव, दिंडोशी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून त्यापैकी भाजप व शिवसेनेच्या ताब्यात प्रत्येक तीन आमदार आहेत. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला. याआधी वांद्रे, अंधेरी, सांताक्रूझ असा वायव्य मुंबई मतदारसंघ होता. आता या मतदारसंघाचे उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य असे दोन मतदारसंघ झाले. जोगेश्वरी, गोरेगाव, दिंडोशी हे पूर्वी उत्तर मुंबईत असलेले विधानसभा मतदारसंघ आता या मतदारसंघाला जोडले गेले आहेत. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ नेहमीच शिवसेनेच्या वाटय़ाला आला आहे. मोदी लाटेत गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढताना वर्सोवा व अंधेरी पश्चिम हे काँग्रेसकडे असलेले तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला गोरेगाव मतदारसंघात भाजपने विजय मिळविला होता. महानगरपालिका निवडणुकीतही या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नगरसेवकांची संख्या तीनवरून २१ पर्यंत गेली होती. परंतु आता ओसरलेल्या मोदी लाटेच्या पाश्र्वभूमीवरही काँग्रेस कोणता उमेदवार देते यावर शिवसेनेला विजयाची गणिते मांडता येणार आहेत. हुकमी मतदारांवरच लक्ष्य १९८४, १९८९ आणि १९९१, १९९९, २००४ मध्ये सुनील दत्त आणि त्यांच्या निधनानंतर प्रिया दत्त खासदार म्हणून निवडून आल्या. २००४ मध्ये त्यावेळी युतीत असलेल्या संजय निरुपम यांनी सुनील दत्त यांना फेस आणला होता. नेहमी मोठय़ा फरकाने निवडून येणाऱ्या दत्त यांना फक्त ४७ हजार मताधिक्य मिळाले होते. आता तेच निरुपम काँग्रेसमध्ये आहेत. या मतदारसंघात झोपडीवासीयांच्या मतावरच काँग्रेसचा कायम डोळा राहिला आहे. या मतदारसंघात मध्यमवर्गीय मराठी मतदार मोठय़ा संख्येने असून त्यामुळेच सेनेला हा मतदारसंघ आपला वाटतो. गेल्या निवडणुकीत म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी तातडीने धोरण आणले जाईल, असे दिलेले आश्वासन पाळले गेले नाही. धोरण विलंबाने जाहीर झाल्यामुळे हा मराठी मतदार तसा नाराज आहे. सीआरझेडमुळेही या परिसरातील अनेक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडला होता. सीआरझेडचे धोरण जाहीर झाल्याने त्याचा फायदा कीर्तिकरांना घेता येईल. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाची जंत्रीत कीर्तिकरांनी सादर केली आहे. त्यामध्ये पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाडीसाठी सहावी लाईन या महत्त्वाच्या कामाचा समावेश आहे. याशिवाय वेसावे समुद्रातील गाळ काढण्यासाठी निधी, देशभरातील स्मार्ट रेल्वे स्थानकांमध्ये अंधेरी-गोरेगावचा समावेश, रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या सोडविल्याचाही ते दावा करतात. परंतु या परिसरातील वाहतूक कोंडीबाबत ते फारसे काही करू शकलेले नाहीत, याबाबत मतदार नाराज आहेत. काँग्रेसकडून मात्र कीर्तिकर निवडणुकीनंतर फिरकलेच नाहीत, असा केलेला आरोप कीर्तिकरांनी फेटाळून लावला आहे.

mumbai north west Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Gajanan Kirtikar
SS
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Mumbai North West 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Abusalim Arunhuq Shank
RUC
0
10th Pass
48
2.65 Lac / 0
Aftab Mashwood Khan
IND
0
8th Pass
43
80.63 Lac / 0
Ajay Dubey
Jan Adhikar Party
0
Post Graduate
29
5.76 Lac / 70 Thousand
Arora Surinder Mohan
Bharat Jan Aadhar Party
0
Graduate
64
33.67 Cr / 2.13 Lac
Chandrashekhar Sharma
Bhartiya Manavadhikaar Federal Party
1
Others
42
94.03 Lac / 0
Chhaya Sunil Tiwari
Janata Congress
0
8th Pass
41
91.06 Lac / 28.83 Lac
Dharmendra Shriram Pal
Rashtravadi Kranti Dal
0
10th Pass
42
4.85 Lac / 0
Gajanan Chandrakant Kirtikar
SHS
0
Graduate
75
10.54 Cr / 40.32 Lac
Harishankar Yadav
Aapki Apni Party (Peoples)
0
10th Pass
48
12 Thousand / 5.46 Lac
Madan Banwarilal Agrawal
IND
0
Graduate
55
6.18 Cr / 3.2 Cr
Mitesh Varshney
IND
1
Post Graduate
27
1.86 Lac / 0
Prabhakar Tarapado Sadhu
IND
0
8th Pass
47
52 Thousand / 0
Sanjay Nirupam
INC
11
Graduate
54
12.21 Cr / 84 Lac
Sanjay Vishwanath Sakpal
IND
0
Graduate
48
70 Thousand / 0
Shakuntala Kushalkar
PRCP
0
Illiterate
47
1.01 Cr / 45 Lac
Shashikant Kundlik Kadam
IND
1
Graduate Professional
46
1.9 Cr / 3 Lac
Sonkamble Gajanan Tukaram
IND
0
Graduate
33
1.42 Lac / 0
Subhash Passi
SP
1
12th Pass
57
64.2 Cr / 8.05 Cr
Suresh Sundar Shetty
Vanchit Bahujan Aaghadi
0
8th Pass
46
9.55 Cr / 43.42 Lac
Vijay Marothi Koyale
Rashtriya Maratha Party
0
8th Pass
49
65.25 Lac / 5 Lac
Vijendra Kumar Rai
IND
1
Post Graduate
37
2.65 Cr / 1.75 Cr

Mumbai North West सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Sunil Dutt
INC
52.35%
2004
Sunil Dutt
INC
51.59%
2009
Ad.kamat Gurudas Vasant
INC
35.91%
2014
Gajanan Chandrakant Kirtikar
SHS
51.91%
2019
Gajanan Kirtikar
SHS
60.55%

Mumbai North West मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
JOGESHWARI EASTRavindra Dattaram WaikarSHS
DINDOSHISunil PrabhuSHS
GOREGAONVidya ThakurBJP
VERSOVADr. Bharati Hemant LavekarBJP
ANDHERI WESTAmeet Bhaskar SatamBJP
ANDHERI EASTRamesh LatkeSHS

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X