04 August 2020

News Flash

Mumbai South Central सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसचे बालेकिल्लेही भुईसपाट झाले. यात दक्षिण -मध्य मुंबई या पारंपरिक मतदारसंघाचा समावेश होता. पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदीलाटही पूर्णपणे ओसरली आहे. आता पुन्हा २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा जंगी सामना सुरू झाला आहे. दोन-तीन निवडणुकांचा अपवाद वगळला तर, दक्षिण-मध्या मुंबई हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड राहिला आहे. त्याचे मुख्य कारण या मतदारसंघाची आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक रचना. जवळपास ६० ते ७० टक्के झोपडपट्टय़ांनी, मध्यमवर्गीय आणि कामगार वसाहतींनी व्यापलेला हा मतदारसंघ आहे. काही तुरळक उच्चभ्रू वस्ती आहे. या समीकरणानेच हा मतदारसंघ काँग्रेसच्या बाजूने राहिला. गेल्या वेळी शिवसेनेने बाजी मारली असली तरी यंदा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत. विद्यमान खासदार राहुल शेवाळे हेच पुन्हा शिवसेनेचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. भाजपबरोबर युती झाल्यामुळे शिवसेनेला त्याचा फायदा होईल. २००४ व २००९ असे दोन वेळा विजयश्री खेचून लोकसभेत पोहचलेले एकनाथ गायकवाड यांनी पुन्हा शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराशी दोन हात करण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु त्यांची अधिकृत उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व राज्यसभेचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनीही या मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शेवाळे यांच्या विरोधात तरुण चेहरा म्हणून गायकवाड यांची कन्या आमदार वर्षां गायकवाड यांच्याही नावाची पक्षात चर्चा आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेही या मतदारसंघातून भाजप-शिवसेनेच्या पाठिंब्याने निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसबरोबर युती करून १९९८ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते या मतदारसंघातून विजयी झाले होते. आठवले यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्यास शिवसेनेची तयारी नाही. त्यामुळे आठवले यांच्यासाठी दुसऱ्या मतदारसंघाचा पर्याय दिला जाईल, असे सांगितले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसे सूचित केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार काँग्रेसची डोकेदुखी वाढविणार आहे. काँग्रेसाठी जमेची बाजू म्हणजे शिवसेना व भाजप यांच्यातील संघर्ष. निवडणुकीच्या तोंडावर युती झाली असली, तरी एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी दोन्ही पक्षांनी सोडली नाही. शिवसेना नेते सत्तेत राहून भाजपवर हल्ले करीत राहिले. निवडणुकीत युती झाली म्हणून त्यांचे खरोखर मनोमीलन होईल का, त्यावर शिवसेनेची लढत अवलंबून आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार शेवाळे यांचा दावा आहे की, या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत मोठी विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे मतदार आपल्याच बाजूने कौल देतील, असा त्यांना विश्वास वाटतो. तर त्यांचे प्रतिस्पर्धी एकनाथ गायकवाड, यांच्या मते केवळ मोदी लाटेवर निवडून आलेले शेवाळे, पाच वर्षांत मतदारसंघात फारसे कुणाला भेटले नाहीत, वा दिसलेही नाही, त्यामुळे विकासकामांचा त्यांचा दावा खोटा आहे. दोन्ही बाजूंकडून असे दावे-प्रतिदावे होणारच. मात्र २०१४ चे वातावरण सध्या नाही, हेही तितकेच खरे आहे. राहुल गांधी यांची मुंबई झालेली सभा आणि झोपडपट्टीवासीयांना व चाळीतील रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे देण्याच्या घोषणेमुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. मोठय़ा प्रमाणावर झोपडपट्टय़ा असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो, असे मानले जाते. दुसरी बाजू अशी आहे की, लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा व महापालिका निवडणुकीतही या मतदारसंघात युतीचे वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे तीन व भाजपचा एक असे चार आमदार आहेत. तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत. महापालिका निवडणुकीत युतीचेच नगरसेवक जास्त निवडून आले आहेत. त्यामुळे मोदी लाट ओसरली असली तरी, काँग्रेससाठी आव्हानात्मक परिस्थिती सध्या तरी कायम आहे.

mumbai south central Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Rahul Ramesh Shewale
SS
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Mumbai South Central 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Adv. Mahendra Tulshiram Bhingardive
Anti Corruption Dynamic Party
0
Graduate Professional
42
1.25 Cr / 8.5 Lac
Ahmed Shakil Sagir Ahmed Shaikh
BSP
1
5th Pass
41
36.47 Lac / 0
Anita Kiran Patole
IND
0
8th Pass
39
3 Lac / 0
Baddy Hemantkumar Reddy
BMUP
0
Graduate
50
1.22 Cr / 85.2 Thousand
Balasaheb Jagannath Sable
Bhartiya Manavadhikaar Federal Party
0
10th Pass
48
6.06 Lac / 80 Thousand
Dalvi Raju Sahebrao
IND
0
Graduate
48
2.23 Lac / 51.49 Thousand
Deepak Bhagoji Kamble
APoI
0
10th Pass
67
3.92 Lac / 0
Eknath Mahadev Gaikwad
INC
0
10th Pass
79
21.9 Cr / 2.56 Cr
Godfrey Washington Noble
Desiya Makkal Sakthi Katchi
2
Graduate Professional
48
26.76 Cr / 18 Lac
Mohammad Hayat Mohammad Husain Shaikh
PECP
0
5th Pass
54
10.43 Lac / 3.5 Lac
Rahul Ramesh Shewale
SHS
0
Others
47
1.89 Cr / 77.79 Lac
Sanjay Sushil Bhosale
Vanchit Bahujan Aaghadi
3
Graduate Professional
51
1.25 Ar / 23.77 Cr
Santosh Shrivastav
IND
0
10th Pass
37
2.07 Lac / 0
Sheetal Bharat Sasane
IND
0
8th Pass
34
5.02 Lac / 0
Vikas Maruti Rokade
IND
0
5th Pass
53
11 Thousand / 0
Yoganand Nadar
Aapki Apni Party (Peoples)
0
Graduate
34
5.29 Lac / 1.8 Lac
Yogesh Vitthal More
Bahujan Republican Socialist Party
0
Graduate Professional
38
1.06 Cr / 1.57 Lac

Mumbai South Central सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Mohan Vishnu Rawale
SHS
47.97%
2004
Mohan Rawale
SHS
36.94%
2009
Eknath M. Gaikwad
INC
43%
2014
Rahul Ramesh Shewale
SHS
49.57%
2019
Rahul Ramesh Shewale
SHS
53.3%

Mumbai South Central मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
ANUSHAKTI NAGARTukaram Ramkrishna KateSHS
CHEMBURPrakash Vaikunth PhaterpekarSHS
DHARAVIGaikwad Varsha EknathINC
SION KOLIWADACaptain R. Tamil SelvanBJP
WADALAKalidas Nilkanth KolambkarINC
MAHIMSada SarvankarSHS

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X