Nagpur सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात भाजपला लोकसभेत आपला उमेदवार (बनवारीलाल पुरोहित यांचा अपवाद, पण ते संघाच्या मुशीत तयार झालेले नव्हते) निवडून आणता आला नव्हता. ही बाब भाजप नेत्यांना जिव्हारी लागायची. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला नितीन गडकरी यांच्या रूपात सर करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने याही वेळी तो कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे, तर दुसरीकडे भाजपकडे गेलेला पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला सर करण्यासाठी काँग्रेसही तयारीला लागली आहे. काँग्रेसने नाना पटोलेंना उमेदवारी जाहीर केली आहे. नागपुरात संघाचे मुख्यालय, दलितांचे प्रेरणास्थान दीक्षाभूमी आहे. येथे जातीय समीकरणे प्रभावी आहेत. रिपाइंचे अनेक गट येथे सक्रिय आहेत. बहुजन समाज पार्टीनेही त्यांची पाळेमुळे येथे खोलवर रुजवली आहेत. भाजपचा मित्र पक्ष शिवसेना मात्र दखलपात्र स्थितीत नाही. मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट आणि काँग्रेसविषयी असलेली नाराजी भाजपच्या फायद्याची ठरली होती. यंदा चित्र वेगळे आहे. २०१४ मध्ये भाजपचे नितीन गडकरी यांनी प्रचंड मताधिक्याने तो सर करून प्रथमच लोकसभेत प्रवेश केला. केंद्रात मंत्रिपद मिळाल्यावर गडकरी यांनी सुरुवातीपासूनच विकास कामांच्या माध्यमातून या मतदारसंघावर त्यांची पकड कायम ठेवली. साडेचार वर्षांत तब्बल ६५ हजार कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली. यावरून गडकरी यांच्या कामाचा झपाटा समजून येतो. विकासाची इच्छाशक्ती असेल तर एखादा नेता काय करू शकतो याचे उदाहरण गडकरींच्या कामाने देता येईल, इतकी कामे त्यांनी सुरू केली आहेत. फक्त विकास कामेच नव्हे तर निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक असणारे जातीय समीकरणही त्यांनी व्यवस्थित जुळवून ठेवले. काँग्रेस मागील चार वर्षांत अंतर्गत गटबाजीतून बाहेर येऊ शकली नाही. माजी खासदार विलास मुत्तेमवार पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र त्यांना पक्षातूनच प्रचंड विरोध होत आहे. मुत्तेमवार सोडून कोणीही चालेल असा मतप्रवाह मुत्तेमवार विरोधी गटात होता. चार वर्षांपूर्वी पराभवामुळे गर्भगळीत झालेली काँग्रेस त्यातून काही प्रमाणात बाहेर आली असली तरी पक्षांतर्गत गटबाजी कायम आहे. या मतदारसंघात दलित-मुस्लिमांची मते निर्णयाक आहेत. आरक्षणाच्या मुद्यावर हलबा समाज भाजपवर नाराज आहे. मागील निवडणुकीत आम आदमी पक्षाने गडकरींना चांगलेच अडचणीत आणले होते. यंदा आपने त्यांची भूमिका जाहीर केली नाही. बहुजन समाज पक्षाची मतपेटी या मतदारसंघात मोठी आहे. गत निवडणुकीत पक्षाने ९० हजारावर मते घेतली होती. बसपा इतर पक्षाच्या नाराज उमेदवारांवर लक्ष ठेवून आहे. भाजपचा गडकरी यांच्या विकास कामांवर भर आहे. साडेचार वर्षांत नागपूर व परिसरात सुरू झालेल्या विविध प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. त्यात प्रामुख्याने मेट्रो, कॅन्सर इन्स्टिटय़ूट, सिम्बॉसिस, आयआयएम, आयआयआयटी, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, साई क्रीडा केंद्र, शहरात १३५ किमी सिमेंट रस्त्यांचा समावेश आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून राज्याच्या उपराजधानीतील राजकीय चित्र बदलले. लोकसभा निवडणुकीत विदर्भातील सर्व दहाही जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या होत्या. त्यापाठोपाठ विधानसभेत ६२ पैकी ४४ जागा जिंकून भाजपने काँग्रेसचे प्राबल्य मोडून काढले. गडकरी यांनी कामाचा झपाटा लावला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नागपूरला मुख्यमंत्रीपद मिळाले. गडकरी-फडणवीस या जोडगोळीमुळे विदर्भातच भाजपसाठी वातावरण अनुकूल झाले. मंत्री म्हणून केलेल्या कामांमुळे गडकरी यांचे नाव देशभर झळकले. काम करणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख झाली. अलीकडेच लोकसभेत गडकरी यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. तेव्हा सभागृहात उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बाके वाजवून गडकरींच्या कामाला पावती दिली होती. मोदी-शहा यांच्या विरोधात उघडपणे भूमिका मांडण्याचे धाडस गडकरी यांनी केले. यामुळेच काँग्रेसचे दिल्लीतील नेते गडकरी यांच्याबद्दल सहानुभूती बाळगून असतात. या पार्श्वभूमीवरच गडकरी यांना पटोले मात देऊ शकतात का, हा खरा प्रश्न आहे.
nagpur Lok Sabha Election 2019 Result
Nagpur 2019 Candidate List
Nagpur सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल
Nagpur मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ
सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी
Maharashtra अन्य मतदारसंघ
- AHMADNAGAR
- AKOLA
- AMRAVATI
- AURANGABAD-M
- BARAMATI
- BEED
- BHANDARA - GONDIYA
- BHIWANDI
- BULDHANA
- CHANDRAPUR
- DHULE
- DINDORI
- GADCHIROLI-CHIMUR
- HATKANANGLE
- HINGOLI
- JALGAON
- JALNA
- KALYAN
- KOLHAPUR
- LATUR
- MADHA
- MAVAL
- MUMBAI SOUTH
- MUMBAI NORTH
- MUMBAI NORTH CENTRAL
- MUMBAI NORTH EAST
- MUMBAI NORTH WEST
- MUMBAI SOUTH CENTRAL
- NAGPUR
- NANDED
- NANDURBAR
- NASHIK
- OSMANABAD
- PALGHAR
- PARBHANI
- PUNE
- RAIGAD
- RAMTEK
- RATNAGIRI - SINDHUDURG
- RAVER
- SANGLI
- SATARA
- SHIRDI
- SHIRUR
- SOLAPUR
- THANE
- WARDHA
- YAVATMAL-WASHIM