Nanded सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार
१९९६ पासून नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होत आहे. तेव्हापासूनच्या सहापैकी पाच निवडणुकांत काँग्रेसची सरशी झाली. भाजप-शिवसेना हे पक्ष तेव्हाही एकत्र होते तरी त्यांच्या युतीचा काँग्रेसच्या यशावर परिणाम झाला नाही, अपवाद २००४ सालचा! ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्या निधनानंतर काही महिन्यांतच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नांदेडची जागा गमवावी लागली. भास्करराव पाटील खतगावकरांसारखा अनुभवी नेता पराभूत झाला होता. नांदेड लोकसभा मतदारसंघ सहा विधानसभा क्षेत्रांत विभागला असून तीन आमदार काँग्रेसचे तर तीन आमदार युतीचे आहेत. २०१४ च्या निवडणुकीवेळी युतीचा एकही आमदार नव्हता. काँग्रेसचे सर्वत्र प्राबल्य असताना अशोक चव्हाण ८० हजारांच्या मताधिक्याने जिंकले होते. आता पाच वर्षांनंतर भाजपने संघटनात्मक स्थिती बळकट केली आहे, या काळात काँग्रेसमधील अनेक दिग्गज भाजपमध्ये गेले आहेत. त्यातील अनेकांचा आपल्या कार्यक्षेत्रात प्रभाव आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत आणण्याचे प्रयत्न चालविले असले तरी आंबेडकर यांनी सर्वात आधी नांदेडसाठी प्रा. यशपाल भिंगे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला ‘आदर्श’ आणि ‘पेड न्यूज’ असे नवे मुद्दे देणारे नांदेड आणि तेथील नेते नेहमीच चर्चेत असतात. २०१४च्या निवडणुकीत राज्यातून काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले होते. त्यात नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि शेजारील हिंगोलीत राजीव सातव यांचा समावेश होता. या वेळी या दोन्ही जागा राखून ठेवण्याची पहिली जबाबदारी चव्हाण यांच्यावर आहे.
nanded Lok Sabha Election 2019 Result
Nanded 2019 Candidate List
Nanded सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल
Nanded मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ
सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी
Maharashtra अन्य मतदारसंघ
- AHMADNAGAR
- AKOLA
- AMRAVATI
- AURANGABAD-M
- BARAMATI
- BEED
- BHANDARA - GONDIYA
- BHIWANDI
- BULDHANA
- CHANDRAPUR
- DHULE
- DINDORI
- GADCHIROLI-CHIMUR
- HATKANANGLE
- HINGOLI
- JALGAON
- JALNA
- KALYAN
- KOLHAPUR
- LATUR
- MADHA
- MAVAL
- MUMBAI SOUTH
- MUMBAI NORTH
- MUMBAI NORTH CENTRAL
- MUMBAI NORTH EAST
- MUMBAI NORTH WEST
- MUMBAI SOUTH CENTRAL
- NAGPUR
- NANDED
- NANDURBAR
- NASHIK
- OSMANABAD
- PALGHAR
- PARBHANI
- PUNE
- RAIGAD
- RAMTEK
- RATNAGIRI - SINDHUDURG
- RAVER
- SANGLI
- SATARA
- SHIRDI
- SHIRUR
- SOLAPUR
- THANE
- WARDHA
- YAVATMAL-WASHIM