13 August 2020

News Flash

Nandurbar सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

काँग्रेस किंवा गांधी कुटुंबीयांचा पारंपरिक बालेकिल्ला असलेला नंदुरबार मतदारसंघ गेल्या वेळी भाजपने काँग्रेसकडून पटकविला होता. हा मतदारसंघ कायम ठेवण्याकरिता भाजपची धडपड सुरू असली तरी गटातटाच्या राजकारणाचा विद्यमान खासदार हिना गावित यांना फटका बसला आहे. दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागावाटपात सर्वाधिक रस्सीखेच होणारा मतदारसंघ म्हणून नंदुरबारकडे पाहिले जात आहे. भाजपमध्ये असलेल्या डॉ. विजयकुमार गावितांच्या राष्ट्रवादी परतीच्या चर्चेने नंदुरबार मतदार संघात अनिश्चितचे सावट पसरले आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला नंदुरबार मतदारसंघ गेल्या निवडणुकीत प्रथमच भाजपने डॉ. हिना गावितांच्या माध्यमातून काबीज केला. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या डॉ. गावितांच्या वर्चस्वाचा फायदा घेत भाजपने आदिवासीबहुल मतदारसंघात कमळ फुलवले. त्यानंतर भाजपमध्ये निष्ठावंत आणि उपरे अशी पडलेली दुफळी अद्याप भरून निघालेली नाही. नऊ वेळा लोकसभेत पोहचलेले माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचा २०१४च्या निवडणुकीत एक लाखहून अधिक मतांनी झालेला पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला. इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत जाहीर सभांना सुरूवात केली, तो हा नंदुरबार जिल्हा. खासदारकीच्या कार्यकाळात डॉ. हिना गावित यांनी रेल्वे दुहेरीकरणाच्या कामाला अधिकचा निधी आणण्यासाठी प्रयत्न करीत नंदुरबार-सूरत रेल्वे मार्गाच्या कामाला गती दिली. जिल्ह्य़ातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणासाठी कोटय़वधींचा निधी आणला. केंद्राने सुरू केलेल्या उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जिल्ह्य़ात दीड लाख गॅस जोडणीचे वाटप करत अडीच वर्षांनंतर डॉ. हिना गावितांनी दुर्गम भागातील घराघरात पोहोचण्याची धडपड केली. ‘हर घर बिजली’ अभियानातून जवळपास एक लाखाहून अधिक घरांना स्वातंत्र्यानंतरची पहिली वीज जोडणी. केंद्रीय विद्यालय, एकलव्य विद्यालयांना मंजुरी आदी विकासकामे ही हिना गावित यांची जमेची बाजू. सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या मतदारसंघात आरोग्य, दूरसंचार क्षेत्र, पंतप्रधान ग्रामीण सडक योजना, बँकांसंबंधीच्या समस्या आणि आदिवासी विकास विभागाकडून जिल्ह्य़ाकडे झालेले दुर्लक्ष यावर खासदारांना मार्ग काढता आलेला नाही. खासदारांनी दत्तक घेतलेल्या कहांटूळ गावाचा विकास झालेला नाही. गावातील भाजप कार्यकर्त्यांची गटबाजी त्यास कारणीभूत ठरली. खासदार दत्तक गावाचा कायापालट करण्याची पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी योजना मतदारसंघात अडचणीत सापडली. साडेचार वर्षांत भाजपमधील अंतर्गत गटबाजी वारंवार उफाळून आली. डॉ. गावित गटाला होणारा विरोध आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी हे मुद्दे खासदारांसाठी तापदायक ठरले. परंतु त्या वगळता भाजपकडे सक्षम पर्याय नाही. दुसरीकडे जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवत काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या मतदारसंघात नंदुरबारसह धुळे जिल्ह्य़ातील शिरपूर आणि साक्रीसारख्या आदिवासीबहुल तालुक्याचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस नेत्यांनी आगामी धोका ओळखत आपापला तालुका मजबुतीला प्राधान्य दिले आहे. माणिकराव गावित यांचे वाढते वय बघता काँग्रेस नव्या उमदेवाराची चाचपणी करत आहे. राष्ट्रवादीने मतदारसंघासाठी आग्रह धरल्याने गोंधळाची स्थिती आहे.

nandurbar Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Dr. Heena Vijaykumar Gavit
BJP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Nandurbar 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Adv. K. C. Padavi
INC
0
Post Graduate
61
4.52 Cr / 32.38 Lac
Ajay Karamsing Gavit
IND
0
12th Pass
25
78.34 Thousand / 0
Anturlikar Sushil Suresh
Vanchit Bahujan Aaghadi
0
Post Graduate
33
70.3 Lac / 35 Lac
Arjunsing Diwansing Vasave
IND
0
Graduate
54
16.51 Lac / 0
Ashok Daulatsing Padvi
IND
0
10th Pass
42
16.92 Lac / 3 Lac
Dr. Natawadkar Suhas Jayant
IND
0
Graduate Professional
58
4.25 Cr / 59.33 Lac
Heena Vijaykumar Gavit
BJP
0
Post Graduate
31
27.16 Cr / 1.53 Cr
Koli Ananda Sukalal
IND
2
8th Pass
52
2.05 Lac / 21.78 Lac
Krishna Thoga Gavit
Bhartiya Tribal Party
0
12th Pass
57
52.95 Lac / 49 Lac
Rekha Suresh Desai
BSP
0
12th Pass
29
7.41 Lac / 0
Sandip Abhimanyu Valvi
BMUP
0
Graduate
42
81.63 Thousand / 0

Nandurbar सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Gavit Manikrao Hodlya
INC
47.44%
2004
Gavit Manikrao Hodlya
INC
54.99%
2009
Gavit Manikrao Hodlya
INC
36.01%
2014
Dr.gavit Heena Vijaykumar
BJP
51.89%
2019
Dr. Heena Vijaykumar Gavit
BJP
49.86%

Nandurbar मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
AKKALKUWAPadavi Adv. K.c.INC
SHAHADAPadvi Udesing KocharuBJP
NANDURBARGavit Vijaykumar KrushnaraoBJP
NAWAPURNaik Surupsing HiryaINC
SAKRIAhire Dhanaji Sitaram Or D.s.ahireINC
SHIRPURKashiram Vechan PawaraINC

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X