Narendra Modi Emotional Speech: लोकसभा निवडणुकीचा निकाल आता हळूहळू पूर्ण स्पष्ट झाला आहे. एनडीएला देशात आपल्या प्रयत्नांप्रमाणे यश मिळाले नसले तरी बहुमत प्राप्त झाल्याचे स्पष्ट दिसतेय. सद्य घडीला २९१ हुन अधिक जागी आघाडी प्राप्त झाली आहे. निकालाच्या काही तासांनी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात मोदींनी जनतेला संबोधित केले होते. यावेळी भाजपाचा विजय साजरा करण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्रातून विनोद तावडे सुद्धा उपस्थित होते. देशवासीयांशी बोलताना मोदींनी आपल्या आईची आठवण काढून भावुक विधान केले होते. या विधानावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नेमकं असं मोदी काय म्हणाले व त्यावर जनतेची काय मते आहेत याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

नरेंद्र मोदी आईविषयी काय म्हणाले?

“आज झालेला विजय १४० कोटी भारतीयांचा विजय आहे. मी आज देशाच्या निवडणूक आयोगाचेही आभार मानतो. निवडणूक आयोगाने जगातली सर्वात मोठी निवडणूक संपन्न केली. माझ्या आईचे निधन झाल्यावर ही माझी पहिली निवडणूक होती. पण देशाच्या माता, भगिनींनी मला आईची कमतरता भासू दिली नाही. मला त्यांच्याकडून हे प्रेम मिळालं. हे सगळं मतदानाच्या संख्येत दिसत नाही. मी जे अनुभवलं आहे ते अनुभव रोमांच उभे करणारे आहेत. राष्ट्र प्रथम ची भावना ही आपल्यासाठी महत्वाची आहे.भारतातली निवडणूक प्रक्रिया आणि यंत्रणा यांच्या विश्वासार्हतेवर प्रत्येक भारतीयाला गर्व आहे.

shankaracharya swami avimukteshwaranand saraswati on rahul gandhi hindu statement
Video: “जेव्हा आम्हाला राहुल गांधींच्या हिंदूंबाबतच्या विधानाबद्दल सांगण्यात आलं, तेव्हा…”, शंकराचार्यांचं मोठं विधान!
Loksatta sanvidhan bhan Constitution of India Living Wage Living wage Decent standard of life
संविधानभान: दर्जेदार जीवनाची हमी
reasonable restrictions on fundamental right to form union and organizations
संविधानभान: समाजवादी पंचशील
sharad pawar marathi news (1)
अजित पवारांच्या ‘मी नवखा नाही’ विधानावर शरद पवारांचं खोचक भाष्य; म्हणाले, “खिशात ७० रुपये असताना…”!
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis
“ना ना करते प्यार…”, लिफ्टमधील फडणवीसांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया; म्हणाले, “गुप्त बैठका…”
Maratha Confederacy Aggressive for Immediately oust Vijay Vadettivar
वडेट्टीवारांची तात्काळ हकालपट्टी करा, मराठा महासंघ आक्रमक; म्हणाले, “केवळ ओबीसी समाजाचीच…”
tanushree dutta reply nana patekar
नाना पाटेकरांनी ‘त्या’ आरोपांवर प्रतिक्रिया देताच तनुश्री दत्ता म्हणाली, “आता ते घाबरले आहेत, कारण त्यांचे…”
OBC Leader dr ashok jivtode, bjp, Statewide Protests if Maratha Reservation Affects OBC Quota, dr ashok jivtode Statewide Protests if Affects OBC Quota, Maratha Reservation, OBC Quota, chandrapur
भाजप नेत्याचा ओबीसी आरक्षणाला जाहीर पाठिंबा…राज्य सरकारला इशारा देत म्हणाले….

याशिवाय मोदींनी ओडिशामधील भाजपाच्या यशाबाबत सुद्धा आभार मानले. शिवाय जम्मू काश्मीरच्या मतदारांनी दाखवलेल्या अभूतपूर्व उत्साहाचा उल्लेख करत भारताची बदनामी करणाऱ्यांना त्यांनी आरसा दाखवला आहे. या विजयी पर्वाच्या निमित्ताने मी सगळ्यांना आदराने नमस्कार करतो”, असेही मोदी म्हणाले.

मोदींच्या विधानावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

मोदींच्या या विधानानंतर सोशल मीडियावर वेगवेगळी मते मांडली जात आहेत. काहींनी मोदींसाठी सहानुभूती दाखवली आहे तर काहींनी अचानक आईचा उल्लेख करण्यावरून मोदींवर टीका केली आहे. आतापर्यंत तुम्ही आईचं नाव घेतलं नाही आणि आज अपेक्षित निकाल समोर न आल्यावर सहानुभूतीसाठीच आईचे नाव घेत आहात अशा शब्दात नेटकरी सोशल मीडियावर टीका करत आहे.

हे ही वाचा<< नरेंद्र मोदी निकालाचे आकडे पाहून म्हणतायत ‘मेनू विदा करो’? Video पाहून व्हाल लोटपोट, मोदींच्या आवाजावर मीमकरी फिदा

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी पाहिल्यास, मोदींना वाराणसीतून ६ लाख १२ हजार ९७० मते प्राप्त झाली. मोदींनी १ लाख ५२ हजार ५१३ मतांच्या आघाडीने काँग्रेसच्या अजय राय यांना मात दिली आहे. यानंतर मोदींनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून सुद्धा देशवासीयांचे आभार मानले आहेत. मोदी म्हणाले की, “भारताच्या इतिहासातील हा एक अभूतपूर्व क्षण आहे. या प्रेम व आशीर्वादांसाठी मी माझ्या कुटुंबियांना देशवासीयांना नमन करतो. मी देशवासियांना हे विश्वासाने सांगू इच्छितो की त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवी ऊर्जा, नवे संकल्प घेऊन पुढे वाटचाल करणार आहोत. सर्व कार्यकर्ते ज्यांनी या कालावधीत समर्पणाने, अथक परिश्रम घेतले त्यांचे मी आभार मानतो, अभिनंदन करतो. “