शिवसेनेच्या शिंदे गटातील खासदार आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ महायुतीने कल्याणमध्ये आयोजित केलेल्या प्रचारसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. मोदी यांनी या सभेला संबोधित करताना शिवसेनेच्या ठाकरे गटावर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटावर आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच मोदी म्हणाले, काँग्रेसचे युवराज (राहुल गांधी) वीर सावरकरांचा आपमान करतात, मंचावर उभे राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा तिरस्कार करतात आणि सावरकरांचं, शिवाजी महाराजांचं नाव घेणारी नकली शिवसेना मात्र शांत बसते. आम्ही टीका केल्यानंतर नकली शिवसेना आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांनी काँग्रेसचा युवराजाला समजावलं की या निवडणुकीत सावरकरांबद्दल काही बोलू नको. तेव्हापासून युवराज सावरकरांबद्दल काही बोलले नाहीत.

नरेंद्र मोदी म्हणाले, देशात आपलं सरकार आल्यापासून आपण आपल्या शत्रूंच्या मुसक्या आवळल्या आहेत. आपल्या शेजारचा देश पाकिस्तानची भारताला ललकारण्याची हिंमत नाही. मात्र हे काँग्रेसवाले असं सांगतात की पाकिस्तानचा सन्मान करा, का? तर म्हणे, त्यांच्याकडे अणूबॉम्ब आहे. अरे त्या पाकिस्तानकडे त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी पैसे नाहीत आणि तुम्ही आम्हाला त्यांची भीती दाखवता?

Pm Narendra modi Speech in Nashik
“मोदींनी भाषणात अल्पसंख्याकांचा मुद्दा काढताच, शेतकरी ओरडला कांद्यावर बोला..”, पुढे नेमकं काय घडलं?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न
uddhav thackeray narendra modi (1)
“…तर मी मोदींसाठी धावून जाईन”, पंतप्रधानांच्या हाकेला उद्धव ठाकरेंची साद? म्हणाले, “त्यांच्यासाठी…”
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Raj Thackeray Fatwa
राज ठाकरेंनी काढला फतवा! म्हणाले, “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..”
Devendra Fadnavis on Eknath Shinde
“एकनाथ शिंदेंना अपमानित करायचे नव्हते, म्हणून…”, ठाणे लोकसभेवरून देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

मोदी म्हणाले, देशात काँग्रेसचं सरकार असतं तेव्हा पाकिस्तान आपल्याला धमकी देतो आणि काँग्रेसचं सरकार त्यांनं म्हणतं, प्लीज आमच्यावर हल्ला करू नका. तसेच देशात काँग्रेसचं सरकार नसतं तेव्हा हे काँग्रेसवाले आपल्याला पाकिस्तानच्या बाजूने धमक्या देतात. पाकिस्तानने त्यांच्या संसदेत मान्य केलं आहे की त्यांनी आपल्यावर (भारतावर) दहशतवादी हल्ले केले आहेत. तरीदेखील भारतात काँग्रेस आणि हे इंडिया आघाडीवाले त्याच पाकिस्तानला क्लीनचीट देतात. इंडिया आघाडी पाकिस्तानच्या बाजूने मतदान करते. काँग्रेसची नेहमीच एका विशिष्ट समाजाला तुष्टीकरण करण्याची मानसिकता राहिली आहे. इंडिया आघाडीवालेदेखील आता तेच करू लागले आहेत.

हे ही वाचा >> “मोदींनीच ७५ वर्षे वयाचा नियम केला, आता…”, तिसऱ्या टर्मबाबत पृथ्वीराज चव्हाणांचं सूचक वक्तव्य

पंतप्रधान मोदी म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणारे लोक आता काँग्रेसचा कुर्ता पकडून उभे आहेत. हा काँग्रेस पक्ष नेहमीच फुटीरतावाद्यांचं, दहशतवाद्यांचं समर्थन करत आला आहे. आता नकली शिवसेना त्यांच्याबरोबर उभी आहे. हे काँग्रेसवाले छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात आणि नकली शिवसेना स्वस्थ बसते. तुम्ही काँग्रेसच्या राजकुमाराचा तो व्हिडीओ पाहिला असेल. काँग्रेसचा राजकुमार मंचावर उभा राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा तिरस्कार करत होता. ते चित्र पाहून महाराष्ट्राला आणि येथील जनतेला काँग्रेसच्या युवराजाचा खूप राग आला. नकली शिवसेनावाले लोक मात्र त्यावेळी तोंडाला कुलूप लावून बसली होती. त्यांनी डोळ्याला पट्टी बांधून ठेवली होती. काँग्रेसवाले वीर सावरकरांचा अपमान करतात. मात्र नकली शिवसेनावाले त्यावर काहीच बोलत नाहीत.