Osmanabad सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार
उस्मानाबादच्या राजकारणात डॉ. पद्मसिंह पाटील यांचा दबदबा असला तरी गेल्या निवडणुकीत शिवसेनेने त्यांना पराभवाची धूळ चारली होती. गेल्या पाच वर्षांत राजकारण बदलले आहे. शिवसेनेत वाढलेली गटबाजी, तब्येतीच्या कारणाने डॉ. पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात नसणे यातून संदर्भही बदलले आहेत. हा मतदारसंघ पुन्हा कायम राखण्यासाठी शिवसेनेने चंग बांधला असतानाच राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीचा घोळ सुरू आहे. २००९मधील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांनी रवींद्र गायकवाड यांना धूळ चारत दिल्ली गाठली. त्याचा वचपा २०१४ साली झालेल्या निवडणुकीत प्रा. रवींद्र गायकवाड यांनी काढला. राज्यातील ज्येष्ठ नेते असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांचा तब्बल दोन लाख ३४ हजार मतांनी पराभव झाला. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्य़ाच्या राजकारणात अनेक नाटय़मय घटना घडल्या. शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा आमदार तानाजी सावंत यांच्याकडे गेली. त्यामुळे सेनेत निष्ठावंत विरुद्ध आयात केलेले सैनिक अशी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा विजयासाठी शिवसेनेला घाम गाळावा लागणार आहे. खासदार प्रा. रवींद्र गायकवाड सेनेचे तसे जुने नेते आहेत. खासदार झाल्यापासून त्यांनी १४ कोटी रुपयांहून अधिक निधी मतदारसंघातील विकासकामांवर खर्च केल्यांचा त्यांचा दावा आहे. जिल्ह्य़ातील अनेक विकासकामांवर भाजप आपला दावा ठोकत आहे. तीच कामे पूर्ण करण्यासाठी आपण भरीव निधी दिला असल्याचे खासदार गायकवाड सांगतात. त्यामुळे नेमके खरे काय, याचा संभ्रम मतदारांमध्ये आहे. अनेक वर्षांपासून लटकलेल्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाचा पाठपुरावा केल्यामुळेच त्याला गती मिळाल्याचे खासदार सांगतात तर भाजपवाले पंतप्रधान नरेंद्र मोदींना याचे श्रेय देतात. मराठवाडय़ाच्या पाण्याचा रखडलेला कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा प्रश्न आपण लावून धरला असल्याचे खासदारांचे मत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस याबाबतीत सेनेने मागील चार वर्षांत काय केले, असा थेट सवाल उपस्थित करीत आहेत.
osmanabad Lok Sabha Election 2019 Result
Osmanabad 2019 Candidate List
Osmanabad सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल
Osmanabad मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ
सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी
Maharashtra अन्य मतदारसंघ
- AHMADNAGAR
- AKOLA
- AMRAVATI
- AURANGABAD-M
- BARAMATI
- BEED
- BHANDARA - GONDIYA
- BHIWANDI
- BULDHANA
- CHANDRAPUR
- DHULE
- DINDORI
- GADCHIROLI-CHIMUR
- HATKANANGLE
- HINGOLI
- JALGAON
- JALNA
- KALYAN
- KOLHAPUR
- LATUR
- MADHA
- MAVAL
- MUMBAI SOUTH
- MUMBAI NORTH
- MUMBAI NORTH CENTRAL
- MUMBAI NORTH EAST
- MUMBAI NORTH WEST
- MUMBAI SOUTH CENTRAL
- NAGPUR
- NANDED
- NANDURBAR
- NASHIK
- OSMANABAD
- PALGHAR
- PARBHANI
- PUNE
- RAIGAD
- RAMTEK
- RATNAGIRI - SINDHUDURG
- RAVER
- SANGLI
- SATARA
- SHIRDI
- SHIRUR
- SOLAPUR
- THANE
- WARDHA
- YAVATMAL-WASHIM